महागाई, इंधन दरवाढीचा भडका

सामान्यांचे बजेट कोलमडले; छोटे व्यवसाय, व्यापाऱ्यांनाही फटका
 fuel prices
fuel pricesAgrowon

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : जीवनावश्‍यक वस्तूंच्या दरात मोठ्या (In the price of essential commodities) प्रमाणात झालेल्या दरवाढीमुळे हैराण झालेल्या सामान्यांना आता जोडीला इंधनदरवाढीलाही तोंड द्यावे लागत आहे. या दरवाढीच्या बोजामुळे देशात (Country) सर्वच क्षेत्रातील लोकांचे जगणे अवघड झाले आहे. त्याचबरोबर सामान्यांचे बजेट कोलमडले आहे.
भाजीपाल्याबरोबरच (Vegetable) अन्य अन्न (Food) पदार्थांचे दर गगनाला भिडले आहेत. त्यासोबतच गेल्या महिनाभरात पेट्रोल आणि डिझेलच्या दरात लिटरमागे १० रुपयांनी वाढ झाली आहे. तसेच घरगुती गॅस सिलिंडरसह (gas cylinder) अन्य पेट्रोलियम पदार्थचीही गेल्या काही दिवसांपासून दरवाढ मोठ्या प्रमाणात झाली आहे, त्यामुळे नागरिक त्रस्त झाले आहेत. रोज होणाऱ्या इंधनदरवाढीमुळे 9rising fuel prices) सामान्यांना जगणे कठीण झाले आहे.

 fuel prices
तळलेले गरे, फणसाची फ्रोझन भाजी, फणसाचे होतेय मूल्यवर्धन

हरियानाच्या (Haryana) हिस्सारमधील वाहन बाजारपेठेत (Market) दुकान असलेले व्यावसायिक ओमपाल सिंग यांनी सांगितले, की दरवाढीचा फटका छोट्या उद्योग, व्यवसयांना आणि व्यापाऱ्यांना बसला आहे.
वाढत्या महागाईच्या झळा मध्य प्रदेशातील दूध व्यावसायिक (Milk Business ) असो किंवा केरळमधील मत्स्य वितरक अशा सर्वांनाच बसत आहेत. भोपाळमधील दूध व्यावसायिक कल्लू राम यांनी सांगितले, की पेट्रोल दरवाढीमुळे (Petrol Rate) त्यांनी केलेल्या बचतीवर परिणाम झाला आहे. मला दुचाकीवरून ग्राहकांकडे (Customer) दूध पोहोचवावे लागते. काही दिवसांपूर्वी मला रोज १०० रुपये खर्च करावे लागत होते; मात्र आता रोज १६० रुपयांपर्यंत खर्च येत आहे. पेट्रोल, डिझेलचे दर (Diesel Rate) कमी झाले पाहिजेत.
तर कोझिकोडे (केरळ) येथील मत्स्य वितरक अब्दुल रहमान यांनी सांगितले, की मी व्यवसायासाठी रोज दुचाकी वापरतो आणि सध्या मला रोज २५० रुपयांपर्यंत खर्च येत आहे. काही दिवसांपूर्वी हा खर्च १५० रुपये होता.

चंडीगड येथील निवृत्त सरकारी कर्मचारी (Government Employee) बलदेव चंद यांनी सांगितले, की वाढत्या महागाईमुळे त्यांचे घरगुती बजेट कोलमडले आहे. माझ्या निवृत्तिवेतनातील मोठी रक्कम आधीच माझ्या आणि पत्नीच्या औषधांसाठी (Medicine) खर्च होत आहे. जीवनावश्‍यक वस्तूंच्या वाढत्या किमतींमुळे आम्हाला आता कमी गरजेच्या वस्तूंवरील खर्च कमी करावा लागत आहे.


रिक्षा, कॅबचालकांचा संपाचा इशारा
पेट्रोल-डिझेलच्या दरात झालेल्या वाढीमुळे नागरिकांबरोरच रिक्षा व कॅब चालकही मेटाकुटीला आले आहेत. त्यातच पेट्रोल-डिझेल पाठोपाठ सीएनजीच्या दरातही वाढ झाल्याने त्रस्त झालेल्या रिक्षा आणि कॅब चालकांनी १८ एप्रिल रोजी संपाचा इशारा दिला आहे.

घरगुती गॅस सिलिंडर १००० रुपयांपर्यंत पोहोचला असून, भाजीपाला, फळे, खाद्य तेलांच्या किमतीही प्रचंड वाढल्या आहेत.

-अनुदीप कौर गोराया, गृहिणी, फगवाडा (पंजाब)

एक किलो सीएनजीसाठी सध्या ६९ रुपये मोजावे लागत आहेत. आम्ही सरकारकडे प्रति किलो ३५ रुपये अनुदान देण्याची मागणी करत आहोत. आमची मागणी मान्य न झाल्यास आम्ही १८ एप्रिलपासून बेमुदत संप पुकारणार आहोत.

राजेंद्र सोनी, सरचिटणीस, दिल्ली ऑटो-रिक्षा संघ

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com