Linseed Varieties : पेरणीसाठी जवसाच्या कोणत्या सुधारित जातींची निवड कराल ?

जवस हे रब्बी हंगामातील महत्त्वाचे तेलबिया पीक आहे. जवसाचा उपयोग तेल व धागा निर्मितीसाठी केला जातो.
c
c
Published on
Updated on

जवस (Linseed) हे रब्बी हंगामातील (Rabbi Season) महत्त्वाचे तेलबिया पीक (Oilseed Crop) आहे. जवसाचा उपयोग तेल व धागा निर्मितीसाठी केला जातो. जवस हे अतिशय पौष्टिक असून, त्यामधून आठ प्रकारची प्रथिने, कर्बोदके, जीवनसत्त्वे व खनिजे मिळतात. 

c
‘जवस आर्थिक सुबत्तेचा सक्षम पर्याय’

कोरडवाहू पद्धतीने पेरणी करावयाची असल्यास ऑक्टोबर च्या पहिला आठवड्यात तर बागायती क्षेत्रात ऑक्टोबरच्या दुसऱ्या व तिसऱ्या आठवड्यात पेरणी करण्याची शिफारस करण्यात आली आहे. पण पावसामुळे रब्बी पिकाच्या पेरण्या रखडलेल्या आहेत. हा पाऊस खरीपातील काढणीला आलेल्या पिकासाठी जरी हानीकारक असला तरी रब्बी हंगामासाठी उपयुक्त ठरणारा आहे. वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाने दिलेल्या माहितीनूसार जवसाची लागवड करताना परिपक्व होण्याच्या कालावधीनूसार तसेच विविध रोगासाठी प्रतिकारक्षम असलेल्या जवसाच्या पुढील वाणांची निवड करावी. 

c
जवस तेल जास्त दिवस साठवण्यासाठी काय करावे?

जवसाची सुधारित वाण व त्यांची वैशिष्ट्ये

१. लातूर जवस-९३ - हे लवकर तयार होणारे वाण असून कमी लागवड अंतरासाठी, कोरडवाहू लागवडीसाठी शिफारस करण्यात आले आहे. हे वाण मर, भुरी, अल्टरनेरीया रोगास व गादमाशी किडीस प्रतिकारक्षम आहे.

२. एन.एल.-९७  - हे वाण ११५ ते १२० दिवसात तयार होते. तेलाचे प्रमाण ४२ टक्के असून  मर, भुरी, अल्टरनेरिया रोगास व गादमाशी किडीस प्रतिकारक्षम आहे.

३. एन. एल.- २६० हे वाण  १११ ते ११५ दिवसात तयार होते. मर, भुरी, अल्टरनेरिया रोगास व गादमाशी किडीस प्रतिकारक्षम आहे. 

४. शारदा - हा वाण कोरडवाहू पद्धतीने लागवड करण्यासाठी शिफारस करण्यात आले आहे. मर, भुरी, अल्टरनेरिया रोगास व गादमाशी किडीस प्रतिकारक्षम आहे. 

पेरणीपूर्वी प्रति किलो बियाणास कार्बेन्डाझिम १.५ ग्रॅम किंवा थायरम ३ ते ३.५ ग्रॅम लावावे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com