कृषी उत्पादनात सूक्ष्मजीव व जैविक अर्काचे महत्त्व

शेतीसाठी सूक्ष्मजीव, नैसर्गिक अर्क आणि जैविक स्लरीचे महत्व
Microorganisms)
Microorganisms) Agrowon

मागील काही भागांमध्ये आपण बांधावरची प्रयोगशाळा, संकल्पना, बनविल्या जाणाऱ्या नैसर्गिक निविष्ठा, ट्रायकोडर्मा निर्मितीचे तंत्र आणि जैविक शेतीमध्ये पशुधनाचे महत्व यावर माहिती घेतली. या भागात शाश्वत शेतीसाठी सूक्ष्मजीव, नैसर्गिक अर्क आणि जैविक स्लरीचे महत्व याविषयी माहिती घेऊ.

आज अनेक शेतकरी (Farmer) आपल्या द्राक्ष, डाळिंब, संत्रा, हळद, ऊस, सीताफळ, पेरू, केळी, भाजीपाला (Grapes, Pomegranate, Orange, Turmeric, Sugarcane, Custard apple, Peru, Banana, Vegetable) अशा पिकांच्या व्यवस्थापनामध्ये वेगवेगळ्या प्रकारे जैविक अर्क, सूक्ष्मजीवांचा (Organic extracts, microorganisms) वापर करत असतात.
विशेषतः शेतकरी बांधव स्वतः सर्व घटक बनवून शेत-पिकात वापरीत आहेत
वेगवेगळ्या नैसर्गिक घटकांपासून बनविलेल्या स्लरी किंवा दाणेदार जैविक घटकांचा वापर करत आहेत.
१) जनावरांचे मूत्र (Animal urine) + धान्य-कडधान्य + गूळ + सूक्ष्मजीव मिडिया + सूक्ष्मजीव विरजण
२) ताक + धान्य-कडधान्य + गूळ + सूक्ष्मजीव मिडिया + सूक्ष्मजीव विरजण
३) ट्रायकोडर्मा मायसिलियम + धान्य-कडधान्य + गूळ + सूक्ष्मजीव मिडिया
४) सी वीड एक्स्ट्रॅक्ट + पोटॅशिअम हुमेट + निम तेल + करंज तेल + साबुदाणा किंवा तांदूळ किंवा बेसन पीठ वापरून ग्रॅनुल
५) थर्मल डिकंपोस्टिंग खत (Thermal decomposing fertilizer)
६) निरसे (कच्चे) गायीचे किंवा म्हशीचे दूध
७) सोयाबीन किंवा वाळवलेले लहान मासे किंवा सुकट + फॉस्फोरिक अॅसिड (Fish or dried + phosphoric acid)

Microorganisms)
जैविक खते वापरून कृषी उत्पादन वाढवावे : पडवळ

अशा सर्व निविष्ठांना आवश्यकतेनुसार रासायनिक घटकांची जोड देऊन एकात्मिक पद्धतीने शाश्वत शेती करत आहेत.
या घटकांमध्ये वापरले जाणारे उपयुक्त सूक्ष्मजीव किंवा जैविक अर्क

सामान्यतः
१) नत्र उपलब्ध करून देणारे जिवाणू : ॲझोटोबॅक्टर, रायझोबिअम, ॲसिटोबॅक्टर
२) स्फुरद उपलब्ध करून देणारे जिवाणू : बॅसिलस, स्‍युडोमोनास
३) बुरशीजन्य रोग नियंत्रणासाठी : बॅसिलस, स्‍युडोमोनास, ट्रायकोडर्मा, दालचिनी तेल इ.
४) अळीवर्गीय किडींच्या नियंत्रणासाठी : मेटारायझिम ॲनिसोपली, नीम तेल, करंज तेल इ.
५) रस शोषक कीड नियंत्रणासाठी : बिव्हेरिया बॅसियाना, नीम तेल, करंज तेल, दालचिनी तेल इ.
६) पांढऱ्या माशीच्या नियंत्रणासाठी : व्हर्टिसीलियम लेकॅनी (Verticillium lecani)
७) पांढऱ्या मुळांची वाढ होण्यासाठी : सागरी तणांचा अर्क (सी वीड एक्सट्रॅक्ट), पोटॅशिअम हुमेट, फल्विक ॲसिड इ.
८) रोग व कीड प्रतिकारक्षमतेसाठी : सिलिकॉन, अमिनो ॲसिड इ.
यामध्ये जैविक घटकांमध्ये सूक्ष्मजीवांची प्रत चांगली असल्या वाढ वेगाने होऊन त्याचे उत्तम परिणाम पिकात दिसतात. सूक्ष्मजीवांचा वाढ योग्य रीतीने व्हावी, यासाठी सूक्ष्मजीवांना खालील घटकांची जोड द्यावी. सूक्ष्मजीवांचे विरजण दिली तर जनावरांचे मूत्र किंवा ताक, धान्य, कडधान्य, गूळ, सूक्ष्मजीव मीडिया आणि सूक्ष्मजीवांचे विरजण यांच्या साह्याने स्लरी बनविता येतात. त्यामुळे जमिनीची सुपीकता वाढते. पिकाची कीड व रोग प्रतिकारक्षमता वाढते.

Microorganisms)
सूक्ष्मजीवांचे पीक पोषक, रसायनांवरील परिणाम

वेगवेगळ्या घटकांचा वापर करून नैसर्गिक/ जैविक स्लरी बनविण्याची पद्धत

प्रक्रिया पहिली
पीठ बनविण्याची प्रक्रिया (The process of making flour)
गहू : १ किलो, ज्वारी : १ किलो, बाजरी: १ किलो, तांदूळ: १ किलो, सर्व प्रकारच्या डाळी : १ किलो
वरील सर्व धान्य एकत्रित दळून घ्यावे.

प्रक्रिया दुसरी
स्लरी बनविण्याची प्रक्रिया (The process of making slurry)
गूळ : ५ किलो (२० लिटर पाण्यात विरघळून घ्यावा.)
गोमूत्र : ५ लिटर
पहिल्या प्रक्रियेतील पीठ : ५ किलो
सूक्ष्मजीव विरजण : २ लिटर
सूक्ष्मजीव मीडिया : १ किलो
पाणी : २०० लिटर

वरील द्रावण दररोज सकाळी, दुपारी आणि संध्याकाळी ७ ते १० दिवस चांगले ढवळावे.
या द्रावणातील ४० लिटर स्लरी वेगळी घेऊन, त्यात १६० लिटर पाणी मिसळावे. हे द्रावण चार पदरी मांजरपाट कापडातून चांगले गाळून घ्यावे. हे २०० लिटर द्रावण ठिबकद्वारे, आळवणीद्वारे किंवा मोकळ्या पाण्यासोबत देता येते. एक एकर क्षेत्रासाठी पुरेसे ठरते.

या स्लरीबरोबर फवारणीसाठी खालील घटक मिसळल्यास पिकांची रोग व कीड प्रतिकारक्षमता वाढत असल्याचा अनुभव आहे.
१० लिटरच्या पंपामध्ये १ लिटर गाळलेली स्लरी घ्यावी. या स्लरीमध्ये सी वीड एक्स्ट्रॅक्ट अधिक पोटॅशिअम हुमेट अधिक नीम व करंज तेल मिसळावे. पिकानुसार अन्य घटकांचे प्रमाण थोडेफार बदलावे लागते.

स्लरीमध्ये गोमूत्राच्या ऐवजी ताक किंवा ट्रायकोडर्मा मायसिलियम (Trichoderma mycelium) वापरले तर वेगवेगळ्या प्रकारचे जैविक अर्क तयार होतात. या पद्धतीने ३ प्रकारच्या स्लऱ्या बनविता येतात. १) गोमूत्र वापरून जैविक स्लरी, २) ताक वापरून जैविक स्लरी, ३) ट्रायकोडर्माचे
मायसिलियम वापरून जैविक स्लरी.
अशा जैविक स्लरीमध्ये सूक्ष्मजीव मीडिया किंवा खाद्य म्हणून खालील घटक असावेत.
१) यीस्ट एक्सट्रॅक्ट, २) पेप्टोन, ३) माल्ट एक्सट्रॅक्ट, ४) अल्प प्रमाणात नत्र, स्फुरद, पालाशयुक्त अन्नद्रव्ये, ५) अतिअल्प प्रमाणात झिंक, फेरस व मॅग्नेशिअम.

सी वीड एक्स्ट्रॅक्ट, पोटॅशियम हुमेट, नीम व करंज तेल याद्वारे दाणेदार घटक बनविण्यासाठी ः
सी वीड एक्स्ट्रॅक्ट, पोटॅशियम हुमेट, नीम व करंज तेल चे द्रावण बनवून घ्यावे. या द्रावणामध्ये साबुदाणा भिजण्यास ठेवावा. म्हणजे साबुदाणा द्रावणात सर्व घटक शोषून घेतो. पुढे हा साबुदाणा कडक उन्हात वाळवून घ्यावा. वाळविल्यानंतर साबुदाणा पुन्हा कडक होऊन, त्याचे दाणे मिळतात. यात शाबुदाण्याऐवजी तांदळाचाही वापर करता येतो. हे साबुदाणा किंवा तांदळापासून बनविलेले दाणेदार जैविक घटक खते किंवा बियाणांबरोबर जमिनीतून देता येतात.

थर्मल डीकम्पोस्टिंग खत बनविण्याची पद्धत : (Method of making thermal decomposting fertilizer)
साहित्य व प्रमाण : शेणखत (५०%), लेंडी खत (२०%), उसाची मळी (१५%), कोंबडी खत (५ %), शिल्लक भाजीपाल्याचे अवशेष (५%), ऊस कारखान्यातील राख (३ %), ऊस कारखान्यातील बगॅस पावडर (२ %)
यापैकी एखादा एखादा घटक उपलब्ध नसल्यास त्याऐवजी शेणखत वापरावे.
हे सर्व घटक एकत्र एकजीव करण्यासाठी फावड्याचा वापर करावा. हे घटक खूप जास्त प्रमाणात असतील, तरी यंत्राचा वापर करता येतो. एकजीव केलेल्या खतावर गोमूत्र किंवा ताकाची स्लरी फवारावी. (१ टन खतावर ५० लिटर स्लरी अधिक १ लिटर ट्रायकोडर्माचे मायसिलिअम)
वरील खत शक्यतो दर २ महिन्यांनी एकजीव करून घ्यावे. शक्यतो हे खत ८ ते १० महिने कुजवूनच मग वापरावे.

निरसे (कच्चे) गायीचे किंवा म्हशीचे दूध (Nirse (raw) cow's or buffalo's milk:)
निरशा दुधात स्युडोमोनास किंवा बॅसिलस या सूक्ष्मजीवांच्या प्रजाती उपलब्ध असतात. उन्ह्याळ्यात दूध नासण्यामागे बॅसिलस हे सूक्ष्मजीव असतात. तर थंडीच्या दिवसांत दूध नासण्यामागे स्युडोमोनास या सूक्ष्मजीवामुळे नासते, असे काही संशोधनातून पुढे आले आहे. त्यामुळेच कच्या दुधातून वरील सूक्ष्मजीव आपल्याला मिळू शकतात. कच्चे दूध रासायनिक खताच्या आधी किंवा नंतर दिल्यामुळे वेगवेगळ्या पिकात रोगांचे प्रमाण कमी होताना दिसत आहेत.

सोयाबीन किंवा सुकट + फॉस्फोरिक अॅसिड ः (Soybeans or dry + phosphoric acid)
सोयाबीन किंवा सुकट फॉस्फोरिक अॅसिडबरोबर एकत्रित केल्यामुळे अॅसिडिफिकेशन (आम्लपणा) मुळे वेगवेगळे नैसर्गिक अमिनो अॅसिड किंवा सेंद्रिय आम्ल तयार होण्यास मदत मिळते. जमिनीचा खारवटपणा कमी होण्यास मदत मिळते.

वरील सर्व निविष्ठांचा वापर वाशीम, पुणे, नगर, सोलापूर जिल्ह्यांत वेगवेगळ्या पिकांत करण्यात आला आहे किंवा येत आहे. विशेषतः खालील पिकातील महत्त्वाच्या समस्या कमी होत असलेल्या दिसून आले.

१) डाळिंब : काळा डाग (कोलेटोट्रिकम), तेलकट डागरोग (झान्थोमोनास), निमॅटोड (सूत्रकृमी), मर (सेरॅटोसिस्टीस किंवा फुझारिअम)
२) द्राक्ष : डाऊनी मिल्ड्यू, पावडरी मिल्ड्यू.
३) तूर व हरभरा पिकातील मर
४) हळद पिकातील करपा
५) सोयाबीन पिकातील वेगवेगळ्या किडींचे प्रादुर्भाव कमी होताना दिसत आहे.

वाशीम येथील जय किसान शेतकरी गट वर उल्लेखलेल्या निविष्ठांची निर्मिती करत आहे. त्यात त्यांना मिळालेल्या यशामुळे गेल्या १ वर्षांपासून वाशीम, पुणे, नगर, उस्मानाबाद, सोलापूर येथील शेतकरीही अशा सूक्ष्मजीव व जैविक अर्काचा वापर करू लागले आहेत.


राहू (ता. दौंड, जि. पुणे) येथील शेतकऱ्यांचे बांधावरील प्रयोगशाळेसाठीचे मत :

डाळिंब पिकामध्ये उत्पादन खर्च (Production cost in pomegranate crop)वाढत असून, शेतकऱ्यांची आर्थिक गणिते बिघडत आहेत. अशा वेळी जैविक शेती वरदान ठरत आहे. जिवाणूंची निर्मिती बांधावर केल्यामुळे उत्पादन खर्चातही घट होते. रासायनिक खतांवरील खर्चात बचत झाली. डाळिंबातील तेलकट डाग व काळे डाग अशा रोगांवर नियंत्रण मिळविण्यातही आम्हा शेतकऱ्यांना काही अंशी यश आले आहे. त्यासाठी ताक, गोमूत्र, कडधान्याची स्लरी, दूध व साखर कारखान्यापासून बाहेर पडलेले सेंद्रिय घटक, शेणखत यांचा वापर केल्याने जमिनीतील सेंद्रिय कर्ब वाढला आहे. अर्थात, जैविक घटकांना (biological components) रासायनिक घटकांची जोड दिल्याशिवाय डाळिंब शेती शक्य नसल्याचे आम्हा शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. आम्ही आवश्यकतेनुसार योग्य त्या रासायनिक कीडनाशकांचा वापर करत असल्याचेही ते आग्रहाने सांगतात.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com