थोडक्यात माहिती:१. बाग स्वच्छ आणि तणमुक्त ठेवण्यासाठी नियमित कुळवणी व पिल्ले काढणे आवश्यक आहे.२. झाडांना आधार देऊन, रोगग्रस्त पाने काढून आणि योग्य खतांचा वापर केल्याने झाडांची वाढ सुधारते.३. घडाची गुणवत्ता वाढवण्यासाठी केळफूल कापणे, फवारणी आणि पॉलिथीन आवरण करणे उपयुक्त ठरते.४. चवळी, मुग, भुईमूग, काकडीसारखी आंतरपिके घेणे टाळावे कारण ती केळीमध्ये रोग वाढवू शकतात.५. केळीच्या दोन ओळींमधील मोकळ्या जागेत पॉलीइथिलीन आच्छादन केल्याने ओलावा टिकतो आणि उत्पादन वाढते..Banana Crop Management: केळीच्या बागेत आंतरमशागत, नियमित स्वच्छता व योग्य देखभाल केल्यास उत्पादन चांगले मिळते. हवामान सतत बदलत असल्यामुळे केळीच्या बागेची योग्य काळजी घेणे खूप गरजेचे आहे. शेतकऱ्यांनी महात्मा फुले कृषी विद्यापीठाने दिलेल्या उपायांचा अवलंब केल्यास झाडांचे नुकसान कमी होऊन चांगले उत्पादन मिळवू शकतात..१. आंतरमशागतबाग नेहमी तणमुक्त ठेवावी.केळी बाग स्वच्छ ठेवण्यासाठी उभी-आडवी कुळवणी वेळेवर करावी.लागवडीनंतर ३ ते ४ महिन्यांपर्यंत कुळवणी करणे फायदेशीर ठरते.दर दोन महिन्यांनी टिचणी बांधणी करून झाडांना मातीची भर द्यावी..Banana Farming: केळी बागेचे उत्पादन वाढवण्यासाठी योग्य खत व पाणी व्यवस्थापन.केळीच्या मुख्य झाडाच्या खोडाच्या बाजूने उगवणारे नवीन झाड किंवा कोंब ज्याला बोलीभाषेत पिल्ले म्हणतात, त्यांना धारदार कोयत्याने नियमित काढावीत.रोगग्रस्त पाने कापून बागेबाहेर नष्ट करावीत, पण हिरवी पाने कापू नयेत.झाडे पडू नयेत म्हणून गरजेप्रमाणे बांबूच्या काठ्या किंवा पॉलीप्रॉपीलीन पट्ट्यांनी झाडांना आधार द्यावा..२. केळी घडाची गुणवत्ता वाढविण्यासाठी काय करावे?घड पूर्ण निसवल्यावर केळफूल वेळीच कापावे.घडावर फक्त ८ ते ९ फण्या ठेवून खालच्या फण्या धारदार विळीने लवकर काढून टाकाव्यात.घड पूर्ण निसवल्यानंतर आणि त्यानंतर १५ दिवसांनी १० लिटर पाण्यात ५० ग्रॅम पोटॅशियम डायहायड्रोजन फॉस्फेट, १०० ग्रॅम युरिया आणि १० मिली स्टीकर मिसळून फवारणी करावी.केळफुल कापल्यानंतर एकदा आणि त्यानंतर ३० दिवसांनी दुसऱ्यांदा १० लिटर पाण्यात २०० ग्रॅम सल्फेट ऑफ पोटॅश मिसळून फवारणी करावी.घडांवर २% ते ६% सच्छिद्रतेच्या पांढऱ्या पॉलिथीन पिशव्यांचे आवरण करावे..३. आंतरपिकांबाबतीत दक्षताकेळीबागेत चवळी, उडीद, मुग, भुईमूग, काकडी, भोपळा, कलिंगड, खरबुज, मिरची आणि वांगी यांसारखी पिके घेणे टाळावे. ही पिके घेतल्यास 'सीएमव्ही' रोग वाढण्याचा धोका वाढतो, त्यामुळे ही पिके लावू नयेत..४. केळीसाठी आच्छादनाचा वापरकेळीच्या दोन ओळींमधील मोकळ्या जागेच्या सुमारे ८०% भागावर ३० मायक्रॉन जाडीचे चंदेरी रंगाचे पॉलीइथिलीनचे आच्छादन करावे.हे आच्छादन आंतरमशागत पूर्ण झाल्यानंतर म्हणजेच नोव्हेंबर महिन्यात करणे योग्य असते..बदलत्या वातावरणात केळीचे व्यवस्थापन:१. अती व सतत पाऊसबागेत साचलेले पाणी लगेच बाहेर काढावे.जर सतत पावसामुळे जमिनीतून किंवा ठिबकाने खते देणे शक्य नसेल, तर खते पाण्यात मिसळून पानांवर फवारणी करावी..२. जोराचा वाराजोरदार वाऱ्यामुळे केळीची पाने फाटतात आणि झाडे पडून नुकसान होते.हे नुकसान कमी करण्यासाठी बागेभोवती दोन मीटर अंतरावर कुंपण पिकाच्या दोन ओळी लागवडीच्या वेळीच लावाव्यात.कुंपण पिकासाठी शेवरी या पिकाचा वापर करावा..३. कमी तापमानथंडीच्या काळात रात्री झाडांना पाणी द्यावे.सकाळी लवकर बागेत ओला पाला आणि पाचोळा जाळून धूर करावा.झाडाच्या वयानुसार २५० ग्रॅम ते १००० ग्रॅम निंबोळी ढेप प्रती झाड द्यावी.थंडीपासून घडांचे संरक्षण करण्यासाठी सहा टक्के छिद्र असलेल्या पांढऱ्या प्लास्टिकच्या पिशवीचे आवरण करावे..४. अतिजास्त तापमानउकाड्याच्या काळात झाडांना शिफारशीनुसार पुरेसे पाणी द्यावे.मातीतील ओलावा टिकवण्यासाठी बागेत केळीची पाने, गव्हाचा भुसा, ऊसाचे पाचट किंवा सोयाबीन भुसा वापरून सेंद्रिय आच्छादन करावे.एप्रिलपासून दर पंधरा दिवसांनी १० लिटर पाण्यात ८०० ग्रॅम केओलीन मिसळून केळीच्या पानांवर फवारणी करावी..वारंवार विचारले जाणारे प्रश्न (FAQs)१. केळी बागेत आंतरमशागत कधी आणि कशी करावी?लागवडीनंतर ३ ते ४ महिन्यांपर्यंत नियमित कुळवणी करून बाग स्वच्छ ठेवावी.२. केळीच्या घडाची गुणवत्ता वाढवण्यासाठी काय करावे?घडावर फक्त ८-९ फण्या ठेवून, फवारणी करून आणि पॉलिथीन आवरण लावून गुणवत्ता सुधारते.३. केळी बागेत कोणती आंतरपिके घेऊ नयेत?चवळी, मुग, उडीद, भुईमूग, काकडी, कलिंगड, खरबुज, मिरची, वांगी टाळावीत कारण त्या 'सीएमव्ही' रोग वाढवतात.४. रोगग्रस्त पाने बागेतच ठेवावीत का?नाही, रोगग्रस्त पाने लगेच कापून बागेबाहेर नष्ट करावीत.५. केळीच्या बागेत आच्छादन कधी करावे?नोव्हेंबर महिन्यात आंतरमशागत पूर्ण झाल्यानंतर ३० मायक्रॉन जाडीचे पॉलीइथिलीन आच्छादन करावे..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.