Compost Fertilizer : काडीकचरा, पाचट, धसकटापासून बनवा उत्तम प्रतीच कंपोस्ट खत

Organic Fertilizer : शेतातील काडीकचरा, पालापाचोळा, काढणीनंतरचे पिकाचे अवशेष, पाचट, धसकट हे अनेक शेतकरी जाळून टाकतात. पण या टाकाऊ सेंद्रिय पदार्थांपासून उत्तम प्रतीच कंपोस्ट खत तयार करता येतं.
Compost Fertilizer
Compost FertilizerAgrowon
Published on
Updated on

Organic Farming : शेतातील काडीकचरा, पालापाचोळा, काढणीनंतरचे पिकाचे अवशेष, पाचट, धसकट हे अनेक शेतकरी जाळून टाकतात. पण या टाकाऊ सेंद्रिय पदार्थांपासून उत्तम प्रतीच कंपोस्ट खत तयार करता येतं.

पिकाच्या काढणीनंतर सेंद्रिय पदार्थ मोठ्या प्रमाणात मिळतात. या सेंद्रिय पदार्थांपैकी काही घटक लगेच कुजतात पण काही सेंद्रिय घटकांना कुजण्यासाठी बरेच दिवस लागतात. ऊस तोडणीनंतर हेक्टरी ६ ते ८ टन पाचट मिळते तर गहू काढणीनंतर हेक्टरी २ ते ५ टन गव्हाचे काड मिळते.

Compost Fertilizer
Compost Making : तंत्र कंपोस्ट खत निर्मितीचे...

हे उसाचे पाचट किंवा गव्हाच्या काडापासून जर खत बनवल तर तेव्हड्याच प्रमाणात कंपोस्ट खत मिळत. कंपोस्ट जिवाणूचा वापर केल्यास शास्त्रिय पद्धतीने कुजण्याची प्रक्रिया लवकर होते आणि अन्नद्रव्यांनी युक्त खत मिळते.

कंपोस्ट खत तयार करण्याची पद्धत

कंपोस्ट खत तयार करताना सुरुवातीला न कुजणारे घटक लवकर कुजावेत यासाठी आपल्याला प्रयत्न करावे लागतील. त्यासाठी एका ड्रममध्ये प्रती टन पाचटासाठी १०० किलो शेण, सेंद्रिय पदार्थ लवकर कुजवणारे जिवाणू १ किलो पाण्यात मिसळून मिश्रण तयार करावे. तर दुसऱ्या ड्रममध्ये पुरेसे पाणी घेऊन प्रती टन पाचटासाठी ८ किलो युरिया आणि १० किलो सुपर फॉस्फेट मिसळून द्रावण तयार करावे. त्यानंतर उसाच्या पाचटाचे किंवा उपलब्ध असलेल्या कोणतेही सेंद्रिय पदार्थ आणि काडीकचऱ्याचे शक्य तेवढे बारीक तुकडे करावेत.

खोल खड्डा करुन या तुकड्यांचा खड्ड्यात २० सेंमी जाडीचा थर द्यावा.या पाचटाच्या थरावर युरिया आणि सुपर फॉस्फेट चे तयार केलेले द्रावण शिंपडून नंतर शेणकाला आणि जिवाणूचे मिश्रण प्रत्येक थरावर सारख्या प्रमाणात टाकावे त्यानंतर आवश्यकतेनूसार जास्तीचे पाणी टाकावे. जेणे करुन कंपोस्ट केलेला काडीकचरा ओला राहील. पण खड्ड्यात पाणी साठणार नाही. अशा पद्धतीने थरावर थर देऊन खड्डा मातीने अगर शेणाने झाकून घ्यावा म्हणजे खड्ड्यातील पाण्याचे बाष्प होऊन उडून जाणार नाही. दीड महिन्याच्या अंतराने खड्ड्यातील खताची चाळणी करावी. आणि गरज असेल तर पाणी टाकावे.

असे केल्याने चार ते साडे चार महिन्यात चांगले कुजलेले कंपोस्ट खत तयार होते.चांगल्या कुजलेल्या कंपोस्ट खतामध्ये १ ते १.५ टक्के नत्र आणि कर्ब आणि नत्राचे गुणोत्तर २०:१ राहते असे चांगल्या प्रतीचे कंपोस्ट खत वापरल्याने जमिनीची सुपीकता तर वाढतेच याशिवाय पिकांचे उत्पादन वाढण्यासही मदत होते. कंपोस्ट खत रासायनिक खतांची उणीव संपुर्णपने भरुन काढत नसले तरी कंपोस्ट खत रासायनिक खतांना पूरक म्हणून वापरणे फायद्याचे आहे. त्यामुळे तुम्हीही शेतातील पिकाचे अवशेष जाळून टाकण्यापेक्षा त्याच कंपोस्ट खत तयार करा.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com