Crop Management : वाढीच्या अवस्थेनूसार खरीप पिकांचे नियोजन कसे कराल?

अनेक खरीप पिकाच्या वाढीच्या अवस्था विचारत घेऊन पिकाचे नियोजन करावे.
Rice Crop
Rice CropAgrowon
Published on
Updated on

अनेक खरीप पिकाच्या वाढीच्या अवस्था विचारत घेऊन पिकाचे नियोजन करावे. पिकाचे कीड व रोगा (Crop Pest, Diseases) संदर्भात नियमित सर्वेक्षण करून जर प्रादुर्भाव आर्थिक नुकसान पातळीच्या वर असल्यास योग्य त्या उपाययोजना कराव्यात. ज्या भागात पाऊस उशिरा झाला असेल अशा भागात आपत्कालीन पीक नियोजन करताना १५ ऑगस्टपर्यंत तूर, सूर्यफूल, मका, बाजरी व त्यानंतर ऑगस्ट अखेर सूर्यफूल किंवा एरंडी या पिकांची पेरणी करावी. डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाने केलेल्या शिफारशीनूसार विविध पिकात पुढीलप्रमाणे व्यवस्थापन करावे.


- भात (Rice) रोपांची लावणी राहिली असल्यास ती करुन घ्यावी. रोपांची मुळे रुजेपर्यंत भात खाचरातील पाण्याची पातळी एक इंच ठेवावी. पावसात खंड पडल्यास वारंवार डवरणी करून जमीन भुसभुशीत ठेवावी. डवरणी करताना डवऱ्याने जानकुळास नारळी दोरी गुंडाळून पिकांच्या ओळीत चर काढावेत. त्यामुळे पडणारे पावसाची पाणी जागेवरच मुरेल. जास्तीचे पाणी शेततळ्यात साठवावे. पावसाचे पाणी शेताबाहेर जाणार नाही याची काळजी घ्यावी.

Rice Crop
Paddy : चारसूत्री भात लागवड तंत्रज्ञान

- पिकावर लेडी बर्ड बीटल, क्रायसोपा हे मित्र कीटक व किडी मावा, तुडतुडे, फुल किडे, अळ्या व बोंड आळी यांचे प्रमाण १:५ आढळल्यास रासायनिक कीटकनाशकाऐवजी ५ टक्के निंबोळी अर्काची (५ किलो निंबोळ्यांचा अर्क अधिक वीस ग्रॅम साबण पावडर अधिक शंभर लिटर पाणी) फवारणी करावी.


- बोंड अळ्यांच्या प्रादुर्भावाचा आढावा घेण्यासाठी ४० ते ४५ दिवसांनी प्रत्येकी पाच कामगंध सापळे प्रति एकरी उभारावेत. सोबतच टी आकाराचे २५ पक्षी थांबे प्रति हेक्टरी उभारावेत.


- मॉन्सूनपूर्व कपाशीची अर्धवट उमललेली फुले गुलाबी बोंड अळीग्रस्त डोमकळ्या तोडून जाळावीत. कपाशीचे पीक फुलोरा अवस्थेत असताना दोन टक्के युरिया (२०० ग्रॅम युरिया दहा लिटर पाण्यात मिसळणे) ची फवारणी करावी.


- खरीप भुईमुगास ५० टक्के फुलोरावस्थेत हेक्टरी ४०० किलो जिप्सम देऊन डवरणीने भर द्यावी.

Rice Crop
Sugarcane:शेतकऱ्यांचा कल यंत्रांमार्फत ऊस तोडणीकडे

सोयाबीन पीक फुलोरा अवस्थेत असताना २ टक्के युरियाची फवारणी करावी.


- सुरू उसाची पक्की बांधणी (लागवडीपासून १६ ते १८ आठवड्यांनी) राहिली असल्यास हेक्टरी २५० किलो १९:१९ खत देऊन त्वरित आटोपावी. पावसात खंड पडल्यास दर १० दिवसांनी ओलीत करावे.


- मका पिकावर नवीन लष्करी अळीचा प्रादुर्भाव वाढू नये यासाठी सर्वेक्षण करून ५ टक्के निंबोळी अर्क फवारावा.


- उसावरील पायरीला कीडीचे अंडीपुंज असलेली खालची दोन ते तीन पाने तोडून जाळावीत.


- मुळ्याच्या पुसा देशी, पुसा केतकी जातीचे बियाणे ४५ बाय दहा सेंमी अंतरावर वरंब्यावर बी टोकून करावी. यावेळी हेक्टरी ५० किलो नत्र अधिक २५ किलो स्फुरद द्यावे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com