Water Resources : ‘वाल्मी’ संस्थेचा उदय आणि अस्त कसा झाला ?

जलसंपदा विभागातील (Department of Water Resources) अभियंते आणि सिंचन प्रकल्पातील (Irrigation projects) लाभधारकांची एक लाडकी संस्था म्हणजे वाल्मी! वाल्मी प्रशिक्षण हा त्यांच्यासाठी नेहेमीच एक सुखद व आनंददायी अनुभव राहिला.
Walmi Organization
Walmi Organization Agrowon
Published on
Updated on

जलसंपदा विभागातील (Department of Water Resources) अभियंते आणि सिंचन प्रकल्पातील (Irrigation projects) लाभधारकांची एक लाडकी संस्था म्हणजे वाल्मी! वाल्मी प्रशिक्षण हा त्यांच्यासाठी नेहेमीच एक सुखद व आनंददायी अनुभव राहिला. प्रशिक्षणार्थीच्या भावविश्वातला एक हळवा कोपरा असं स्थान म्हणूनच वाल्मीला प्राप्त झालं. त्याची प्रचिती नेहमी फार वेगळ्या पद्धतीने येते. रस्त्यात किंवा एखाद्या कार्यक्रमात अचानक कोणी तरी भेटतं आणि खूप प्रेमाने सांगतं, “सर, मी अमुक साली वाल्मीच्या प्रशिक्षणाला आलो होतो. आयुष्यात पहिल्यांदाच स्टेजवर जाऊन बोललो होतो मी. वाल्मीनं आम्हाला बोलकं केलं.” उत्साहानं आणि आपुलकीनं त्याचं ते वाल्मीबद्दलचे भरभरून बोलणं ही वाल्मीची खरी कमाई!

आज महाराष्ट्रातल्या कोणत्याही सिंचन प्रकल्पात, जलसंपदा विभागाच्या किंवा पाणी वापर संस्थेच्या कार्यालयात तुम्ही गेलात तर तेथे तुम्हाला नक्की माजी वाल्मी-प्रशिक्षणार्थी भेटतील आणि हमखास वरील गोष्टी सांगतील.

दुर्दैवाचे दशावतार
हेवा वाटावा इतकी सदिच्छा व आपुलकी असताना वाल्मीच्या या स्वप्नवत कहाणीमध्ये अचानक दुर्दैवाचे दशावतार का सुरू झाले? ‘आनंदी आनंद गडे’ असा एकूण माहोल असताना वाल्मीवर ‘एक जमाना था वो पलभर हमसे से रहे ना दूर । एक जमाना ये भी हुवा के मिलनेसे मजबूर’ हे शोकगीत गाण्याची पाळी का आली? वाल्मीच्या उदयास्ताची कहाणी या लेखात मांडायचा प्रयत्न केला आहे.

हेतू हा, की प्रतिमा आणि वास्तव यात फरक केला जावा. वाल्मीच्या उदाहरणातून आपण धडा शिकावा, जास्त चांगल्या प्रकारे जलक्षेत्रात संस्था निर्माण कराव्यात आणि सर्वांत महत्त्वाचे म्हणजे जबाबदारीने त्या जपाव्यात.

अस्ताची बीजे
वाल्मीच्या पहिल्या प्रशिक्षण वर्गातील एक प्रशिक्षणार्थी आणि पुढे वाल्मीतच अठ्ठावीस वर्षे नोकरी केलेला एक अध्यापक म्हणून वाल्मीच्या सुवर्णकाळाचा मी केवळ साक्षीदार नव्हतो, तर वाल्मीच्या चढत्या आलेखात माझाही खारीचा का होईना वाटा होता.

वाल्मीच्या अस्ताची बीजे प्रामुख्याने प्रशिक्षण वर्गाच्या अभ्यासक्रमात, भ्रुणहत्या झालेल्या सिंचन क्षेत्र सुधारणांत, संस्थेच्या संरचनेत आणि जलसंपदा विभागाच्या मानसिकतेत आहेत हे हर प्रकारे सांगण्याचा प्रयत्न मी अनेक वेळा केला. पण बंद दरवाजावर दिलेल्या धडका एवढंच त्याचं स्वरूप राहिलं. शेवटी, नोकरीची पाच वर्षे अजून बाकी असताना २०११ मध्ये मी वाल्मीतून बाहेर पडलो...

(सविस्तर लेख वाचा अॅग्रोवनच्या दिवाळी अंकात.)

अॅग्रोवनचा दिवाळी अंक अॅमेझोन वर उपलब्ध.

अंक खरेदीसाठी खालील लिंकवर क्लिक करा -

अॅमेझोन लिंक- https://www.amazon.in/Agrowon-Diwali-ank-Shetmal-vikrichya/dp/8190638173

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com