Bhagirath Organization : ‘भगीरथ' ने दिलं कसं दिलं शाश्‍वत ग्राम विकासाचं सूत्र ?

“रिकामी पिशवी नव्हे, तर भरलेली पिशवी घेऊन गावकरी आठवडा बाजारात जातील, त्या वेळी त्या गावाची आर्थिक समृद्धतेकडे वाटचाल सुरू झाली असे मानता येईल”....
Bhagirath Organization
Bhagirath Organization Agrowon

“रिकामी पिशवी नव्हे, तर भरलेली पिशवी घेऊन गावकरी आठवडा बाजारात जातील, त्या वेळी त्या गावाची आर्थिक समृद्धतेकडे वाटचाल सुरू झाली असे मानता येईल”.... ग्रामविकासाची (Rural Development) व्याख्या सांगणारे हे वाक्य कुण्या तत्त्ववेत्त्याचे नसून ग्रामविकासाचा ध्यास घेतलेल्या डॉ. प्रसाद देवधर (Dr. Prasad Devdhar) यांचे अनुभवाचे बोल आहेत. लोकसहभागातून शाश्‍वत विकास हे ‘भगीरथ'चे सूत्र आहे. (Bhagirath Organisation)

डॉ. देवधर यांनी वैद्यकीय शिक्षण पूर्ण केल्यानंतर झारापमध्ये दवाखाना सुरू केला. गाव आणि पंचक्रोशीतील लोक ज्या वेळी त्यांच्या दवाखान्यात येतात त्यावेळी डॉक्टर त्यांना दोन प्रश्‍न विचारायचे. ते म्हणजे तुम्हाला काय होतंय? आणि तुम्ही काय करता? आजारपणाबद्दल लोकांची उत्तरे वेगवेगळी असायची. परंतु दुसऱ्या प्रश्‍नाचे उत्तर मात्र बहुतांशी लोकांकडून एकच असायचे ते म्हणजे “काय नाय, शेती करतंय”. याच वेळी डॉक्टरांनी जाणले, की शेतीकडे बघण्याचा लोकांचा दृष्टिकोन गौण आहे. त्यांच्यामध्ये शेतीविषयी नकरात्मकता आहे.

Bhagirath Organization
Agriculture Labors : मजूर खरंच मजेत आहेत का ?

लोकांमध्ये शेतीविषयी न्यूनगंड का तयार झाला? याचा शोध घेण्याचे त्यांनी ठरविले. गावागावांतील बुजुर्ग शेतकरी, कृषितज्ज्ञ, सामाजिक क्षेत्रात काम करणाऱ्या मंडळींशी चर्चा केल्यानंतर एक सत्य बाहेर आले, ते फार भयावह होते. शेती परवडत नाही, या एकमेव कारणामुळे लोकांचा शेतीकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलला होता. शेती परवडत नाही ही समस्या असेल तर त्यावर उपायदेखील असलाच पाहिजे आणि तो उपाय आपण शोधून लोकांना दिला पाहिजे. जेणेकरून लोकांच्या मनात शेतीविषयी असलेला न्यूनगंड नाहीसा होईल. यासाठी शाश्‍वत आणि किफायतशीर शेतीचा पर्याय दिला तरच ते शक्य आहे. हाच विचार करून २००४ मध्ये डॉ. देवधर यांनी भगीरथ प्रतिष्ठानची सुरुवात केली.

गावांच्या प्रश्‍नांचा अभ्यास ः

डॉ. देवधर यांनी ‘भगीरथ’च्या माध्यमातून सुरुवातीला झाराप परिसरातील गावांचा अभ्यास केला. यामध्ये असे लक्षात आले, की गावातील बहुतांशी लोकांकडे उपजीविकेचे शाश्‍वत साधन उपलब्ध नाही. अनेकांचा उदरनिर्वाह चाकरमान्यांच्या मनिऑर्डरवर आहे. अनेक गावांत पिण्याच्या पाण्याचे दुर्भिक्ष आहे. काही गावात पाण्याची सुविधा आहे. काही शेतकऱ्यांकडे गायी, बैल आहेत, परंतु दुग्ध व्यवसाय करण्याची मानसिकता नाही.

‘भगीरथ'ने प्रत्येक गोष्टींचा बारकाईने विचार सुरू केला. प्रश्‍नांच्या मुळाशी जात ते समजून घेण्याचे धोरण ठेवले. प्रत्येक प्रश्‍नाला उत्तर असतेच, मात्र ते आपण शोधायचे, हाच मंत्र घेऊन संस्था कामाला लागली. लोकांच्या अडचणी लक्षात घेऊन ग्रामविकासाचे सूत्र निश्‍चित केले. संस्थेने शेती, पूरक उद्योग, महिला सक्षमीकरण, शिक्षण, आरोग्य, जलसंधारण, पर्यावरण संवर्धन या क्षेत्रावर काम सुरू केले. राज्यातील शेतीमधील होणारे बदल शेतकऱ्यांना पटवून देण्यात आले.

परसबागेतील कुक्कुटपालनाला चालना ः

संस्थेने पहिल्यापासूनच शेतीला पूरक उद्योगाची जोड देण्यावर भर दिला. कुक्कुटपालन, दुग्ध व्यवसाय, शेळीपालन या पारंपरिक व्यवसायवृद्धीसाठी भगीरथने प्रयत्न सुरू केले. सुरुवातीला अनेक अडचणी आल्या. घरखर्च भागेल इतके उत्पन्न परसबागेतील कुक्कटपालनातून मिळू शकेल हे महिलांना पटवून देण्यात आले. कुक्कुटपालन करण्यास इच्छुक महिलांना संस्थेमार्फत मोफत

प्रशिक्षण त्यांच्या गावात जाऊन देण्यास सुरुवात झाली. खरे तर अशा पद्धतीचा प्रयोग महिलांना नवीन होता....

(सविस्तर लेख वाचा अॅग्रोवनच्या दिवाळी अंकात.)

अॅग्रोवनचा दिवाळी अंक अॅमेझोन वर उपलब्ध.

अंक खरेदीसाठी खालील लिंकवर क्लिक करा -

अॅमेझोन लिंक- https://www.amazon.in/Agrowon-Diwali-ank-Shetmal-vikrichya/dp/8190638173

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com