Maharudra Manganale: ...म्हणून खुल्या शेळीपालनाला माझा विरोध

गेल्या वर्षीपासून उन्हाळ्यातही शेतातून शेळ्या नेण्याला मनाई करतोय. त्यासाठी अनेकांशी कटकटी कराव्या लागतात.
goat
goatAgrowon

महारूद्र मंगनाळे

ग्रामीण भागात नवी झाडं न वाढण्याचं महत्त्वाचं कारण शेळी हेही एक आहे.

शेळ्या पहिल्यांदा झाडा-झुडपांचे शेंडे खातात. पुन्हा इतर पाल्यावर ताव मारतात.

एकदा शेंडा खुडला गेला की, त्या झाडाची वाढ खुंटते. ज्या रानात शेळ्या चरण्यासाठी फिरतात,

तिथे झाडं वाढूच शकत नाहीत. त्यामुळे खुल्या शेळीपालनाला माझा विरोध आहे.

अनेक वर्षे आमचं शेत या शेळ्यांसाठी चरण्याचं हक्काचं ठिकाण होतं. त्यांचा हक्क मोडून काढण्यासाठी खूप त्रास झाला.

जेसीबीने शेतातील सगळ्या काटेरी जाळ्या काढून टाकल्या, त्या केवळ शेळ्यांचा त्रास कमी व्हावा म्हणून.

गेल्या वर्षीपासून उन्हाळ्यातही शेतातून शेळ्या नेण्याला मनाई करतोय. त्यासाठी अनेकांशी कटकटी कराव्या लागतात.

मोकळ्या रानात काय आहे, असं विचारणाऱ्यांना धुऱ्यावर उगवलेल्या कडूनिंबाच्या व इतर झाडांच्या पालव्या दिसत नाहीत.

शेळ्या या पालव्यांना कायमचं खुरटं करतात ते कळत नाही.

शेळी ही उगवत्या, वाढत्या झाडा-झुडपांची शत्रू आहे. त्यामुळे माझा खुल्या शेळीपालनाला तीव्र विरोध आहे.

खुल्या शेळीपालनाचं समर्थन करणं म्हणजे जंगलवाढीला विरोध, एवढा साधासोपा याचा अर्थ आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com