Media and Agriculture : शेवटी जाळीचा पिंजरा घेऊन उडालेच पाहिजे

शेतकरी आपल्या मागण्या एकत्रित येऊन मांडणार नाहीत, एकत्रित आले तरी वरील मुद्द्यांच्या आधारे त्यांना फोडता येणे शक्य आहे. एकगठ्ठा-ठोक मतदानावर परिणाम करणारा हा वर्ग नाही, हे या प्रत्येक व्यवस्थेला १०० टक्के माहिती आहे.
Agriculture
AgricultureAgrowon

सुशांत हिरालाल सुर्वे

काल सोशिअल मीडियाच्या माध्यमातून, कृषी पत्रकार-शेतकरी संवाद या विषयावर चर्चा करण्यात आली. चर्चेचा समारोप सारांश म्हणजे, हे लेखाला दिलेले शीर्षक आहे. शालेय जीवनातील हि गोष्ट.

शिकारीच्या पिंजऱ्यामध्ये चिमण्या अडकतात, त्यात एक चिमणी पंख फडकवते-नंतर सर्व चिमण्या सोबत पंख फडकवतात, परिणाम असा कि तो पिंजरा घेऊन त्या आकाशात उडतात.

निरागस अशा चिमण्यांच स्वतःच विश्व असत...शिकारीच्या पिंजऱ्यांची त्यांना कल्पना नसते. आजच्या कृषी क्षेत्राची परिस्थिती ही अशीच आहे.

राजकीय व्यवस्था असो, व्यापारी व्यवस्था असो वा शेती करत असताना जिथे आर्थिक बाबींचा संबंध येतो अशी व्यवस्था असो.ही प्रत्येक व्यवस्था या शेतकऱ्यांवर शिकारी पिंजरा टाकणेसाठी तयार असते. संघटित नसलेले शेतकरी, विविध जाती-धर्म-पक्ष-संघटना यांच्या आधारावर फोडता येतात असे ही व्यवस्था गृहीत धरून चालते.

शेतकरी आपल्या मागण्या एकत्रित येऊन मांडणार नाहीत, एकत्रित आले तरी वरील मुद्द्यांच्या आधारे त्यांना फोडता येणे शक्य आहे. एकगठ्ठा-ठोक मतदानावर परिणाम करणारा हा वर्ग नाही, हे या प्रत्येक व्यवस्थेला १०० टक्के माहिती आहे.

त्यामुळे कोणतीही व्यवस्था असो, शेतकऱ्यांना तितकेसे गृहीत धरीत नाही ही परिस्थिती आहे.

विरोधी पक्ष हा शेतकऱ्यांची बाजू घेणारा पक्ष असतो, सरकार मध्ये तो पक्ष गेला की शेतकऱ्यांचा त्यांना विसर पडतो. राजकीय व्यवस्थेला, शेतकरी समस्यांचे भांडवल करून सत्तेत यायचे असते. सत्तेत आल्यावर या समस्यांचे त्यांना देखील विसर पडतो. याला काही राजकीय नेते अपवाद असतात, पण असे अपवाद फार क्वचितच दिसतात.

Agriculture
Indian Agriculture : शेतजमिनी जिवंत करूया...

खेदाची गोष्ट म्हणजे, कृषीप्रधान भारत देशामध्ये, शेतकऱ्यांची बाजू ठामपणे मांडणारी एखादी वृत्तवाहिनी सुद्धा नाही. २४ तास चालणाऱ्या,न्यूज चॅनेल्स वर..२४ तास शेतात राबणाऱ्या शेतकऱ्यांसाठी, रोज एक कार्यक्रम घ्यावा यासाठी १ तास पण नाही, हि किती मोठी शोकांतिका आहे. काही चॅनेल्सचे स्वागत आहे.

की जे कृषीचा एखादा कार्यक्रम किमान १० मिनिट तरी दाखवतात, पण ज्यांनी हे कार्यक्रम पाहायला हवे, असे ग्राहक-व्यवस्थेतील लोक साखरझोपेत असताना हे कार्यक्रम दाखवले जातात. प्राईम टाइममध्ये, संध्याकाळच्या वेळी कृषीसाठी जागा एकही चॅनेलवर नाही. सकाळी उठून, फक्त शेतकरीच त्या बातम्या बघत असतील तर त्याचा उपयोग काय..?

एखादी सक्सेस स्टोरी दाखवली तर तिच्यातून प्रेरणा मिळते, पण कृषीमधील समस्यांच्या बातम्यांसाठी संध्याकाळच्या ब्रेकिंग न्युज मध्ये पण काही जास्त वेळ मिळणे आवश्यक आहे. इतर देशांमध्ये कृषी संशोधन साठी जितका प्रयत्न सरकारी पातळीवर केला जातो, भारतात तो नाही हे मुद्दे पण चर्चेत आले.

संशोधन वा एखादी योजना, ती सरकारपासून ते शेतकऱ्यापर्यंत पोहचेपर्यंत त्यात किती गळती होते हे सर्वश्रुत आहे. नेहमीच एखादी वृत्तवाहिनी शेतकऱ्यांची बाजू, बातमी..कोणतेही आंदोलन वैगरे कारण नसताना त्यांच्या प्राईम टाइम मध्ये दाखवत बसेल हे शक्य नाही...! मीडिया मध्ये शेतीसाठीच्या बातमीचा प्राधान्यक्रम हा बऱ्यापैकी खाली आहे हे पण खरे आहे.

तसेच आपला जेवढा समज आहे, तितका वृत्तवाहिन्यांचा वचक सरकारवर राहिला नाही हे हि तितकेच कटू सत्य आहे. सारांश, कृषी पत्रकारिता वेळोवेळी, चॅनेल परवानगी देईल तितक्या वेळेत शेतकऱ्यांच्या यशोगाथा, समस्या सरकार दरबारी पोहचवण्याचे काम करत आहे.

मध्यंतरी दोन चार वर्षांपासून बंद असलेले कृषी विषयक कार्यक्रम परत काही वाहिन्यांनी चालू केले आहेत. पुढे प्राईम टाइम मधेही कृषीला जागा मिळेल अशी अपेक्षा आहे. परंतु, या वृत्तवाहिन्या, सर्व शेतकरी समस्यांना पूर्णतः न्याय देऊ शकतील हि भाबडी आशा आहे...!

Agriculture
Indian Education : आयटीआय, डिप्लोमा इंजिनिअरिंग आणि इंजिनिअरिंग

आता चॅनेल परवानगी देईल तितक्या वेळेत, कृषी समस्या दाखवता येतील. पण त्याहूनही अधिक आता तंत्रज्ञानाच्या आधारे शेतकऱ्यांनी एकत्रित येणे, एकमेकांच्या समस्या सोडवणे, एकमेकांना मदत करणे, एकमेकांच्या अनुभवातून शिकणे, कृषी-शिक्षित होणे, सरकारी व्यवस्थेवर दबाव निर्माण होईल इतक्या प्रमाणात संघटित होणे, अथवा मग सरकारी व्यवस्थेवरील परावलंबित्व सोडून देणे हेच पर्याय आहेत. हे कृषी पत्रकारिता क्षेत्राने शेतकऱ्यांना सांगितले.

आमच्या शेतीतून आम्ही सक्षमपणे उत्पन्न घेऊ शकतो, पण आमच्या मार्केट मध्ये सरकारने हस्तक्षेप करू नये. बाजार वाढले कि निर्यातबंद, आयात चालू असे सरकारने करू नये. कृषिप्रधान देशात, शेती औषधे घेण्यासाठी शेतकरी दुकानदारावर अवलंबून राहतो..

यापेक्षा पहिलीपासून अभ्यासक्रम मध्ये कृषी क्षेत्राचा समावेश करावा, शेतकऱ्यांच्या यशोगाथांसोबत अनुभवकथन, त्यांच्या फैल्यूअर स्टोरी सुद्धा जगासमोर येणे गरजेचे आहे. त्याला न्युज चॅनेलच्या डिजिटल प्लॅटफॉर्म वर किमान जागा मिळावी हि अपेक्षा शेतकऱ्यांनी व्यक्त केली.

आज तंत्रज्ञानाच्या माध्यमातून, अनेक शेतकरी एकत्रित येत आहे. शेतकरी ते शेतकरी एक्सटेंशन चे काम मोठ्या प्रमाणात होत आहे. पूर्वीसारखे एखादे कृषी कार्यक्रम, शेतकरी शास्रज्ञ मंच, कृषी विभाग मेळावे, मासिक-पेपर मधून होणारे कृषी विस्तार चे काम आता या सोशिअल मीडिया माध्यमातून होत आहे.

याकामी जे काही नवीन येत आहे त्या कृषीपयोगी तंत्रज्ञानाची माहिती आज फार्मर टू फार्मर एक्सटेंशन-सोशिअल माध्यमांची शेतकऱ्यांना ओळख या संकल्पनांचे जनक, जेष्ठ कृषी पत्रकार श्री दीपक चव्हाण सर देत असतात.

आज कोणत्याही यंत्रणांची मदत न घेता, एकमेका साहाय्य करू..अवघे होऊ यशस्वी या प्रकारे चालू असलेली कृषी विस्ताराची मालिका, आज अनेकांना उपयोगी पडत आहे. व भविष्यात हि हि मालिका शेतकऱ्यांना फलदायक ठरेल यात शंका नाही.

असेच एकत्रित प्रयत्न होत राहिले तर नक्कीच, सध्याचा जाळीचा पिंजरा घेऊन आपण नक्कीच उडू, व भविष्यात असे जाळे आपल्याभोवती पडणार नाहीत, किंबहुना कोणतेही जाळे कमी पडेल एवढा मोठा एकत्रित थवा आपला बनवा हि या निमित्ताने अपेक्षा.

(लेखक डाळिंबशेती मार्गदर्शक आहेत)

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com