किस्से आळेफाट्याचे : फिल्डिंग

चार कच्ची बच्ची पदरात टाकून शांतीचा नवरा वारला. तीन मुली व तान्हा मुलगा. हिशेबाला दोन एकर जमीन. जगायचं आणि झुंजायचं कसं.
फिल्डिंग
फिल्डिंगAgrowon
Published on
Updated on

संतोष डुकरे

चार कच्ची बच्ची पदरात टाकून शांतीचा नवरा वारला. तीन मुली व तान्हा मुलगा. हिशेबाला दोन एकर जमीन. जगायचं आणि झुंजायचं कसं.

शांती मोलमजूरी करु लागली. घरच्या शेतात काबाडकष्ट उपसून मुलांना शिकवू लागली. पण शिक्षण, मुलींची लग्न हा एकट्या बाईचा आन् दोन पाच हजाराचा घास नाही, हे शेजारच्या वावरावाल्यानं, बांधभावानं हेरलं. आज ना उद्या शांती जमीन इकणार. या आडाख्यानं बहादरानं फिल्डींग लावली.

फिल्डिंग
Indian Marriage : लग्नातील बदलते मध्यस्थ

यानं शांतीला वावराचं टच गेलं. 18 चा भाव चालला असताना 10 चा खडा टाकला. ती वावार इकडाचंच नाही म्हणाली. मग यानं नाकेबंदी सुरु केली. पहिल्यांदा शांतीला नात्यानं सगळ्यात जवळचा आधार असलेल्या तिच्या चुलत दिराशी जिगरी दोस्ती केली. एकत्र फिरणं खाणं पिणं. मग खरेदीसाठीच्या इतर संभाव्य इच्छूकांना प्रेम, साम, दाम, दंड, भेद वापरुन गार केलं. शांतीला पर्यायच ठेवला नाही.

दोन, चार, सहा, सोळा, वीस वर्ष झाली. शांतीवर जमीन विकायची वेळ आली. एवढी वर्षे कसंबसं रेटलं. आता मुलाच्या कॉलेजची भरमसाठ फी. मुलींची लग्न. कुणाकडं हात पसरणार. रीन काढून सण होईलही. पण परतफेडीचं काय. पाणी आन् बाजाराचा काय भरवसा.

आपला बहाद्दर एव्हाना खुशित गाजरं खात होता. दिराकडून चालू घडामोडी, घरातल्या बातम्या समजत होत्या. त्याची एवढ्या वर्षाची फिल्डींग आता कामी येणार होती. अशातच गावभर बातमी परसली. शांतीनं 40 लाखाला वावर इकलं. ते सुद्धा याच्यासह काही बहाद्दर चांडाळ चौकडीनं गावाबाहेर काढलेल्या तुक्याला. बहाद्दर अजून या धक्क्यातून सावरलेला नाही.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com