Crop Loan : मेअखेर यवतमाळ मधील ५० टक्के पीककर्जाचे वितरण करा : जिल्हाधिकारी येडगे

Crop Loan Update : ‘‘खरीप हंगाम २०२३’ साठी शेतकऱ्यांना पीककर्जाची आवश्यकता आहे. या वर्षी सर्व बँकांना मिळून दोन हजार कोटी रुपयांचा लक्ष्यांक आहे.
Crop Loan
Crop LoanAgrowon

Kharif Season Yavatmal : ‘‘खरीप हंगाम २०२३’ (Kharif Season 2023) साठी शेतकऱ्यांना पीककर्जाची (Crop Loan) आवश्यकता आहे. या वर्षी सर्व बँकांना मिळून दोन हजार कोटी रुपयांचा लक्ष्यांक आहे.

आजपर्यंत केवळ २१ टक्के कर्जवितरण झाले आहे. ही रक्कम मागील वर्षाच्या तुलनेत कमी आहे.

सर्व बँकांनी त्यांना दिलेल्या लक्ष्यांकाच्या ५० टक्के कर्जवाटप मेअखेरपर्यंत पूर्ण करावे,’’ असे निर्देश जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी दिले.

जिल्हाधिकारी कार्यालयातील महसूल भवनात बँकर्सची जिल्हास्तरीय समन्वय समितीची बैठक झाली. त्यात अध्यक्षस्थानावरून जिल्हाधिकारी येडके बोलत होते.

नाबार्डचे जिल्हा विकास व्यवस्थापक दीपक पेंदाम, लीड बँकेचे व्यवस्थापक अमर गजभिये, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी नवनाथ कोळपकर, जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी क्रांती काटोले, ‘आत्मा’चे प्रकल्प संचालक संतोष डाबरे, एसबीआयचे श्रीकांत कोहळे, बँक ऑफ बरोदाचे आर. एम. सोमकुंवर, बँक ऑफ इंडियाचे सचिनचंद्र पाटीदार, वायडीसीसीचे सिद्दिकी आदी उपस्थित होते.

Crop Loan
Crop Loan : सातारा जिल्ह्यात १०२ टक्के पीककर्जाचे वितरण

श्री. येडगे यांनी पीककर्ज, पीएम किसान योजनेसाठी आधार सिडिंग, महात्मा जोतीराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना, शासकीय अनुदानित योजनांचा आढावा घेतला.

ते म्हणाले, ‘‘शेतकऱ्यांना वेळेत कर्ज उपलब्ध झाल्यास ते उपयुक्त ठरते. त्यांना बियाणे, खते व लागवडीची तयारी करण्यासाठी कर्जाची रक्कम कामी येते.

त्यामुळे जून अखेरपर्यंत पीककर्जाचा १०० टक्के लक्ष्यांक पूर्ण करण्याचा प्रयत्न बँकांनी करावा.’’

Crop Loan
Crop Loan : खरीप हंगामात १०१ टक्के पीककर्जाचे उद्दिष्ट्य साध्य

बँक खात्याशी आधार लिंक करा`

येडगे म्हणाले, ‘‘या वर्षी केंद्र सरकार सोबतच राज्य सरकारसुद्धा पीएम किसान योजनेसारखी योजना राबवीत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचे ई-केवायसी व आधार सीडिंग करणे महत्त्वाचे आहे.

जिल्ह्यात अद्याप ३६ हजार ८०६ पात्र शेतकऱ्यांचे ई-केवायसी व आधार सीडिंग शिल्लक आहे. त्यापैकी यवतमाळ जिल्हा बँकेकडे सर्वाधिक २५ हजार २८० शेतकऱ्यांचे आधार ई-केवायसी व सीडिंगचे काम शिल्लक आहे.

यांनी यासाठी विशेष व्यवस्था करून येत्या २५ मेपर्यंत सर्व बँकांनी आधार सीडिंग पूर्ण करावे. त्यासाठी ग्रामस्तरावर सूचना देऊन शेतकऱ्यांची यादी व बँकेचे नाव कळवावे, अशा सूचना येडगे यांनी दिल्या.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
document.addEventListener("qt-page-data", (e) => { console.log(e.detail); })
Agrowon
agrowon.esakal.com