Crop Advisory : कृषी सल्ला ः कोकण विभाग

मुंबई येथील प्रादेशिक हवामान केंद्राद्वारे प्राप्त हवामान अंदाजानुसार कोकण विभागामध्ये १७ ते २१ डिसेंबर दरम्यान हवामान कोरडे राहण्याची शक्यता आहे. कमाल तापमानात फारसा बदल संभवत नाही.
Crop Advisory
Crop AdvisoryAgrowon
Published on
Updated on

हवामान अंदाज

मुंबई येथील प्रादेशिक हवामान केंद्राद्वारे (Regional Weather Station) प्राप्त हवामान अंदाजानुसार (Weather Forecast) कोकण विभागामध्ये १७ ते २१ डिसेंबर दरम्यान हवामान कोरडे (Dry Weather) राहण्याची शक्यता आहे.

कमाल तापमानात फारसा बदल संभवत नाही. कमाल तापमान ३५ ते ३६ अंश सेल्सिअस दरम्यान राहील. किमान तापमानात क्रमश: घट होण्याची शक्यता असून किमान तापमान १७ ते २० अंश सेल्सिअस दरम्यान राहिल. आकाश मुख्यत: निरभ्र राहील. विस्तारित श्रेणी अंदाजानुसार (ईआरएफएस) कोकण विभागात दि. २१ ते २७ डिसेंबर दरम्यान कमाल व किमान तापमान हे सरासरीइतके राहण्याची शक्यता आहे.

Crop Advisory
Crop Advisory : कृषी सल्ला ः कोकण विभाग

चवळी

वाढीची अवस्था

चवळी पीकाला ८ ते ९ दिवसांच्या अंतराने पाणी देण्याची व्यवस्था करावी.

पेरणीनंतर १५-२० दिवसांनी कोळपणी करून पीक तणमुक्त ठेवावे.

Crop Advisory
Mango crop Advisory : मोहोर अवस्थेतील आंबा बागेचे व्यवस्थापन

मोहरी

वाढीची अवस्था

मोहरी पीक पेरणीनंतर १० ते १२ दिवसांनी एक कोळपणी करून रोपांची विरळणी करावी. दोन रोपांतील अंतर १०-१२ सें.मी.ठेवावे.

मिरची

वाढीची अवस्था

मिरची पिकावर फुलकिडीचा प्रादुर्भाव दिसून येत आहे. या किडी पानातील रस शोषून घेतल्याने मिरचीची पाने सुरकुतून त्यांची वाढ खुंटते. प्रादुर्भाव दिसून येत असल्यास नियंत्रणासाठी, फवारणी प्रति लिटर पाणी

फिप्रोनील (५ टक्के प्रवाही) १.६ मि.लि.

फवारणी सकाळी किंवा संध्याकाळी पानांच्या दोन्ही बाजूंस बसेल अशी करावी.

पिकामध्ये निळ्या रंगाचे चिकट कागदाचे सापळे लावावेत.

हलके पाणी देत असलेल्या मिरची पिकामध्ये फुलकिडीच्या नियंत्रणासाठी व्हर्टिसिलियम लेकॅनी किंवा बिव्हेरिया बॅसियाना ५ ग्रॅम किंवा ५ मि.लि. प्रति लिटर पाणी या प्रमाणे फवारणी करावी.

मत्स्यशेती

माशांना खाद्य देताना सुरुवातील माशांची वाढ व आकार लक्षात घेता लहान आकाराचे खाद्य शरीराच्या वजनाच्या ८ ते १० टक्के दराने द्यावे. जसजसे मासे मोठे होतील, त्या प्रमाणे खाद्याचे प्रमाण शरीराच्या वजनाच्या ६%, ४% व २% द्यावे.

खाद्यातील प्रथिनांचे प्रमाण ३४%, ३२%, २८%, २६%, २४% व २०% या प्रमाणात कमी करावे. त्याच वेळी मत्स्य खाद्य गोळीचा आकार वाढवत जावा. सर्वसाधारणपणे मासा ५० ग्रॅम असेपर्यंत १ मि.मी., १०० ग्रॅम असेपर्यंत २ मि.मी., २५० ग्रॅम असेपर्यंत ३ मि.मी. व नंतर ४ मि.मी. आकाराचे मत्स्य खाद्य गोळी द्यावी. खाद्य दिवसातून ४ वेळा विभागून द्यावे. अगदीच शक्य नसल्यास २ वेळा द्यावे.

मधुमका

वाढीच्या अवस्थेतील लष्करी अळी नियंत्रण

मधुमका पिकावर लष्करी अळीचा (फॉल आर्मीवर्म) प्रादुर्भाव दिसून येतो. या किडीच्या प्रथमावस्थेतील अळ्या पाने कुरतडतात, तर पुढील अवस्थेतील अळ्या पानाच्या पोंग्यात राहून पाने खातात. परिणामी, पान पूर्ण उघडल्यावर त्यात छिद्रे दिसून येतात. एका रोपामध्ये १ ते २ अळ्या असून शकतात. अळीची विष्ठा पानाच्या पोंग्यामध्ये दिसून येते.

फॉल आर्मीवर्मचा प्रादुर्भाव दिसून येणाऱ्या ठिकाणी पिकाची फेरपालट करावी.

शक्यतो मधुमक्याची लागवड एकाच वेळी पूर्ण करावी.

झेंडू पिकाची आंतरपीक (चार ओळी मका + दोन ओळी झेंडू) म्हणून लागवड करावी.

उगवणीनंतर लगेचच प्रति एकरी चार फॉल आर्मीवर्मचे कामगंध सापळे व प्रकाश सापळे लावावेत.

शेतातील बांध गवत काढून स्वच्छ ठेवावेत.

किडीच्या नियंत्रणासाठी निंबोळी अर्क (५ टक्के) किंवा ॲझाडिरॅक्टिन (१० हजार पीपीएम) २ ते ३ मिलि. प्रति लिटर पाणी या प्रमाणे १५ ते २० दिवसांनी फवारणी करावी.

अळीची सुरुवातीची अवस्था दिसताच पिकामध्ये राखेची धुरळणीही फायदेशीर दिसून आली आहे.

प्रादुर्भाव जास्त प्रमाणावर दिसून येत असल्यास, फवारणी प्रति लिटर पाणी

क्लोरॲन्ट्रानिलीप्रोल (१८.५ टक्के प्रवाही) ०.४ मि.लि.

टीप ः फवारणीचे द्रावण पोंग्यामध्ये पडेल असे पाहावे.

कोबी

वाढीची अवस्था

कोबी पिकाची रोपे लागवडीयोग्य झाली असल्यास पुनर्लागवड करावी. लागवड सरी वरंब्यावर ४५ × ४५ सें.मी. किंवा ६० × ६० सें.मी. अंतरावर करावी.

लागवडीच्या वेळेस प्रति गुंठा २०० किलो शेणखत, ८८० ग्रॅम युरिया, ३.७५ किलो सिंगल सुपर फॉस्फेट आणि १ किलो म्युरेट ऑफ पोटॅश खताची मात्रा द्यावी. लागवडीनंतर लगेच पाणी द्यावे.

 ०२३५८ -२८२३८७, ८१४९४६७४०१

डॉ. विजय मोरे, (नोडल ऑफिसर) ९४२२३७४००१

(कृषी विद्या विभाग आणि ग्रामीण कृषी मौसम सेवा योजना, डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ, दापोली)

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com