
कांचन परुळेकर
Fixed capital : घरगुती स्तरावर उद्योगाला सुरुवात केली तरी अत्यंत कमीत कमी जागा भाडे हिशेबात घेणे आवश्यक आहे. उत्पादन खर्चात बँकेला द्यावे लागणारे व्याज आणि स्थिर भांडवलाची झीज घसारा म्हणून पकडावी. बँकेचे हप्त्याने कर्ज फेडण्याची क्षमता प्रकल्प प्रस्तावात दाखविणे आवश्यक आहे.
आपला उद्योग/ व्यवसाय नक्की झाला, त्याची सक्षमता तपासली, की आपण प्रकल्प प्रस्ताव तयार करावा. प्रकल्प प्रस्ताव तज्ज्ञांकडूनच करून घेतला पाहिजे अशी सर्वांची समज असते. लाखो, करोडो रुपये कर्जासाठी ते सक्तीचे करण्यात आले आहे. पण आपण स्वतः छोट्या प्रकल्पाचे प्रस्ताव तयार करू शकतो. फक्त प्रस्तावात कोणत्या बाबी कोणत्या क्रमाने लिहाव्यात हे लक्षात घ्यावे. प्रथम उद्योगाची अतिशय कमी शब्दात पार्श्वभूमी. त्यानंतर मासिक कामाचे दिवस, दररोजची विक्री याचा अंदाज नोंदवावा लागेल.
उद्योगासाठी काही गोष्टी एकदाच खरेदी कराव्या लागतात, त्याला स्थिर भांडवल म्हणतात. कच्चा माल, दररोज लागणाऱ्या गोष्टी हे चालू भांडवल असते. जागेचे भाडे, कर्मचारी पगार, लाइट, पाणी हा इतर खर्च चालू भांडवलाचाच प्रकार असतो. स्थिर भांडवल अधिक चालू भांडवल हे आपले एकूण भांडवल ठरते. त्यापैकी आपण स्वत:चे किती टक्के पैसे उभे करणारे व किती कर्ज काढणार हे ठरवावे लागेल. आपली मासिक विक्री – मासिक उत्पादन खर्च = मासिक नफा हे गणित असते. बँकेचा मासिक हप्ता फेडून आपल्या हाती पुरेसे पैसे राहतात का, हे प्रकल्प प्रस्ताव लिहून काढला की नीट समजते. समजण्यास अतिशय सोपे म्हणून चहा व कॉफी स्पॉटचा प्रस्तावाचा आज आपण अभ्यास करूयात.
प्रकल्प प्रस्ताव ः चहा, कॉफी स्पॉट
सर्व साधारण माहिती ः दिवसभर चहा दुकानात ग्राहक येतो. जवळपास कार्यालये असल्यास सातत्याने चहा लागतोच. बारमाही चालणारा हा उद्योग आहे. निर्मिती प्रक्रिया अतिशय सोपी आहे. अंदाजे मनुष्यबळ ः १ कुशल कामगार
कामाचे दिवस ः महिन्याचे २६ दिवस
दररोज चहा विक्री ः १५० फूल कप
दररोज कॉफी विक्री ः ५० फूल कप
अ ) भांडवल खर्च ः यंत्रणा आणि स्थिर संपत्ती
स्टोव्ह किंवा छोटे गॅस युनिट --- १,००० रुपये
मोठी छत्री ---१,००० रुपये
टेबल, २ खुर्च्या ----१,५०० रुपये
बादली, किटली, कप, पातेली, गाळणी----१,५०० रुपये
एकूण ---५,००० रुपये
आ) चालू भांडवल ---- दररोज लागणारा कच्चा माल
साखर (३ किलो, अधिक १.५ किलो) ---१८० रुपये
कॉफी (६० ग्रॅम)---११० रुपये
चहापूड (४५० ग्रॅम)---१५० रुपये
आले (१५० ग्रॅम) ---१५ रुपये
जायफळ (२) ---२० रुपये
दूध (६ लिटर, अधिक ३ लि.) ---५८५ रुपये
पाणी ---२५ रुपये
किरकोळ खर्च ---१०० रुपये
एकूण---१,१८५ रुपये
आ) चालू भांडवल ः कच्चा माल (मासिक)
५२० फुलकांड्यासाठी लागणारे साहित्य (२० × २६ दिवस)
स्टॉकिंग्ज---७ × १५ रु, × २६ दिवस---२,७३० रुपये
तार ---८० × १ रु. × २६ दिवस ---२,०८०
ग्रीन टेप---१ × २० रु. × २६ दिवस ---५२०
पराग ---३ × 5 रु. × २६ दिवस ---३९०
बायडिंग तार ---२० × १ रु. × २६ दिवस ---५२०
दोरा ---१ × ४० ---४०
पॅकिंग पिशव्या ---२० × १ रु. × २६ दिवस ---५२०
पॉटस ---५ × १० रु. × २६ दिवस ---१३००
एकूण ---------------------------८१००
इ.) इतर खर्च (मासिक)
जागा भाडे ---२००
कर्मचारी (मजुरी) ---३५००
वीज, पाणी खर्च---१००
किरकोळ (वाहतूक) ---२००
एकूण ---४०००
एकूण भांडवल
स्थिर ---२०००
चालू ---८१००
इतर ---४०००
एकूण ---१४००
टीप ः १० टक्के स्वतःचे १,४०० रुपये आणि ९० टक्के बँकचे कर्ज १२,७०० रुपये
उत्पादन खर्च (मासिक)
चालू भांडवल---८,१००
इतर----४,०००
२० टक्के घसारा----३५ -----स्थिर भांडवलावर
१२ टक्के व्याज---१३०---बँक कर्जावर
एकूण----१२,२६५
विक्री ः २० नग दररोज × २६ दिवस × ४५ रुपये= २३,४००
नफा ः विक्री २३,४०० – उत्पादन खर्च १२,२६५ =११,१३५ (९० टक्के)
बँकेचा मासिक हफता १,००० रुपये फेडला, तरी १०,१३५ रुपये शिल्लक राहतात.
प्रकल्प प्रस्ताव करताना महत्त्वाच्या गोष्टी ः
१. चहा/ कॉफी मीच करून विकणार, फुले मीच बनविणार मग कामगार खर्च नाही अशी आपली समजूत होते. पण आपण म्हणजे एका कामगाराची मजुरी किंवा पगार गृहीत धरणे आवश्यक आहे.
२. चालू भांडवली खर्चात वस्तू बनविण्यास पाणी, पॅकिंग पिशव्या, गॅस असे किरकोळ खर्चही पकडावे लागतात.
३. घरात बसूनच उद्योग केला, तरी अत्यंत कमीत कमी जागा भाडे हिशेबात घेणे आवश्यक आहे.
४. उत्पादन खर्चात बँकेला द्यावे लागणारे व्याज आणि स्थिर भांडवलाची झीज घसारा म्हणून पकडावी.
५.बँकेचे हप्त्याने कर्ज फेडण्याची क्षमता प्रकल्प प्रस्तावात दाखविणे आवश्यक आहे.
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.