Agriculture Education : बीटेक ॲग्रिकल्चर इंजिनिअरिंगचं शिक्षण घेतल्यावर करिअरच्या काय संधी मिळतात?

वाढत्या सध्याच्या तंत्रज्ञानाच्या युगामध्ये कृषी आणि तंत्रज्ञान या क्षेत्राचे एकत्रीकरण असलेल्या कृषी अभियांत्रिकी (ॲग्रिकल्चर इंजिनिअरिंग) विषयामध्ये भविष्य घडविण्याची उत्तम संधी विद्यार्थिनींसमोर आहे.
Agriculture Education
Agriculture EducationAgrowon

प्रा. विजय नवले

वाढत्या सध्याच्या तंत्रज्ञानाच्या युगामध्ये कृषी आणि तंत्रज्ञान या क्षेत्राचे एकत्रीकरण असलेल्या कृषी अभियांत्रिकी (ॲग्रिकल्चर इंजिनिअरिंग) विषयामध्ये भविष्य घडविण्याची उत्तम संधी विद्यार्थिनींसमोर आहे. भारत हा कृषिप्रधान देश असून, त्याच्या अन्य प्रगत देशांच्या तुलनेमध्ये वेगळ्या समस्या आहेत. त्यावर मात करण्यासाठी हा अभ्यासक्रम महत्त्वाचा ठरणार आहे.

अभ्यासक्रम आणि प्रवेश पात्रता

कृषी अभियांत्रिकीमध्ये (Agriculture Engineering) बी. टेक (बॅचलर ऑफ टेक्नॉलॉजी इन ॲग्रिकल्चर इंजिनिअरिंग) हा चार वर्षांचा पूर्ण वेळ पदवी अभ्यासक्रम (Agriculture Education) गणित विषयासह बारावी शास्त्र (सायन्स वुईथ पीसीएम) या शाखेतून ‘पीसीएम ग्रुप’मध्ये किमान ५०% गुण असावेत.

ओ. बी. सी. आणि एस. सी. /एस. टी. साठी किमान ४५% गुण असावेत. प्रवेशासाठी एमएचटी सीईटी देणे गरजेचे आहे. किमान वय १७ वर्षे पूर्ण असावे.

महाराष्ट्रात बी.टेक ॲग्रिकल्चर साठी महात्मा फुले कृषी विद्यापीठ (राहुरी), वसंतराव नाईक कृषी विद्यापीठ(परभणी), डॉ . पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ (अकोला ) या ठिकाणी शासकीय महाविद्यालये उपलब्ध आहेत.

त्याचबरोबर १२ खासगी कृषी महाविद्यालयेही उपलब्ध आहेत. आरक्षित गटातील आणि सर्वसाधारण प्रवर्गातील विद्यार्थिनींना अनेक आर्थिक सवलती मिळू शकत असल्याने शिक्षणाचा खर्च अन्य शाखांच्या तुलनेत कमी आहे.

Agriculture Education
Agriculture Education : कृषी शिक्षणक्रमात मुलींची दखलपात्र संख्या उज्ज्वल भविष्याची नांदी

संबंधित वेबसाइट्स

‘सीईटी सेल’ची वेबसाइट प्रवेश परीक्षेसाठी उपयुक्त ठरते.

प्रवेशाच्या वेळी या वेबसाइट सोबतच महाराष्ट्रातील कृषी विद्यापीठांच्या वेबसाइट्सवर महत्त्वाची माहिती उपलब्ध केली जाते.

महत्त्वाच्या तारखा ः मे महिन्यात प्रवेशपरीक्षा असतात, त्यानंतर येणाऱ्या महिन्याभराच्या काळात केंद्रीय पद्धतीची ऑनलाइन प्रवेशप्रक्रिया सुरू होते.

अभ्यासक्रमातील विषय : मृदाशास्त्र, मृदा आणि जलसंवर्धन, ऊर्जा, पीक उत्पादन, सिंचन आणि निचरा व्यवस्थापन, अन्नधान्य प्रक्रिया, कृषी यंत्र व अवजारे, डेअरी, अन्न प्रक्रिया अभियांत्रिकी, हरितगृह, या सर्व अभियांत्रिकीसाठी आवश्यक गणित, विज्ञान, रसायनशास्त्र, यांत्रिकी, बांधकाम, विद्युत, इलेक्ट्रॉनिक्स, संगणक, जैविक घटक, उष्णता वहन, शीतकरण, अशा अनेक विषयांचा अभ्यासक्रमात समावेश आहे.

Agriculture Education
Agriculture Education : कृषी शिक्षणात भू-सूक्ष्म जीवशास्त्रावर द्या भर

उच्च शिक्षण संधी : पदवीनंतर या क्षेत्रात ‘एमटेक’ तर कृषी व्यवस्थापन क्षेत्रात एम.बी.ए. करता येते. विविध तांत्रिकी आणि कृषी अभ्यासक्रमामध्ये पदव्युत्तर पदवी किंवा पदविका उपलब्ध आहेत.

पदे आणि कार्यक्षेत्रे : आधुनिक उत्तम अभियांत्रिकी पद्धतींद्वारे कृषी उत्पादन सुधारणे ही कोणत्याही कृषी अभियंत्याची प्रमुख भूमिका असते. त्यासाठी संशोधन, पूरक तंत्रज्ञान, आरेखन, निर्मितीमध्ये मोलाची भूमिका बजावू शकतो.

कृषी अभियंता, कृषी निरीक्षक, पर्यावरण नियंत्रण अभियंते, कृषी विद्या तज्ज्ञ, उत्पादन व्यवस्थापक, विक्री व विपणन अभियंता, सल्ला व मार्गदर्शन सेवा, कृषी तांत्रिकी अधिकारी, आरेखन अभियंता, कृषी तज्ज्ञ, तांत्रिकी अधिकारी या सारख्या अनेक संधी कृषी अभियांत्रिकी पूर्ण केल्यानंतर मिळू शकतात.

यासोबतच शेतीमध्ये ग्रामीण विद्युतीकरण, शेत संरचना, बायोगॅस, कृषी उत्पादनांच्या डिझाइनमधील नवीन तंत्रज्ञान सुधारण्यात कृषी अभियंत्यांना भारतात मोठ्या संधी आहेत.

कृषी अभियांत्रिकीनंतर कृषी क्षेत्र अधिकारी, भारतीय वन सेवा अधिकारी, बँकिंग, नाबार्ड यामध्येही संधी उपलब्ध होतात. त्यासाठी महाराष्ट्र राज्यसेवा किंवा केंद्रीय लोकसेवा आयोगांच्या स्पर्धा परीक्षा देणे आवश्यक असते. सर्वांत महत्त्वाचे म्हणजे कृषी अभियांत्रिकी क्षेत्रामध्ये संशोधनासह, उद्योजकतेला मोठा वाव आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com