नांदेड व यवतमाळ जिल्ह्यांतील सीमावर्ती भागामध्ये आतापर्यंत दुय्यम कीड मानल्या जाणाऱ्या स्टिंक बगचा प्रादुर्भाव वाढत असल्याचे चित्र आहे. यामुळे कपाशी बोंडाची सड होऊन नुकसानीचे प्रमाण वाढत आहे. या किडीच्या नियंत्रणाकडे लक्ष देणे आवश्यक आहे. राज्यामध्ये कपाशी लागवडीखाली क्षेत्र ४२.२ लाख हेक्टरपर्यंत वाढलेले आहे. पूर्वी कापसाबरोबरच ज्वारी, बाजरी, धान (साळ), भुईमूग, सूर्यफूल, तीळ व कारळ इ. अन्य पिकेही लागवडीखाली होती. तसेच देशी कापसाचे क्षेत्रही ३ टक्क्यांपर्यंत कमी झाले आहे. पीक पद्धतीतील बदलाप्रमाणे किडींच्या खाद्यातही बदल झाला. परिणामी कापसाच्या दुय्यम मानल्या जाणाऱ्या स्टिंक बग सारख्या किडीही गेल्या चार -पाच वर्षांमध्ये मुख्य किडी झाल्याचे दिसून येते. सद्यस्थितीमध्ये नांदेड व यवतमाळ जिल्ह्यांतीच्या सीमावर्ती भागात या किडीच्या प्रादुर्भावामुळे डाग पडून रुई काळी होणे व बोंडे सडणे असे प्रकार आढळत आहेत. बीटी कपाशी लागवड वाढल्यामुळे कीडनाशकांच्या फवारण्यामध्ये घट झाली. या फवारण्याद्वारे दुय्यम किडींचाही बंदोबस्त होत असे. यामुळे टोचण किंवा शोषण करण्यायोग्य तोंडाची रचना असलेल्या स्टिंक बग व झाडावरील बग यांचा प्रादुर्भाव वाढत आहे. या किडी प्रामुख्याने बोंडावर प्रादुर्भाव करतात. या किडींचा उद्रेक वाढण्यासाठी सोयाबीन पिकाखालील क्षेत्रातील वाढही कारणीभूत ठरली. सोयाबीन हे स्टिंक बग या किडीसाठी योग्य अश्रित पीक आहे. किडीची ओळख
प्रादुर्भावाचे लक्षण स्टिंक बग प्रौढ प्रथम पाते व बोंडाला छिद्र पाडतो. आतील कोवळ्या सरकीतील रसाचे शोषण करतो. परिणामी बोंडावर बाह्य भागात काळे ठिपके दिसतात. बोंडाच्या सालीवर आतील बाजूस चामखीळीसारखी अतिरिक्त वाढ दिसून येते. अगदी याचखाली रुईवर सुरवातीला पिवळसर चट्टा दिसून येतो. पुढे येथील रुई व सरकी तपकिरी, काळसर होते. रुईवर डाग पडतात. धाग्यांचा गुंता होतो. कोवळ्या सरकीतील रसाचे शोषण झाल्यामुळे ती सुरकुतून जाते. प्रादुर्भावग्रस्त बोंडामध्ये जीवाणू व बुरशींचा शिरकाव होतो. प्रादुर्भावग्रस्त बोंडे सडतात. मोठ्या आकाराची बोंडे सडताना त्यात पाण्याचे प्रमाण वाढते. त्यात अपरिपक्व सरकीला अंकुर फुटतात. या सर्व बाबींचे दुष्परिणाम रुईच्या प्रतीवर होतो. नियंत्रण व्यवस्थापन
संपकर् ः डॉ. शिवाजी तेलंग, ९४२१५६९०१८ (कापूस संशोधन केंद्र, नांदेड.)
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.