
कोरडवाहू भागातील जमिनीतील ओलावा हा पडणाऱ्या पावसावर आणि जमिनीच्या खोलीवर अवलंबून असतो. बांधबंदिस्ती केलेल्या क्षेत्रात जमिनीची मशागत करताना नांगरणी, कुळवणी, पेरणी आणि कोळपणी या सारखी मशागतीची कामे उतारास आडवी करावी . कोरडवाहू भागातील जमिनीतील ओलावा हा पडणाऱ्या पावसावर आणि जमिनीच्या खोलीवर अवलंबून असतो. बांधबंदिस्ती केलेल्या क्षेत्रात जमिनीची मशागत करताना नांगरणी, कुळवणी, पेरणी आणि कोळपणी या सारखी मशागतीची कामे उतारास आडवी करावी. त्यामुळे ओलावा साठविण्यास मदत होते.जमिनीतील ओल उडून जाऊ नये म्हणून पेरणी झाल्यानंतर आच्छादन करावे. मारवेल,अंजन,खस, सुबाभूळ या वनस्पतींचा बांधासारखा वापर केल्यास पावसाचे पाणी अडविले जाऊन जमिनीत ओलावा साठविण्यास मदत होते. दुबार पीक पद्धतीचा अवलंब केल्यास फायदा होतो. रब्बी हंगामातील पेरणीचा योग्य कालावधी
जमिनीची निवड ज्वारी,सूर्यफूल,करडई आणि हरभरा या पिकांसाठीसाठी मध्यम ते भारी(खोल),उत्तम निचरा होणारी जमीन निवडावी. हरभरा पिकास हलकी अथवा भरड,पाणथळ,चोपण किंवा क्षारयुक्त जमीन लागवडीसाठी निवडू नये. पेरणीचे अंतर व बियाणे
जातींची निवड अवर्षण प्रवण भागात अवर्षणाचा कालावधी लहान-मोठा नेहमीच असतो,म्हणूनच अवर्षणाचा ताण सहन करू शकणाऱ्या, कमीत कमी कालावधीत येणाऱ्या जातींची निवड करावी. रब्बी ज्वारी
करडई एस एस एफ ७०८, फुले करडई-७३३, फुले चंद्रभागा(एस एस एफ-७४८) हरभरा विजय, आणि दिग्विजय या जाती मर रोग प्रतिकारक्षम असून जिरायती,बागायत तसेच उशिरा पेरणीस योग्य. सूर्यफूल फुले भास्कर, भानू
संपर्क- डॉ.आदिनाथ ताकटे,९४०४०३२३८९, (मृद शास्त्रज्ञ,एकात्मिक शेती पद्धती संशोधन प्रकल्प, महात्मा फुले कृषि विद्यापीठ, राहुरी)
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.