ला निनामुळे मान्सून प्रभावित

लॉकडाऊनची परिस्थिती पाहता, महाराष्ट्रात सरासरीपेक्षा ९८ टक्के व त्यात ५ टक्के कमी किंवा जास्त पाऊस होण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला. तसेच ऑगस्ट व सप्टेंबर महिन्यात चांगल्या पावसाची शक्यता वर्तविण्यात आली होती. आणि प्रत्यक्षात तसाच पाऊस झाला.
dr ramchandra sabale
dr ramchandra sabale

लॉकडाऊनची परिस्थिती पाहता, महाराष्ट्रात सरासरीपेक्षा ९८ टक्के व त्यात ५ टक्के कमी किंवा जास्त पाऊस होण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला. तसेच ऑगस्ट व सप्टेंबर महिन्यात चांगल्या पावसाची शक्यता वर्तविण्यात आली होती. आणि प्रत्यक्षात तसाच पाऊस झाला. कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे जगभरात लॉकडाऊन करण्यात आला. या संपूर्ण काळात रस्ते, रेल्वे वाहतूक, विमान प्रवास, कारखाने तसेच औद्योगिक क्षेत्रातील सगळ्या गोष्टी बंद करण्यात आल्या. त्यामुळे कार्बन उत्सर्जन कमी होऊन हवेतील प्रदूषण कमी झाले. हवेतील कार्बन डायऑक्‍साईड, कार्बन मोनोऑक्‍साईड व फ्ल्युरोक्‍लोरो कार्बनचे उत्सर्जन पूर्णतः थांबले. हवेतील कार्बनचे प्रमाण ३० टक्केपर्यंत घटल्याचे दिसून आले. त्यामुळे या वर्षाचा मॉन्सून वेगळा असल्याची शक्यता आपल्याकडून वर्तविण्यात आली होती. याआधी आपण एप्रिल ते मे महिन्यात सरासरीपेक्षा अधिक पाऊस होण्याचा अंदाज व्यक्त केला होता. मात्र प्रत्यक्षात मार्च ते मे महिन्यात अकोला, यवतमाळ, नागपूर व पूर्व विदर्भातील चंद्रपूर, गडचिरोली या भागात सरासरीपेक्षा कमी पाऊस झाल्याचे आढळून आले. जून व जुलै महिन्यात कोकण आणि पश्‍चिम महाराष्ट्रात सरासरीपेक्षा कमी पाऊस होणार असल्याचे दिसून आले. लॉकडाऊनची परिस्थिती पाहता, महाराष्ट्रात सरासरीपेक्षा ९८ टक्के व त्यात ५ टक्के कमी किंवा जास्त पाऊस होण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला. तसेच ऑगस्ट व सप्टेंबर महिन्यात चांगल्या पावसाची शक्यता वर्तविण्यात आली होती. आणि प्रत्यक्षात तसाच पाऊस झाला. विशेषतः पश्‍चिम महाराष्ट्रातील बहुतांशी धरणे जुलै अखेरपर्यंत भरलेली नव्हती. मात्र, ऑगस्ट-सप्टेंबर महिन्यात चांगला पाऊस होऊन धरणे भरतील असा अंदाज आपण सांगितला होता. मॉन्सूसचा थोडक्यात आढावा 

  • जुलै अखेरीस नगर जिल्ह्यात सरासरीपेक्षा ९० टक्के अधिक पाऊस झाला. औरंगाबाद जिल्ह्यात ७० टक्के, धुळे जिल्ह्यात ४० टक्के, सांगली जिल्ह्यात २४ टक्के, जालना जिल्ह्यात ३६ टक्के, जळगाव जिल्ह्यात ३५ टक्के अधिक पाऊस झाला.
  • याउलट जून-जुलै महिन्यात सरासरीपेक्षा अकोला, यवतमाळ जिल्ह्यात २६ ते २८ टक्के व अमरावती जिल्ह्यात २१ टक्के पाऊस झाल्याचे दिसून आले. यावरून पावसाच्या वितरणावर हवामान बदलाचा प्रभाव झाला असल्याचे स्पष्ट होते.
  • जून ते सप्टेंबर या कालावधीत नगर जिल्ह्यात ९० टक्के, औरंगाबाद जिल्ह्यात ६५ टक्के, बीड व धुळे जिल्ह्यात ४६ टक्के, पुणे व जालना जिल्ह्यात ४० टक्के, उस्मानाबाद, सोलापूर, जळगाव व सांगली जिल्ह्यात २५ टक्के तर सिंधुदुर्ग जिल्ह्यात ५० टक्के अधिक पाऊस झाल्याचे दिसून आले.
  • याच कालावधीत अकोला जिल्ह्यात २७ टक्के, यवतमाळ जिल्ह्यात २५ टक्के, अमरावती जिल्ह्यात २० टक्के कमी पाऊस झाल्याचे पाहायला मिळाले. उर्वरित सर्वच जिल्ह्यात सरासरी पेक्षा अधिक पाऊस झाला आहे.
  • मॉन्सूनोत्तर पावसाचा १ ते १४ ऑक्‍टोबर या कालावधीचा आढावा घेतल्यास, उस्मानाबाद जिल्ह्यात सरासरीपेक्षा १४३ टक्के, सिंधुदुर्ग जिल्ह्यात १२६ टक्के, परभणी जिल्ह्यात ६५ टक्के, सोलापूर जिल्ह्यात ६६ टक्के, व सांगली जिल्ह्यात ६९ टक्के अधिक पाऊस झाला. यामुळे खरिपातील काढणीस आलेल्या पिकांचे पूर्ण नुकसान झाले आहे.
  • याच कालावधीत जळगाव जिल्ह्यात ८० टक्के, बुलडाणा जिल्ह्यात ७६ टक्के, धुळे जिल्ह्यात ९९ टक्के, नाशिक जिल्ह्यात ६४ टक्के, अकोला जिल्ह्यात ४० टक्के, अमरावती जिल्ह्यात २८ टक्के, औरंगाबाद जिल्ह्यात २७ टक्के, यवतमाळ जिल्ह्यात २४ टक्के, ठाणे जिल्ह्यात ३० टक्के आणि पालघर जिल्ह्यात ५० टक्के कमी पाऊस झाला.
  • सरारीपेक्षा अधिक पाऊस झालेल्या जिल्ह्यातील खरीप पिकांचे पूर्णतः नुकसान झाले. पावसामुळे उद्भवलेल्या पूर परिस्थितीमुळे शेती क्षेत्र पूर्णपणे प्रभावित झाले. तर दुसऱ्या बाजूस ज्या जिल्ह्यात सरासरीपेक्षा पाऊस कमी झाला, तेथील पिकांच्या वाढीवर व उत्पादनावर विपरीत परिणाम झाला. ला निनाचा प्रभाव यापुढील काळात ला निनाचा प्रभाव राहण्यामुळे दक्षिण आशियातील बऱ्याच देशात अवकाळी पाऊस होण्याची शक्‍यता आहे. आंतरराष्ट्रीय शास्त्रज्ञांनी ला निनाचा प्रभाव १५ फेब्रुवारी २०२१ पर्यंत जाणवण्याची शक्यता वर्तवली आहे. याचा ऊस, गहू, हरभरा, मोहरी, करडई या पिकांना फायदा होईल. फळबागांवर रोग आणि किडींच्या प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात दिसून येईल. त्यामुळे शेती क्षेत्र अधिक प्रभावित होऊन अन्न सुरक्षेवर विपरीत परिणाम होईल. हवामान बदल व ला-निना यांच्या प्रभावाने शेतीक्षेत्र पूर्णतः अडचणीत आल्याचे यावरून स्पष्ट होते. - ज्येष्ठ हवामान तज्ञ, व सदस्य, अॅग्रीकल्चर मेट्रोलोजी फोरम फॉर साउथ एशिया

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com