..या आहेत कसावा पिकाच्या सुधारित जाती

 kasava tuber
kasava tuber

केंद्रीय कंद पिके संशोधन संस्थेने कसावाच्या १९ सुधारित जाती विकसित केलेल्या आहेत. यातील काही जाती रोग प्रतिकारक, लवकर तयार होणाऱ्या जाती आहेत. याचबरोबरीने स्टार्च निर्मितीसाठीदेखील उपयुक्त आहेत. मागील लेखात आपण कसावाच्या सुधारित लागवड व उत्पादन तंत्रज्ञानाबाबत आढावा घेतला. आजच्या लेखात आपण केंद्रीय कंद पिके संशोधन संस्थेने विकसित केलेल्या सुधारित कसावा जातींची माहिती घेत आहोत. या संस्थेने विविध कंदपिकांच्या ६७ सुधारित जात विकसीत केल्या आहेत. यामध्ये कसावाच्या १९ सुधारित जाती आहेत. येत्या काळात प्रक्रिया उद्योगाच्या दृष्टीने या जाती महत्त्वाच्या आहेत. स्टार्चचे प्रमाण अधिक असलेल्या जाती

 • संस्थेने स्टार्चचे प्रमाण अधिक असलेल्या कसावाच्या जाती विकसीत केल्या आहेत.  
 • यामध्ये श्री रेखा (२७ ते ३१ टक्के), श्री शक्ती (२७ ते ३२ टक्के), श्री अतुल्या (३०.२ टक्के), श्री प्रभा (२६ ते २९ टक्के), श्री प्रकाश (२९ ते ३१ टक्के), श्री सध्या (२९ ते ३१ टक्के) या जातींचा समावेश होतो.
 • पौष्टिक कंदपिके

 • इतर पिकांच्या तुलनेने कंदपिकांपासून सर्वाधिक उष्मांक मिळत असल्याने अन्न सुरक्षिततेमध्ये कंदपिकांना महत्त्वाचे स्थान आहे.  
 • मानवी आहाराबरोबरच औद्योगिक क्षेत्र, पशुखाद्य, आयुर्वेदिक औषधांमध्ये कंदपिकांचा वापर होतो. या पिकांमध्ये कर्बोदके मोठ्या प्रमाणात असतात. त्याचबरोबर प्रथिने, महत्त्वाची खनिजद्रव्ये, जीवनसत्त्वे व अनेक औषधी गुणधर्म आहेत.  
 • कोकण विभागात प्रामुख्याने रताळी, घोरकंद, कणगर, सुरण, वडीचा व भाजीचा अळू, शेवरकंद अशी कंदपिके आढळून येतात. कोकणातील शेतकरी आपल्या रसबागेमध्ये, घराशेजारील मोकळ्या जागेत, रानमाळावर अथवा वरकस जागेमध्ये पारंपरिक पद्धतीने या पिकाची लागवड शक्य आहे.
 • कंदपिकांची वैशिष्टे

 • इतर पिकांच्या तुलनेत सूर्यप्रकाशाचा चांगला वापर करून कर्बोदके निर्माण करण्याची क्षमता या पिकांमध्ये आहे.  
 • कंदपिकांमध्ये पिष्टमय पदार्थ अधिक प्रमाणात असतात. यामुळे शरीरास कॅलरीजचा (उष्मांकांचा) मुबलक प्रमाणात पुरवठा केला जातो. भात, गहू, मका या प्रमुख तृणधान्य पिकांच्या तुलनेत शेवरकंद व रताळी या कंदपिकांपासून अधिक ऊर्जा मिळते.  
 • कंदपिकांची उत्पादन क्षमता इतर सर्व पिकांच्या तुलनेत सर्वाधिक आहे.  
 • जागतिक तापमान वाढ आणि बदलत्या वातावरणातही चांगले उत्पादन देण्याची क्षमता कंदवर्गीय पिकांमध्ये आहे.  
 • कंदपिकामध्ये ऊर्जेबरोबरच खनिज द्रव्ये व जीवनसत्त्वांचे प्रमाण चांगले असते. यामध्ये औषधी गुणधर्मही आढळतात.  
 • मनुष्य आहाराबरोबरच औद्योगिक क्षेत्र व जनावरांच्या खाद्यामध्येही कंदपिकांचा वापर केला जातो.  
 •  कंदपिकांची लागवड सरळपिके अथवा आंतरपिके म्हणून करणे शक्य आहे.
 • संपर्कः  डॉ. संकेत मोरे, ९६०१२६६६३६ डॉ. नम्रता गिरी, ७०१२०२७९२७ (केंद्रीय कंदपिके संशोधन संस्था, त्रिवेंद्रम, केरळ)

  Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

  ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

  Related Stories

  No stories found.
  Agrowon
  agrowon.esakal.com