आरोग्यदायी आले, सुंठ पावडर

health benefits of Ginger
health benefits of Ginger
Published on
Updated on

महिलांना आले आणि सुंठ पावडर परिचित आहे. ओल्या कंदास आले व वाळल्यानंतर त्यास प्रक्रिया करून सुंठ तयार होते. विविध भाज्यांमध्ये चवीसाठी वापरले जाणारे आले अप्रत्यक्षपणे आरोग्यासाठी हितकारक असते. सुंठ पावडरदेखील उत्तम आरोग्यदायी असते.

  • भूक मंदावणे, तोंडाला चव नसणे, तोंडाला पाणी सुटणे या लक्षणांमध्ये आल्याचा तुकडा चावून खावा.  
  • सर्दी, घसादुखीमध्ये आल्याचा रस आणि मधाचे चाटण करून त्याचे २ ते ३ वेळा सेवन करावे. गरम पाणी प्यावे.  
  • पोटात दुखत असल्यास, गॅस होऊन पोट जड झाल्यास आले आणि लिंबाचा रस मधासह घ्यावा. गरम पाण्याचे सेवन करावे.  
  • आले पाचक म्हणून उत्तम कार्य करते. अन्नपचन होत नसल्यास, पोटदुखी जाणवल्यास आले आणि गुळाचे मिश्रण चाटवावे.  
  • काही वेळा अजीर्ण आणि पित्ताने किंवा जास्त जेवण केल्याने अपचनाच्या उलट्या होतात. अशा वेळी योग्य औषधांसोबत पाव चमचा आले रसासोबत खडीसाखर घालून २ ते ३ वेळा सेवन करावे.  
  • गुडघेदुखीमध्ये सुंठ पावडर फायदेशीर असते. सुंठ पावडर पाण्यात मिसळून मोठ्या चमचामध्ये गरम करावी आणि त्याचा लेप गुडघ्यावर लावावा. लेप वाळल्यानंतर गरम पाण्याने पुसून घ्यावा.  
  • सर्दी साठून राहिल्यामुळे डोके जड होते व दुखते. अशा वेळी सुंठीचा लेप कपाळावर लावावा.
  • पथ्य

  • आहारात वातूळ पदार्थ, दही, थंड पदार्थांचे सेवन करू नये. जेवणाच्या वेळा पाळाव्यात.  
  • अवेळी जेवण करणे टाळावे. शेवभाजी, फरसाण, वेफर्स यांचा अतिरेक टाळावा.
  • दक्षता

  • पित्तप्रकृती, उष्णता विकार, जळजळ होणे, अल्सर, मूत्र विसर्जनावेळी होणारी जळजळ अशा उष्णतेशी संबंधित तक्रारींसाठी आल्याचा उपयोग तज्ज्ञांच्या सल्ल्यानेच करावा.  
  • वारंवार पोटदुखी, सांधेदुखी, मळमळ, भूक न लागणे असे त्रास सतत होत असल्यास, योग्य त्या तपासण्या करून घ्याव्यात.
  • संपर्कः डॉ. विनीता कुलकर्णी, ९४२२३१०३७७

    ॲग्रोवनचे सदस्य व्हा

    शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon - Agriculture News
    agrowon.esakal.com