सध्याच्या दुष्काळी स्थितीत वा बदलत्या हवामानात शर्कराकंद (शुगरबीट) हे पीक शेतकऱ्यांसाठी आश्वासक ठरणारे आहे. कमी पर्जन्यमानात ते चांगले उत्पादनक्षम आहे. त्यावर किडी- रोगांचा प्रादुर्भावही तुलनेने कमी असतो. कमी उत्पादन खर्चात हे पीक चांगले उत्पन्न व त्याचबरोबर चाराही देणारे आहे.
भारतात १९६० च्या दशकात शुगरबीट पिकाची लागवड झाली. केंद्रिय ऊस संशोधन केंद्र, लखनौ, वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट, पुणे व विभागीय ऊस संशोधन केंद्र, पाडेगाव या संस्था शुगरबीटवर संशोधन करीत आहेत. देशात पंजाब, कर्नाटक, तमिळनाडू, राजस्थान, पश्चिम बंगालमध्ये लागवड केली जाते. सध्याच्या काळात होऊ शकते पर्यायी पीक
लागवड तंत्रज्ञान
सुधारित वाण भारतात विविध कंपन्यांचे विविध वाण उपलब्ध आहेत. तसेच इराण व युरोपातील काही कंपन्यांचे वाणही भारतात उपलब्ध आहेत. खत व्यवस्थापन पुढीलप्रमाणे एकरी खत व्यवस्थापन करावे.
(नत्र, स्फुरद, पालाश एकरी ३० किलो लागवडीनंतर २५ व ५० दिवसांनी दोन वेळा द्यावे) तसेच गरजेनुसार सूक्ष्म अन्नद्रव्यांचा वापर करावा. पाणी व्यवस्थापन पिकाला पाणी खूप कमी लागते. पाणी जास्त झाल्यास पिकाची वाढ खुंटते व कंद कुजतात. लागवडीपूर्वी वाफसा आल्यावर, उगवणीनंतर १५ ते २० दिवसांनी गरजेनुसार पाणी द्यावे. तणनियंत्रण लागवडीपासून ७५ दिवसांपर्यंत पीक तणमुक्त ठेवणे गरजेचे आहे. तणनाशकाचा वापर करू नये. कीड-रोग नियंत्रण व्यवस्थापन पिकावर तंबाखूवरील पाने खाणारी अळी (स्पोडोप्टेरा लिट्युरा) या किडीचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणावर होतो. शिवाय मावा, तुडतुडे, फुलकिडे आदी रसशोषक किडीही आढळतात. सध्या मक्यावर आढळणारी अमेरिकन लष्करी अळी या पिकाचेही नुकसान करू शकते. त्यासाठी योग्य ती खबरदारी घेणे गरजेचे आहे. या पिकावर मर, कंदकुज, मूळकुज, बुरशीजन्य ठिपके आदी रोगांचाही प्रादुर्भाव आढळतो. काढणी
उत्पादन व उत्पन्न
दुष्काळी स्थितीत होऊ शकतो पर्याय बारामती येथील ॲग्रीकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्टचे अध्यक्ष राजेंद्र पवार म्हणतात, की सध्याच्या दुष्काळी परिस्थितीत कमी पाण्यावर येणारे, चांगले उत्पादन देणारे उत्तम पर्यायी पीक म्हणून शुगरबीट ठरू शकते. कमी कालावधीत, कमी उत्पादन खर्चात चांगले उत्पन्न या पिकाद्वारे मिळू शकते. हे पीक मुख्य किंवा आंतरपीक म्हणूनही घेता येते. जनावरांना उत्तम खाद्य मिळून दूध उत्पादन व गुणवत्ता वाढ होऊ शकते. वर्ष २०१७-१८ मध्ये आम्ही युरोपात जाऊन या पिकाचा अभ्यास केला. तेथील वातावरण, परिस्थिती पाहून आपल्याकडे कोणते वाण योग्य ठरतील याचा अभ्यास केला. त्यादृष्टीने बारामती कृषी विज्ञान केंद्रामार्फत (केव्हीके) बेल्जियम व इराण येथील एकूण १७ वाणांच्या चाचण्या घेण्यात आल्या. त्यातील दोन वाण उत्कृष्ट ठरले. सन २०१८-१९ च्या हंगामात बारामती परिसरातील क्षारयुक्त जमिनीमध्ये निवड केलेल्या दोन वाणांची लागवड शेतकऱ्यांकडे केली. त्याचे एकूण क्षेत्र सुमारे ६० एकर होते. यामध्ये शेतकऱ्यांना प्रशिक्षण देऊन त्यांच्या शेतावर प्रक्षेत्र भेट आयोजित करण्यात आली. त्यांना तज्ज्ञांमार्फत वेळोवेळी थेट शेतावर मार्गदर्शन करण्यात आले. त्यातून जमीन सुधारण्याबरोबर त्यांना चांगला आर्थिक फायदाही झाला. या वर्षी जवळपास ३०० एकर क्षेत्रावर शुगरबीट लागवडीचे नियोजन आहे.
शर्कराकंदाची (शुगरबीट) ओळख
- डॉ. मिलिंद जोशी, ९९७५९३२७१७,
(पीक संरक्षण तज्ज्ञ, कृषी विज्ञान केंद्र, बारामती,जि.पुणे)
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.