जवसाच्या बियांचा वापर खाद्य तेल आणि औद्योगिक तेलाच्या उत्पादनासाठी होतो. झाडापासून मिळणाऱ्या तंतूचा उपयोग कापड व्यवसाय, वेगवेगळ्या प्रकारचे कागद तयार करण्यासाठी व शोभेच्या वस्तू निर्मितीकरिता उपयोग होतो. जवसाच्या पेंढीचा उपयोग पशू खाद्यात केला जातो. जवस (लीनम युसिटेटिसियम) हे मुख्यत्वे गळीत धान्य आहे. प्राचीन काळापासून भारतात जवसाची लागवड करण्यात येत आहे. काही वैदिक ग्रंथात जवसाच्या बिया, झाडाचे विविध उपयोग सांगितले आहेत. भारतात जवसाची मुख्य पिकात गणना होत नाही. मात्र सध्या जवसाच्या बियांतील विशेष घटकामुळे आहारशास्त्रात त्याला अनन्यसाधारण महत्त्व आले आहे. पूर्वीपासून आपल्या आहारात जवसाची चटणी, तेलाचा ग्रामीण आहारात समावेश आहे. खाद्य तेलबियाच्या बरोबरीने औषधी, औद्योगिक उपयुक्तता, पशुआहार, झाडाच्या तंतुंपासून कापडनिर्मिती असे जवसाचे अनेक उपयोग आहेत. विदर्भात कमी पाऊस झालेल्या वर्षीही रब्बी हंगामात जवसाचे रोप तग धरू शकते, शेतकऱ्याला उत्तम मोबदला देऊ शकते. जवसाचे पीक कुठेही सहज येऊ शकते. जवसाच्या विविध उपयोगांबाबत पुरेशी जनजागृती झाले तर जवस हे एक कमीखर्चात उत्तम मोबदला देणारे पीक म्हणून सिद्ध होईल. जवसाचे गुणधर्म १०० ग्रॅम जवसामध्ये १८.२८ टक्के प्रोटीन, २८.८८ टक्के कार्बोहायड्रेड, स्निगधांश-४२.१६ टक्के, फायबर २७.२३ टक्के तसेच अल्प प्रमाणात जीवनसत्त्व ब-५, ब-१२, फोलेट, नायसिन, रायबोक्लेबीन, मॅग्नेशियम, फॉस्फरस, पोटॅशियम, सेलेनियम असते. या गुणधर्मामुळे बाजारात जवसतेलाच्या गोळ्या खरेदी करण्याचा कल वाढलेला आहे. कमी खर्चाचे पीक महाराष्ट्रात सुमारे ९८ हजार हेक्टर क्षेत्रावर जवसाची लागवड केली जाते. त्यापैकी विदर्भात ६० हेक्टरवर लागवड असते. जवसासाठी विशिष्ट प्रकारची जमीन, फारश्या पर्जन्यामानाची गरज नसते. त्यामुळे जवसाचे उत्पादन भारताच्या कोणत्याही भागात घेता येते. विदर्भातील हिवाळी हवामान जवसाच्या लागवडीसाठी अनुकूल आहे. या पिकाला फारशी सायनिक खताची गरज नाही, जास्त मशागतीची गरज नाही. तसेच कापसासारखी सारख्या फवारण्याची गरज नाही. बियाणे स्थानिक असल्यामुळे बियाणावरील खर्च कमी येतो. साधारणपणे १२० ते १२५ दिवसांत पीक कापणीला येते. त्यामुळे विदर्भातील शेतकऱ्याच्या दृष्टीने विचार केल्यास इतर पिकाच्या तुलनेत हे पीक कमी श्रमात, कमी खर्चात व कमी वेळात घेता येते. तसेच उत्पादन देखील चांगले आहे. सध्या जवसाला चांगली बाजारपेठ उपलब्ध असून चांगला दर देखील मिळत आहे. असे आहे जवस
लागवड पद्धत
पेरणीचे प्रकार उरडीव पद्धत ः भात कापणी झाल्यावर जमिनीत ओलावा असताना नांगरणीकरून जवसाचे बी फेकून पेरण्यात येते. फोकीव पद्धत : जमीन न नांगरता आधीचे पीक कापणीवर येण्यापूर्वी बी फेकून देण्यात येते. उताळी पद्धत : जमिनीची मशागत करून ठेवली जाते. कोंब आलेले बीज रेतीत मिसळून फेकण्यात येते.
पारंपरिक बियाणे संवर्धन व बौद्धिक संपदा नोंदणी
जवसाच्या औषधी गुणधर्माची ओळख देणारे ः देवाजी कापगते
(टीप ः उपरोक्त उल्लेख वैदूंच्या पारंपरिक ज्ञानाचा भाग आहेत. ग्रामीण प्रागतिक युवा मंडळ, महाराष्ट्र जनुक कोश यांपैकी कोणत्याही औषधी उपयोगाची खात्री देत नाही. तज्ज्ञांच्या सल्ल्याशिवाय वरील औषधी उपयोग करू नये.)
जवसाचे उपयोग
- अविल बोरकर, ९०११९४२८२२ (लेखक भंडारा येथील ग्रामीण युवा प्रागतिक मंडळाचे सचिव आहेत)
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.