कलिंगड लागवडीसाठी हलकी, पोयट्याची, वालुकामय, मध्यम - काळ्या ते करड्या रंगाची पाण्याचा उत्तम निचरा असणारी, ६.५ ते ७.० सामूची जमीन लागवडीस योग्य आहे. थंडी कमी झाल्यावर १५ फेब्रुवारीपर्यंत लागवड पुर्ण करावी. उन्हाळ्याच्या सुरुवातीच्या काळात फळे तयार होत असल्याने चांगली मागणी राहते.
कलिंगड पिकास उष्ण व कोरडे प्रामुख्याने उष्ण दिवस व थंड रात्र असे हवामान मानवते. वाढीच्या कालावधीमध्ये दमटपणा व धुके असल्यास वेलीची वाढ व्यवस्थित होत नाही. तसेच रोगांचा प्रादुर्भाव वाढतो. फळ लागल्यापासून ते फळ विक्रीसाठी तोडेपर्यंत किमान ४० ते ४५ दिवस तापमान ३० अंश सेल्सिअसपेक्षा जास्त असावे.
लागवडीसाठी हलकी, पोयट्याची, वालुकामय, मध्यम - काळ्या ते करड्या रंगाची पाण्याचा उत्तम निचरा असणारी, ६.५ ते ७.० सामूची जमीन लागवडीस योग्य आहे. सर्वसाधारणपणे हे पीक नदीकाठच्या पोयट्याच्या जमिनीत उत्तम येते. मात्र, आठपेक्षा जास्त सामू, जास्त चुनखडीचे प्रमाण आणि चोपण जमिनी या पिकांच्या लागवडीसाठी निवडू नयेत. अशा जमिनीतील अधिक प्रमाणातील सोडिअम, कॅल्शिअम, मॅग्निशिअम सल्फेट, क्लोराईड, कार्बोनेट व बायकार्बोनेट या सारख्या विद्राव्य क्षारांमुळे कलिंगडाच्या फळावर डाग पडण्याची शक्यता असते. अती भारी जमिनीत मुळांची वाढ कमी होते.
जाती अर्का ज्योती ही मध्य कालावधीत येणारी संकरीत जात आहे. या जातीची फळे आकाराने मोठी ६-८ किलोची गोल असतात. फळाची साल फिक्कट हिरव्या रंगाची आणि त्यावर गर्द हिरव्या पट्याची मध्यम जाड सालीची असतात. अर्कामाणिक या जातीची फळे आकाराने मोठी, गोल असतात. फळाची साल गर्द हिरव्या रंगाची मध्यम जाड सालीची असते. मधू या संकरित जातीची फळे लंबगोल आकाराची असून फळांची साल गर्द हिरवी असते. फळांचे वजन ६ ते ७ किलो भरते. गर भरपूर व लाल असतो. या जातीची मागणी बऱ्यापैकी असते.
बाजारपेठेत विविध जाती उपलब्ध आहेत.
लागवड तंत्र
गादीवाफ्यावर लागवड
- निवृत्ती पाटील, ९९२१००८५७५ (विषय विशेषज्ञ - उद्यानविद्या, सुविदे फाउंडेशन, कृषी विज्ञान केंद्र, वाशीम.)
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.