आखणी परसबागेची

योग्य पद्धतीने परसबागेची आखणी असेल तर वर्षभर पुरेसा भाजीपाला उपलब्ध होतो. महिलांमधील रक्तक्षय, लहान मुलांमधील कुपोषण तसेच इतर अनेक आजारांना आळा बसेल. तसेच पूर्ण कुटुंबाला पोषणयुक्त सेंद्रिय सकस भाज्या मिळतील.
kitchen garden
kitchen garden
Published on
Updated on

योग्य पद्धतीने परसबागेची आखणी असेल तर  वर्षभर पुरेसा भाजीपाला उपलब्ध होतो. महिलांमधील रक्तक्षय, लहान मुलांमधील कुपोषण तसेच इतर अनेक आजारांना आळा बसेल. तसेच पूर्ण कुटुंबाला पोषणयुक्त सेंद्रिय सकस भाज्या मिळतील. 

परसबाग तयार करताना माती भुसभुशीत करून शेणखत, गांडूळखत मिसळावे. वांगी, मिरची, टोमॅटो रोपे तयार ठेवावीत. भाजीपाला लागवडीसाठी आखणी करावी, काही भाज्या गादी वाफ्यावर तर काही सरी वरंबा पद्धतीने लावाव्यात. सर्वांत समोर, कमी उंचीच्या म्हणजे पालेभाज्यांचे बियाणे टाकावे; त्यानंतर वांगी, भेंडी, टोमॅटोसारख्या फळभाज्या लावाव्यात. त्यानंतरच्या भागात राजगिरा, मका लागवड करावी. सर्वांत शेवटी भिंतीच्या आधाराला वेलवर्गीय भाज्या लावाव्यात. बागेमध्ये एका बाजूला ३ बाय ३ बाय ३ फुटांचा खड्डा करून त्यात पालापाचोळा, भाज्यांची देठे, फळांच्या साली तसेच काळी माती मिसळावी. दररोज शेतातील पालापाचोळा टाकत राहावा. याचे तीन महिन्यांनी चांगले सेंद्रिय खत तयार होते. हे खत परसबागेतील भाजीपाल्यांना द्यावे. कोणतेही रासायनिक खत देऊ नये. परसबागेतील भाजीपाल्याला नियमित पाणी देणे आवश्यक आहे, पावसाचा जास्त खंड पडल्यास पाणी देण्याची गरज लागते.

परसबागेचे अनुभव संस्कृती संवर्धन मंडळ संचालित कृषी विज्ञान केंद्रामध्ये २०१४ पासून दर वर्षी १०० कुटुंबांना पोषणबागेचे प्रात्यक्षिक देण्यात येते. यामध्ये परसबागेची आखणी, सेंद्रिय खतांची निर्मिती व वापर, भाजीपाल्यांच्या नवीन जात, कीड, रोगनियंत्रणाची माहिती दिली जाते. या प्रशिक्षणामुळे महिला परसबागा तयार करून सेंद्रिय पद्धतीने भाजीपाल्याचे उत्पादन घेत आहेत. भाजीपाल्यावर पूर्वी होणारा सरासरी खर्च ३४५.३३ रुपये होता, तो आता १७०.८३ रुपये इतका आला आहे. बऱ्याच महिला अधिकच्या भाजीपाल्याची विक्री करून आर्थिक कमाई करीत आहेत.

परसबागेची रचना  परसबाग ही जागेच्या उपलब्धतेवर अवलंबून आहे. पुरेशी जागा उपलब्ध असल्यास चौकोनी पद्धतीने वाफे पाडून बागेची आखणी करता येते.

गंगामा मंडल परसबाग 

  • जागा भरपूर उपलब्ध असल्यास गंगामा मंडल या प्रकारची परसबाग करावी.
  • गंगामा मंडल ही गोलाकार परसबाग आहे. याच्या रचनेमुळे भाजीपाला उत्पादनामध्ये फायदा होतो. या प्रकारामध्ये जागेचे योग्य नियोजन होते.
  • एकूण २३ ते २४ प्रकारच्या भाजीपाल्याची लागवड करता येते.पाणी देण्याची व्यवस्था चांगल्या प्रकारे करता येते. सांडपाण्याचे नियोजन योग्य होते. भरपूर पोषक भाज्या मिळतात.  
  • -  माधुरी रेवणवार, ८९९९५६०६८२ (गृहविज्ञानतज्ज्ञ, कृषी विज्ञान केंद्र, सगरोळी, ता. बिलोली, जि. नांदेड)

    ॲग्रोवनचे सदस्य व्हा

    शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon - Agriculture News
    agrowon.esakal.com