वनशेतीच्या विविध पद्धती या जमिनीच्या प्रतीनुसार, पर्जन्यमानानुसार व स्थानिक गरजेनुसार ठरविल्या जातात. पडीक, बरड आणि नापीक असलेल्या जमिनी वनशेतीसाठी उपयुक्त ठरते. यामधून चारा, जळाऊ लाकूड, शेती-अवजारांसाठी लाकूड, निवारा, फळे आणि लघू-वनउपज मिळते.
वातावरण, हवामान आणि पर्यावरण यांचा समतोल राखण्याचे काम ही जंगले करतात. परंतु ही वन संपत्ती नष्ट होत चालली आहे. जंगलतोडी बरोबरच होणारे अमर्याद प्रदूषण, वाढती लोकसंख्या आणि शहरीकरण या कारणांमुळे हवामान बदलाचा दर वेगाने वाढत आहे. यामुळे तापमानातील कमी-जास्त बदल, समुद्र पातळी वाढ, अति व अवकाळी पाऊस, पूर परिस्थिती, दुष्काळ, बर्फ वितळणे व ओझोन थर विरळ होणे यांसारख्या नैसर्गिक आपत्तींचे प्रमाण वाढत जात आहे. या सर्व समस्यांना उत्तर म्हणून जगातील १४० पेक्षा जास्त देशांनी वनशेतीचा एक प्रभावी साधन म्हणून स्वीकार केला आहे. कारण ही पद्धती हवामान बदलांना अनुकूलन करण्याबरोबरच तसेच त्याचे परिणाम कमी करण्यासाठी उपयुक्त ठरणारी आहे. वनशेतीचे फायदे सध्याच्या काळामध्ये वनशेती हा शेतकऱ्यांना शाश्वत उत्पन्न मिळवून देण्याच्या खात्रीबरोबरच वातावरण बदलांच्या आपत्तींचा सामना करण्याची क्षमता आहे. वनशेतीपासून चारा, फळे, भाजीपाला, जळाऊ लाकूड, जमिनीचा पोत सुधारणे, निकृष्ट व पडीक जमिनींचे व्यवस्थापन, वाऱ्यापासून होणारे संरक्षण असे फायदे मिळतात. या व्यतिरिक्त, कागद व प्लायवूड उद्योगांसाठी वनशेतीमधून कच्चा माल उपलब्ध होतो. सध्याच्या परिस्थितीत वनशेतीला चालना मिळावी यासाठी भारत सरकारने २०१४ मध्ये राष्ट्रीय कृषिवानिकी नीती लागू केली आणि याच्या अंतर्गत बहूउपयोगी वृक्षांना शेतीमध्ये लावण्यासाठी प्रसार आणि प्रचार केला जात आहे. याच्याच अंतर्गत राष्ट्रीय वनशेती आणि बांबू मिशनची २०१७ मध्ये सुरुवात झाली. वनशेती म्हणजे काय? वनशेती ही अशी भू-व्यवस्थापन प्रणाली आहे. यामध्ये हंगामी व बारमाही पिकांबरोबर फायदेशीर वृक्षांना शेतीमध्ये वैविध्यपूर्ण मिश्रित करून उपलब्ध संसाधनांचा पुरेपूर वापर केला जातो. वनशेतीच्या विविध पद्धती या जमिनीच्या प्रतीनुसार, पर्जन्यमानानुसार व स्थानिक गरजेनुसार ठरविल्या जातात. पडीक, बरड आणि नापीक असलेल्या जमिनी वनशेतीसाठी उपयुक्त असून, त्यामधून चारा, जळाऊ लाकूड, शेती-अवजारांसाठी लाकूड, निवारा, फळे आणि लघू-वनउपज मार्फत शेतकरी त्यांचे उत्पन्न वाढवू शकतो. वनशेती ही पद्धतशीरपणे म्हणजेच चौरस किंवा आयताकृती रोपण पद्धतीमध्ये (दोन्ही ओळींमधील अंतर हे १२ ते ३० फूट आणि एका रोपांपासून दुसऱ्या रोपांचे अंतर हे ६ ते २४ फूट), शेताच्या बांधावरती (एक ओळ, जोड ओळ किंवा नागमोडी पद्धतीमध्ये सरासरी ५ ते १० फूट अंतर) आणि विखुरलेल्या पद्धतीमध्ये (५० ते २०० वृक्ष/हेक्टर) आढळतात. वनशेतीमध्ये वृक्षांची निवड
वनशेतीच्या पद्धती
कृषी वनशेती
कृषी उद्यान
कृषी वनोद्यान
वनीय कुरण
कृषिवनीय कुरण
सघन लागवड
- संग्राम चव्हाण, ९८८९०३८८८७ (राष्ट्रीय अजैविक ताण व्यवस्थापन संस्था, बारामती, जि. पुणे)
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.