अशी करा गॅलार्डिया लागवड

गॅलार्डिया
गॅलार्डिया
Published on
Updated on

गॅलार्डियाला उष्ण व दमट हवामान चांगले मानवते. कणखरपणामुळे गॅलार्डियाचे पीक वर्षभर घेता येते. हे झाड काटक असल्यामुळे हलक्‍या ते मध्यम जमिनीत चांगले वाढते, भरपूर उत्पादन देते. पाण्याचा निचरा न होणारी अत्यंत भारी जमीन गॅलार्डियास मानवत नाही. मध्यम पोयट्याची, साधारणतः पाच ते आठ सामू असणारी जमीन निवडावी.

  • पिक्‍टा प्रकारातील फुले आकाराने मोठी; परंतु सिंगल असतात- उदा.- इंडियन चीफ रेड, पिक्‍टा मिक्‍स्ड इत्यादी, तर लॉरेंझियाना प्रकारातील फुले मोठी व डबल असतात. उदा.- सनशाइन, गेईटी डबल मिक्‍स्ड, डबल टेट्रा, फिएस्टा इ.
  • गॅलार्डिया फूलपिकांच्या गॅलार्डिया ग्रॅंडिफ्लोरा या प्रकारातील जाती बहुवर्षीय असून, त्यांना मोठ्या आकाराची पिवळसर केशरी आणि लाल रंगाची फुले येतात. या प्रकारामध्ये प्रामुख्याने सन गॉड डॅझलर, वारिअर, गोब्लिन मिस्टर शेरब्रुक इ. जातींचा समावेश होतो.
  • लागवड बियांपासून रोपे तयार करून केली जाते. बियांपासून रोपे तयार करण्यासाठी सर्वप्रथम एक मीटर रुंद,१५ सेंमी. उंचीचे आणि योग्य त्या लांबीचे गादीवाफे तयार करावेत. गादीवाफे तयार करत असताना प्रतिचौरस मीटर १५ किलो चांगले कुजलेले शेणखत मातीत मिसळावे.
  • बी गादीवाफ्यावर ओळीत एक ते १.५ सेंमी. खोल पेरावे. दोन ओळींतील अंतर दहा सें. मी. ठेवावे. एक हेक्‍टर लागवडीसाठी १५० ग्रॅम बियाणे पुरेसे होते. बी पेरल्यानंतर तीन ते चार आठवड्यांत रोपे चार ते सहा पानांची झाल्यावर लागवडीयोग्य होतात.
  • रोपांची लागवड ऑगस्ट, एप्रिल आणि ऑक्‍टोबर महिन्यांत केल्यास वर्षभर फुले उपलब्ध होऊ शकतात. गॅलार्डियाची लागवड सपाट वाफे अथवा सरी वाफे तयार करून करतात.
  • जमीन आडवी-उभी नांगरून पुरेसे चांगले कुजलेले शेणखत मिसळून घ्यावे. नंतर सपाट वाफे तयार करून जमीन व हंगामापरत्वे लागवड ४५ x ६० सेंमी. अथवा ४५ x ३० सेंमी. अंतरावर करावी.
  • गॅलार्डियास ५५ किलो युरिया, १५७ किलो सिंगल सुपर फॉस्फेट व ४२ किलो म्युरेट ऑफ पोटॅश प्रतिहेक्‍टरी वरखते म्हणून द्यावीत.
  • - ०२०- २५६९३७५० राष्ट्रीय कृषी संशोधन प्रकल्प, गणेशखिंड, पुणे.

    ॲग्रोवनचे सदस्य व्हा

    शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Agrowon - Agriculture News
    agrowon.esakal.com