मराठवाड्यातील अनेक भागात मोसंबी, संत्रा फळपिकावर साल खाणारी अळी, कोळीचा प्रादुर्भाव दिसून येत आहे. काही भागांत कोळी किडीने आर्थिक नुकसान पातळीही ओलांडली आहे. कोळी प्रादुर्भाव वर्षभर दिसून येत असला, तरी प्रामुख्याने ऑगस्ट ते ऑक्टोबरदरम्यातन त्याचे प्रमाण जास्त असते. वेळीच सावध होऊन या किडीच्या प्रादुर्भावाची लक्षणे ओळखून तातडीने व्यवस्थापनासाठी उपाय योजावेत. साल खाणारी अळी ओळख
व्यवस्थापन
कोळी ओळख कोळी ही अष्टपाद वर्गातील कीड असून, अतिसूक्ष्म आकारामुळे सहजासहजी डोळ्याने दिसत नाही. कोळी प्रौढ व पिले पिवळसर असून, त्यांच्या फक्त आकारात फरक असतो. कोळी पानांच्या शिराजवळ व फळाच्या सालीवर अंडी घालते. प्रादुर्भावाची लक्षणे प्रौढ व पिले पाने, फळातील रस शोषतात. पानावर राख किंवा धूळ साचल्याप्रमाणे पानांचा पृष्ठभाग धुळकट दिसतो. जास्त प्रादुर्भावात करड्या रंगाचे चट्टे पडून तो भाग वाळतो. यामुळेच शेतकरी ‘लाल्या’ या नावानेही ओळखतात. प्रादुर्भावामुळे अनियमित आकाराची फळे तयार होऊन फळांची प्रत खालावते. फळांना योग्य दर भेटत नाही. व्यवस्थापन कोळी प्रादुर्भाव दिसताच, फवारणी प्रति लिटर पाणी डायकोफॉल (१८.५ ईसी) २.७ मिलि किंवा डायफेन्थुरॉन (५० डब्ल्यूपी) २ ग्रॅम. दुसरी फवारणी आवश्यकता असल्यास १५ दिवसांच्या अंतराने करावी. पाने पोखरणारी अळी (लीफ मायनर) लहान रोपट्यावर या किडीचा प्रादुर्भाव जास्त होतो. या किडीची अळी फिकट पिवळसर असून, प्रथम अळी अवस्थेत पानात शिरते. आतील हरितद्रव्य खाते. पानावर नागमोडी रेषा दिसतात. शेवटी अशी पाने वेडीवाकडी होऊन वाळतात. व्यवस्थापन
फळातील रस शोषक पतंग रस शोषक पतंगामुळे सुमारे ५० ते ६० टक्क्यापर्यंत नुकसान होऊ शकते. पतंगाचा प्रामुख्याने सप्टेंबर ते ऑक्टोबर दरम्यान अधिक प्रादुर्भाव. तुलनात्मकदृष्ट्या उशिराचा आंबिया बहार आणि मृग बहरात जास्त प्रादुर्भाव. मुख्य प्रजाती ओथ्रिस मॅटरना, ओथ्रिस फुल्लोनिका व अकिया जनाटा. ओथ्रिस मॅटर्ना : समोरील पंख तपकिरी आणि मागील पंख नारंगी असून त्यावर मध्यभागी एक काळा ठिपका असतो. पंखाच्या कडा काळ्या असून त्यावर पांढरे ठिपके असतात. ओथ्रिस फुलोनिका : मागील पंख नारंगी, त्यावर मध्यभागी इंग्रजी 'C' अक्षरासारखा काळा ठिपका. अकिया जनाटा : समोरील पंख तपकिरी व मागील पंख पांढरे असून, त्यावर काळे चट्टे असतात. जीवनक्रम
- डॉ. संजोग बोकन (संशोधन सहयोगी), ९९२१७५२००० डॉ. अनंत लाड (सहायक प्राध्यापक), ७५८८०८२०२४ (कृषी कीटकशास्त्र विभाग, वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणी)
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.