खरीप पिकांच्या काढणीनंतर रब्बी हंगामासाठी पूर्वमशागतीची कामे गरजेनुसार कमीत कमी प्रमाणात करावी, जेणे करून पृष्टभागातील ओलावा कमी होणार नाही. सलग पिकाच्या ऐवजी आंतरपीक पद्धतीचा अवलंब केल्यास उत्पादनामध्ये स्थिरता येते. जिरायती परिस्थितीत जास्त उत्पादन देणाऱ्या आणि वातावरणातील बदलाला कमी बळी पडणाऱ्या, कमी ओलाव्यावर उत्पादन देणाऱ्या सुधारित व संकरित जातींची निवड करावी. रब्बी हंगामात जिरायती परिस्थितीमध्ये नैसर्गिक घटकांचा जास्तीत जास्त फायदा होण्यासाठी आंतरपिक आणि दुबार पीक पद्धतींचा अवलंब करावा. रब्बी हंगामात सलग पिकाच्या ऐवजी आंतरपीक पद्धतीचा अवलंब केल्यास उत्पादनामध्ये स्थिरता येते तसेच हेक्टरी अधिक उत्पादन मिळून जास्त प्रमाणात नफा मिळतो. रब्बी हंगामातील आंतरपीक पद्धतीमध्ये रब्बी ज्वारी आणि हरभरा (६:३) आणि रब्बी ज्वारी आणि करडई (६:३) या आंतरपीक पद्धती अधिक आर्थिकदृष्ट्या फायदेशीर आहेत. आंतरपीक पद्धती
जमिनीच्या प्रकारानुसार पिके आणि पीक पद्धती ः
| जमिनीचा प्रकार | खोली (सें.मी.) | उपलब्ध ओलावा (मि.मी.) | पिके आणि पीक पद्धती |
| मध्यम | २२.५ - ४५ | ६०-६५ | सूर्यफूल, करडई |
| मध्यम खोल | १) ४५-६० २) ६०-९० | १) ८०-९० २) १४०-१५० | १) रब्बी ज्वारी, करडई, रब्बी ज्वारी अधिक करडई (६:३) आंतरपीक २) रब्बी ज्वारी, करडई, हरभरा, रब्बी ज्वारी अधिक करडई (६:३) करडई अधिक हरभरा (६:३) |
| खोल | ९० पेक्षा जास्त | १६० पेक्षा जास्त | रबी ज्वारी, करडई, हरभरा ही सलग पिके तसेच मूग किंवा उडीद किंवा सोयाबीन (खरीप) नंतर रब्बी ज्वारी, करडई, हरभरा या पिकांची लागवड करावी. |
योग्य जातींची निवड जिरायती परीस्थितीत जास्त उत्पादन देणाऱ्या आणि वातावरणातील बदलाला कमी बळी पडणाऱ्या, कमी ओलाव्यावर उत्पादन देणाऱ्या सुधारित व संकरित जातींची निवड करावी. सुधारित /संकरित जाती
योग्य वेळी पेरणी ः
पीक - पेरणीचा योग्य कालावधी रब्बी ज्वारी - ३० सप्टेंबर ते २० ऑक्टोबर सूर्यफूल -२० सप्टेंबर ते १० ऑक्टोबर करडई - ३० सप्टेंबर ते १० ऑक्टोबर हरभरा - ३० सप्टेंबर ते २० ऑक्टोबर जवस - २० सप्टेंबर ते १० ऑक्टोबर लागवडीचे नियोजन ः
संपर्क ः डॉ. भगवान आसेवार, ९४२००३७३५९ अखिल भारतीय समन्वयित कोरडवाहू शेती संशोधन प्रकल्प, वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणी.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.