रब्बी पिकांतील रासायनिक तणनियंत्रण

रब्बी पिकांचे रासायनिक तणनियंत्रण
रब्बी पिकांचे रासायनिक तणनियंत्रण
Published on
Updated on

पिकांच्या अधिक उत्पादनासाठी योग्य वेळेत तणनियंत्रण आवश्‍यक असते. तणनियंत्रणासाठी एकात्मिक तणनियंत्रण पद्धतीचा अवलंब करावा. मात्र मजुरांची कमतरता असल्यास पीकनिहाय योग्य तणनाशकांचा वापर करावा.     एकात्मिक तणनियंत्रणाच्या विविध पद्धती आहेत. त्यामध्ये पेरणीपूर्व मशागत, लागवड करतानाची मशागत, आंतरमशागत, तणनाशकांचा वापर आदी पद्धतींचा समावेश होतो.

तणनाशकाचा वापर : तणनाशकांचा वापर करताना महत्त्वाच्या बाबी :

  • तणनाशकाची निवड, वापरावयाचे प्रमाण व वेळ इत्यादींबाबत योग्य माहिती असावी.
  • शक्‍यतो पीक पेरणीनंतर, परंतु उगवणीपूर्वीचीच तणनाशके वापरावीत. उदा. एकदल पिकात ॲट्राझीन; तर द्विदल पिकांसाठी पेंडीमिथॅलीन.
  • उभ्या पिकातील तणनियंत्रणासाठीही तणनाशकांचा वापर करता येतो. मात्र त्यासाठी पिकाचा वर्ग माहित असणे आवश्‍यक आहे.
  • उभ्या पिकात तणनाशकांचा चांगला परिणाम दिसण्यासाठी तणे २ ते ४ पानांवर असताना फवारणी करावी.
  • तणनाशकांची फवारणी करताना जमिनीत पुरेसा ओलावा असावा. किमान २ ते ३ तास सूर्यप्रकाश असावा.
  • पाठीवरील साधा फवारणी पंप वापरावा. फ्लॅटपॅन किंवा फ्लडजेट नोझलचा वापर करावा. फवारणीचा अंश पिकावर जाऊ नये यासाठी वाऱ्याचा वेग कमी असताना फवारणी करावी.
  • मका :

  • वेळ : पीक उगवणीपूर्वी
  • तणनाशक : प्रतिहेक्‍टरी प्रति ३०० लिटर पाणी ॲट्राझीन (५० डब्ल्यु. पी)१००० ग्रॅम
  • हरभरा :

  • तणनाशक : प्रतिहेक्‍टरी प्रति ३०० लिटर पाणी पेंडीमिथॅलीन (३० टक्के) २.५ लिटर
  • टीप : पेरणीनंतर सहा आठवड्यांनी एक खुरपणी करावी.
  • सूर्यफूल :

  • वेळ : उगवणीपूर्वी
  • तणनाशक : प्रतिहेक्‍टरी प्रति ३०० लिटर पाणी ऑक्‍झीफ्लोरफेन (१० टक्के) १ लिटर
  • टीप : पेरणीनंतर सहा आठवड्यांनी एक खुरपणी व कोळपणी करावी.
  • करडई :

  • तणनाशक : प्रतिहेक्‍टरी प्रति ३०० लिटर पाणी ऑक्‍झीफ्लोरफेन  (१० टक्के) १ लिटर
  • कांदा :

  • तणनाशक : प्रतिहेक्‍टरी प्रति ३०० लिटर पाणी
  • ऑक्‍झीफ्लोरफेन  (१० टक्के) १ लिटर किंवा पेंडीमिथॅलीन  (३० टक्के) २.५ लिटर
  • टीप : ऑक्‍झीफ्लोरफेनची फवारणी करणार असल्यास पेरणीनंतर सहा आठवड्यांनी एक खुरपणी करावी. पेंडीमिथॅलीन फवारणी करणार असल्यास पेरणीनंतर सहा आठवड्यांनी एक खूरपणी करावी. किंवा पेरणीनंतर ३ व ६ आठवड्यांनी अशा दोन खुरपणी कराव्यात. 
  • तणवाढीमुळे उत्पादनातील घट
    पीक       उत्पादनात होणारी घट (टक्के)
    सूर्यफूल     ३० ते ३३
    करडई     ३० ते ३५
    हरभरा     २५ ते ४१
    गहू   ३० ते ३५
    पीक-तण स्पर्धेचा कालावधी
    पीक     पेरणीनंतरचे दिवस
    करडई    १५ ते ४५
    सूर्यफुल   १५ ते ४५
    गहू     पूर्ण वेळ

    संपर्क :  डॉ. अशोक जाधव, ९४२१३९२१९२ (उपसंचालक : संशोधन पिके, वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणी)

    ॲग्रोवनचे सदस्य व्हा

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com