खरीप हंगामात पाऊस भरपूर पडत असल्याने हा हंगाम फुलझाडांच्या लागवडीसाठी उत्तम असतो. मात्र या पिकांच्या लागवडीसाठी चांगला निचरा असलेली व भरपूर सेंद्रिय पदार्थयुक्त जमिनीची निवड करावी. व्यापारी उत्पादनासाठी तसेच शोभेसाठी म्हणून या पिकांची लागवड करताना सुधारित तंत्रज्ञानाचा वापर करावा. खरीप हंगामात झेंडू, गॅलार्डिया, अॅस्टर, शेवंती, चांदणी, झिनिया, कॉसमॉस, सूर्यफूल, टिथोनिया, बाल्सम, सिलोसिया, गॉन्फ्रेना, सालव्हिया, हॉलीहॉक, कॉक्स कोंब इत्यादी फुलझाडांच्या लागवडीसाठी अनुकूल काळ असतो. यापैकी झेंडू, अॅस्टर, गॅलार्डिया, चांदणी, डेझी इत्यादी फुलझाडांची व्यापारी तत्त्वावर लागवड केली जाते. इतर फुलांची बागांमध्ये ताटवे करून लागवड केली जाते. सुट्या फुलांसाठी अॅस्टर, झेंडू, गॅलार्डियाची लागवड केली जाते. कट फ्लॉवरसाठी अॅस्टर, कॉक्स कोंब, अमरॅन्थस ही फुलझाडे लावतात तर फिलरसाठी सोनतुरा हे पीक लावतात.
हवामान खरीप हंगामी फुलझाडांना उष्ण व दमट हवामान चांगले मानवते. चांगल्या वाढीसाठी दिवसाचे २५-३० अंश सेल्सिअस व रात्रीचे १५-२० सेल्सिअस तापमान लागते. सरासरी १५-२५ सेल्सिअस तापमानात चांगली वाढ होते. हवेतील चांगला दमटपणा व ६० ते ७० टक्के आर्द्रता या पिकांना मानवते. जमीन उत्तम वाढीसाठी चांगल्या निचऱ्याची मध्यम जमीन (सामू ६.५) निवडावी. जमीन सेंद्रिय पदार्थांनी समृद्ध असावी. कुंडीमध्ये लागवडीसाठी एक भाग शेणखत अधिक एक भाग पोयट्याची माती असे १ः१ प्रमाणाचे मिश्रण तयार करून केलेले माध्यम वापरावे. पूर्वमशागत एकदा खोल नांगरट व दोनवेळा कोळपणी करुन जमीन भुसभुशीत करून घ्यावी. शेवटची कोळपणी करताना हेक्टरी ३० टन शेणखत मातीत चांगले मिसळावे. पुर्वमशागतीनंतर सपाट वाफे किंवा सरी वरंबे तयार करावेत. कुंडीतील लागवडीसाठी कुंडीच्या तळाशी वाळलेला पालापाचोळा टाकून माती मिश्रणात १००-१५० ग्रॅम १५ः१५ः१५ हे खत मिसळून कुंड्या भराव्यात. कुंड्या भरताना वरुन एक ते दीड इंच मोकळ्या राहतील याची काळजी घ्यावी. लागवडीचे अंतर व वेळ फुलझाडांची वाढ व जमिनीच्या मगदुरानुसार लागवड ३०x३०, ३०x४५ अथवा ४५x४५ सें.मी. अंतरावर करावी. लागवड जून-जुलै महिन्यात करावी. खते व पाणी व्यवस्थापन लागवडीवेळी प्रतिहेक्टरी १०० किलो नत्र, २०० किलो स्फुरद, २०० किलो पालाश द्यावे. लागवडीनंतर एक दे दीड महिन्याच्या अंतराने उरलेली नत्राची मात्रा १०० किलो प्रतिहेक्टरी याप्रमाणात द्यावी. दर्जेदार व भरपूर उत्पादनासाठी पीक बहरात असताना २ टक्के (२० ग्रॅम प्रतिलिटर) युरियाची फवारणी करावी. निंदणी करताना रोपांना मातीची भर द्यावी. पिकांना पाऊस नसेल तर आवश्यकतेनुसार पाणी द्यावे. जादा पाऊस झाल्यास पाण्याचा योग्य निचरा होईल याची काळजी घ्यावी.
अभिवृद्धी व लागवड पद्धत
टीप : कंपनीकडूनच बियाणे प्रक्रिया केली असल्यास पुन्हा वेगळी करु नये.
संपर्क : डॉ. सतीश जाधव, ९४०४६८३७०९ (अखिल भारतीय समन्वयित पुष्प सुधार प्रकल्प, गणेशखिंड, पुणे.) ..
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.