पानमळ्यासाठी योग्य जातींची निवड महत्त्वाची

विड्याच्या पानाच्या जाती
विड्याच्या पानाच्या जाती
Published on
Updated on

पानमळा लागवडीसाठी सद्यस्थितीत अनुकूल काळ आहे. मात्र, अधिक व दर्जेदार उत्पादन; परिणामी जास्त उत्पन्न मिळविण्यासाठी बाजारात जास्त मागणी असलेल्या जातींची लागवड करणे आवश्‍यक आहे. त्यादृष्टिकोनातून जातींचा अभ्यास करून लागवड करावी. पानांची मागणी त्यांचा आकार, चव व रंग आदी गुणधर्मांवर अवलंबून असते. त्यादृष्टिकाेनातून विविध जाती आहेत.    जाती बांगला वर्गीय या जाती उत्तर भारत, मेघालय, पश्‍चिम बंगाल, मध्यप्रदेश, महाराष्ट्रातील नागपूर आणि केरळ राज्यांमध्ये मोठ्या प्रमाणात घेतल्या जातात. बांगला वर्गातील पानामध्ये ३५ प्रकार अाहेत. त्यामध्ये देशी बांगला, रामटेक बांगला, कलकत्ता बांगला, घाणेघाटी इत्यादींच्या पानांना मोठी मागणी असते. व्यापारीदृष्ट्या लागवडीसाठी या जाती उत्तम आहेत. पानांचा आकार मोठा असून रंग फिक्कट हिरवा व त्याला पिवळसर छटा असते. ते चवीला जास्त तिखट असते. कपूरी या जातींची लागवड तमिळनाडू, ओरिसा, आंध्रप्रदेश, केरळ, कर्नाटक आणि महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणावर होते. यामध्ये शंकरा कपूरी, गंगेली, वेलाई, सत्यावरम, डोमा, रामटेक कपूरी, कपूरी आर्वी, कपूरी पेढा, कपूरी सांगली, कपूरी पूना, कपूरी सोलापूर या भागापरत्वे लागवडीखाली आहेत. या वर्गातील पानांची ठळक वैशिष्ट्ये म्हणजे पानाची मध्यम वाढ, टोकाकडे निमूळती होणारी आखूड पाने, फिक्कट पिवळसर ते फिक्कट हिरवा रंग, कमी तिखटपणा ही होय. कालीपत्ती महाराष्ट्रातील ठाणे, अलिबाग या जिल्ह्यामध्ये नारळ व पोफळीच्या बागांमध्ये मोठ्या प्रमाणात घेतली जाते. पाने मोठी, रंग गर्द हिरवा, जास्त तिखट असून पाकिस्तानात मोठ्या प्रमाणात मागणी आहे.

मीठापान लागवड पश्‍चिम बंगालमधील मिदनापूर व हावडा जिल्ह्यात  मोठ्या प्रमाणात होते. घाटपाला व थाकपाला असे दोन प्रकार आहेत. आखुड गर्द हिरवे पान व त्यावर पिवळे ठिपके, गोड चव या वैशिष्ट्यांमुळे पानांस संपूर्ण भारतातून मागणी आहे. मघई बिहारमधील गया जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात घेतली जाते. पाने लंबगोल व रंगाने गडद हिरवी चवीला मध्यम तिखट असतात. देशावरी लागवड मध्यप्रदेश, उत्तरप्रदेश या राज्यात करतात. यामध्ये देशी देशावरी, मोहबा देशावरी, मालवी देशावरी आणि करुबाळी हे प्रकार आहेत. या जातीची पाने चवीला मध्यम गोड असतात. कृष्णा पान (डी.पी.बी. ६) कपूरी जातींमधून निवड पद्धतीने महात्मा फुले कृषी विद्यापीठाकडून विकसित जात. उत्पादन प्रचलित जातीपेक्षा २७ टक्के जास्त. पाने जाड व मोठी असतात. पानांचा अधिक टिकाऊपणा (१७ दिवस) जास्त असतो. आकार लंबगोल, शेंड्याकडे निमुळती व आकर्षक असतो. संपर्क : संदीप डिघुळे, ७७०९५४७३०७ (पानवेल संशोधन योजना, तेलबिया संशोधन केंद्र, जळगाव.)

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com