कोबीवर्गीय पिकांतील बटनिंग, ब्राऊन रॉट, व्हिप टेल विकृती

फ्लॉवरवरील बटनिंग व व्हीपटेल विकृती
फ्लॉवरवरील बटनिंग व व्हीपटेल विकृती
Published on
Updated on

कोबीवर्गीय पिकात सुक्ष्म अन्नद्रव्याच्या कमतरता, प्रतिकूल तापमान व शरीर दोषामुळे विविध प्रकारच्या शारीरिक विकृती आढळतात. अशा विकृतीग्रस्त गड्ड्यांना बाजारात अजिबात मागणी नसते. त्यामुळे विकृतींच्या कारणांचा अभ्यास करून त्या दूर करण्यासाठी प्रयत्न करावेत. कोबीवर्गीय पिकात बटनिंग, ब्राउन रॉट, व्हिप टेल , रायसिनेस, ब्लाइंडनेस, लीफ टीप बर्न आदी विकृती निर्माण होतात. त्यापैकी बटनिंग, ब्राउन रॉट, व्हिप टेल या विकृतींची कारणे, लक्षणे व उपाययोजना यांची माहिती घेऊ.    बटनिंग (गड्डा अतिलहान पडणे) :  ही विकृती फ्लॉवर आणि ब्रोकोलीवर दिसते. कारणे : नत्र या अन्नद्रव्याची कमतरता, शीत तापमानाचा लहान रोपांवर दुष्परिणाम, पाण्याचा ताण किंवा झाडाच्या शाखीय वाढीस अटकाव आणणारे इतर घटक. लक्षणे : फ्लॉवरचा गड्डा अतिशय लहान बटनासारखा येतो

उपाय:

  • वाढ खुंटलेली, जुनी रोपे पुनर्लागवडीस वापरायचे टाळावे.
  • रोपांच्या वाढीच्या काळात नत्रयुक्त खते शिफारशी प्रमाणात द्यावीत.
  • पाणी, आंतरमशागत, कीड व रोगनियंत्रण आदींबाबत योग्य काळजी घ्यावी.
  • लागवड वेळेवर करावी. लवकर येणाऱ्या जाती उशिरा लागवडीसाठी वापरू नयेत.
  • ब्राउन रॉट (गड्डा कुजणे) : ही विकृती फ्लॉवर आणि ब्रोकोलीवर आढळून येते. कारणे : बोरॉन या सुक्ष्म अन्नद्रव्याच्या कमतरतेमुळे ही विकृती आढळून येते. लक्षणे : खोड व गड्ड्यावर भुरकट डाग दिसतात आणि त्यातून पाणी बाहेर येते. गड्ड्याचा दांडा पोकळ, काळपट पडून कुजू लागतो. संपूर्ण गड्ड्यावर भुरकट काळे, कुजकट डाग दिसतात. वालुकामय जमिनीत ही विकृती अधिक प्रमाणात होते.

  • जमिनीत बोरॅक्स पावडर हेक्टरी २० किलो या प्रमाणात मिसळून घ्यावी  
  • लागवडीनंतर ३० दिवसांनी बोरॅक्स पावडर एक किलो प्रति ५०० लिटर पाण्यातून पिकावर फवारणी करावी.
  • शेतात सेंद्रिय खतांचा हेक्‍टरी २० ते २५ टन वापर करावा.
  • एकच पीक वारंवार न घेता पिकांची फेरपालट करावी.
  • व्हिप टेल : ही विकृती शक्यतो फुलकोबीवर दिसते. कारणे : जमिनीत मॉलिब्डेनम या सुक्ष्म अन्नद्रव्याची कमतरता किंवा आम्लधर्मीय जमिनीचा सामू ५ पेक्षा कमी अशा ठिकाणी ही विकृती दिसून येते. लक्षणे : पाने व्यवस्थित विकसित न होता अरुंद आणि खुरटलेली कातडी चाबकाच्या (व्हिप टेल) टोकासारखे लांब वाढलेले दिसतात. बऱ्याच वेळेस फक्त पानाच्या मुख्य शिरा विकसित होतात. झाडाचा शेंडा खुरटलेला राहतो आणि गड्डा भरत नाही. उपाय:

  • आम्लधर्मीय जमिनीचा सामू वाढविण्यासाठी चुनखडीचा वापर करावा.
  • लागवडीपूर्वी हेक्टरी १.२ किलो सोडियम मॉलिब्डेट किंवा अमोनियम मॉलिब्डेट जमिनीत मिसळल्यास ही विकृती टाळता येते.
  • संपर्क : ए. टी. दौंडे, ७५८८०८२००८. (अखिल भारतीय समन्वित संशोधन प्रकल्प भाजीपाला पिके, वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणी)  

    ॲग्रोवनचे सदस्य व्हा

    शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon - Agriculture News
    agrowon.esakal.com