कपाशी सल्ला

कोरडवाहू कापसाची पेरणी १५-३० जून किंवा मॉन्सूनचा ७५ ते १०० मिमी पाऊस (पेरणीयोग्य) झाल्यावर लवकरात लवकर पेरणी करावी. जांभूळवाही करूनच पेरणी करावी. जांभूळवाही केल्यास तणांचा प्रादुर्भाव २० टक्क्यांनी कमी होतो.
Weed control measures should be implemented early in the crop.
Weed control measures should be implemented early in the crop.

कोरडवाहू कापसाची पेरणी १५-३० जून किंवा मॉन्सूनचा ७५ ते १०० मिमी पाऊस (पेरणीयोग्य) झाल्यावर लवकरात लवकर पेरणी करावी. जांभूळवाही करूनच पेरणी करावी. जांभूळवाही केल्यास तणांचा प्रादुर्भाव २० टक्क्यांनी कमी होतो. भारतीय हवामान खात्याच्या दुसऱ्या अंदाजानुसार या वर्षी महाराष्ट्रात सरासरीच्या १०१ टक्के पाऊस अपेक्षित आहे. या समाधानकारक अंदाजाच्या पार्श्‍वभूमीवर सर्वत्र शेती मशागतीच्या कामांना वेग आला आहे. येत्या खरीप हंगामासाठी शेतकरी बी-बियाणे, खते व अन्य निविष्ठा खरेदीचे नियोजन करत आहेत. या वर्षी सोयाबीन बियाण्याचा तुटवडा जाणवत असून, परिणामी कापूस पिकाखालील क्षेत्र मागील हंगामाएवढेच राहण्याची शक्यता आहे. सध्याचा कालावधी कापूस लागवड व नियोजनाच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचा आहे. 

  • जमिनीची योग्य मशागत करून शेवटच्या वखरणीपूर्वी कोरडवाहू पिकासाठी हेक्टरी १२ ते १५ गाड्या आणि बागायती लागवडीसाठी २०-२५ गाड्या चांगले कुजलेले शेणखत किंवा कंपोस्ट खत शेतात सम प्रमाणात पसरून टाकावे. उपलब्ध असल्यास गांडूळ खत प्रति हेक्टरी २.५ टन शेणखत/ कंपोस्ट खतासोबत शेतात टाकून वखरवाही करून जमिनीत एकसारखे मिसळून द्यावे. जांभूळवाहीची वाट पाहावी
  • खरीप कपाशीसाठी आवश्यकतेनुसार लागणारे बीटी तसेच सुधारित व सरळ वाणांचे बियाणे, सेंद्रिय खते, रासायनिक खते, बीजप्रक्रियेसाठी लागणारी रसायने उदा. थायरम, कार्बेन्डाझिम, जैविक खते, पी.एस.बी., तसेच आवश्यक सूक्ष्म अन्नद्रव्ये याची जुळवाजुळव करून ठेवावी. 
  • बागायती कपाशी ठिबक सिंचनावर घेणार असल्यास ठिबक संचाची मांडणी तसेच फर्टिगेशन युनिट यांचे योग्य नियोजन करावे.
  • बियाणे खरेदी करताना पक्क्या बिलासह नामांकित कंपन्यांचे बीटी कापूस बियाणे, किंवा विद्यापीठनिर्मित सुधारित व सरळ वाण खरेदी करावे. शक्यतो कमी कालावधीच्या वाणांची निवड करावी.
  • कोरडवाहू कापसाची पेरणी १५-३० जून किंवा मॉन्सूनचा ७५ ते १०० मिमी पाऊस (पेरणीयोग्य) झाल्यावर लवकरात लवकर पेरणी करावी. जांभूळवाही करूनच पेरणी करावी. जांभूळवाही केल्यास तणांचा प्रादुर्भाव २० टक्क्यांनी कमी होतो.
  • कपाशीचे पीक बहुतांशी मोसमी पावसावर अवलंबून असल्यामुळे उत्तम जलधारणा शक्ती असणारी जमीन निवडावी. अति खोल व खोल जमिनीमध्ये (९० सें.मी.च्या वर) कपाशीचे सलग पीक घ्यावे. जमिनीच्या मगदुरानुसार कापूस वाणाची निवड करावी. पिकाच्या लागवडीतील अंतर ठेवावे. उथळ व हलक्या जमिनीत बीटी कपाशीची लागवड करू नये.
  • मागील वर्षी ज्या शेतात सोयाबीन, मूग, उडीद, तूर, किंवा ज्वारी यांसारखी पिके घेतली त्या शेतात पीक फेरपालट म्हणून कपाशीची लागवड करावी.
  • भारी काळ्या कापसाच्या जमिनीकरिता रसशोषक किडीस सहनशील (लवयुक्त) बीटी हायब्रीड (१८० दिवसांपेक्षा कमी कालावधीचे) निवड करावी.
  • मध्यम ते भारी जमिनीमध्ये अधिक आर्थिक मिळकतीकरिता शिफारशीनुसार प्रभावी आंतरपीक पद्धतीमध्ये कापूस+मूग (१:१) किंवा कापूस+उडीद (१:१) किंवा लवकर येणाऱ्या सोयाबीन जाती (१:१) या आंतरपीक पद्धतीचा अवलंब करावा. कपाशी+ज्वारी+तूर+ज्वारी (६:१:२:१ ओळी) या आंतरपीक पद्धतीचा अवलंब करता येतो. कपाशीच्या ८ ते १० ओळींनंतर तूर पिकाचे आंतरपीक घ्यावे.
  • पेरणीकरिता दर्जेदार, बीज प्रक्रिया केलेले व शिफारस केलेल्या वाणांचे (शक्यतो तंतूविरहित बियाण्याचा) वापर करावा. बीजप्रक्रिया केलेली नसल्यास पेरणी पूर्वी बियाण्यास कार्बोक्झिन १ ग्रॅम किंवा थायरम ३ ग्रॅम याप्रमाणे बीजप्रक्रिया करावी. बाजारात उपलब्ध असलेल्या बियाण्यास साधारणतः इमिडाक्लोप्रिड या कीटकनाशकाची बीजप्रक्रिया केलेली असते. ते तपासून पाहावे. बीजप्रक्रिया केलेली नसल्यास इमिडाक्लोप्रिड किंवा थायामेथोक्झाम या कीटकनाशकाची ७.५ ग्रॅम प्रति किलो बियाणे या प्रमाणात बीजप्रक्रिया करावी. यामुळे सुरुवातीस येणाऱ्या रसशोषक किडींचा प्रादुर्भाव कमी  होतो.  
  • संकरित बीटी बागायती कपाशी पेरणीकरिता लागवडीची पद्धत, सरी वरंबा किंवा ठिबक सिंचनाचा अवलंब करावा. भारी जमिनीकरिता लागवडीचे अंतर १२० × ६० किंवा १२० × ९० सेंमी ठेवावे. बियाण्याचे हेक्टरी प्रमाण २-२.५ किलो घेऊन रासायनिक खते १२०:६०:६० नत्र, स्फुरद व पालाश या मात्रेत द्यावे. 
  • कोरडवाहू देशी कपाशी लागवडीकरिता देशी सुधारित जाती एकेए-५, एकेए-७, एकेए-८, एकेए-८४०१ या वाणांची निवड करावी. पेरणी सरत्याने किंवा टोकून करावी. देशी कपाशीसाठी अंतर ६० × १५ सेंमी किंवा ६० × ३० सेंमी ठेवावे. हेक्टरी बियाण्याचे प्रमाण १२-१५ किलो वापरावे. देशी कपाशीकरिता ४०:२०:२० किलो नत्र, स्फुरद व पालाश प्रति हेक्टरी द्यावा.
  • कोरडवाहू अमेरिकन सुधारित कापूस लागवडीकरिता एकेएच ९-५ (सुवर्ण शुभ्रा), पीकेव्ही रजत, एकेएच-८८२८, हे वाण ६० × ३० सेंमी अंतरावर पेरावे. एकेएच-० ८१ या वाणाची ६० × १५ सेंमी अंतरावर पेरणी करावी. 
  • अतिघनता लागवडीकरिता एकेएच -०८१ या वाणाची ६० × १० सेंमी अंतरावर हेक्टरी १५ किलो बियाणे घेऊन लागवड करावी.
  • देशी संकरित कापूस लागवडीकरिता पीकेव्ही डीएच-१ व पीकेव्ही सुवर्णा या वाणांची लागवड करावी. 
  • कोरडवाहू बीटी वाण ९० × ४५ सेंमी अंतरावर पेरावे. ओलितासाठी हे अंतर १२० × ३० सेंमी ठेवावे. 
  • कोरडवाहूसाठी रासायनिक खताची मात्रा ६०:३०:३० किलो नत्र, स्फुरद व पालाश प्रति हेक्टरी द्यावी. (म्हणजेच ६५ किलो युरिया, १८७ किलो सिंगल सुपर फॉस्फेट, ५० किलो म्युरेट ऑफ पोटॅश आणि लागवडीनंतर ३० दिवसांनी ६५ किलो युरिया प्रति हेक्टरी द्यावा). माती परीक्षणानुसार रासायनिक खतांचे नेमके प्रमाण ठरवावे. 
  • बागायती बीटी कपाशी साठी १२०:६०:६० किलो नत्र, स्फुरद व पालाश प्रति हेक्टरी द्यावे. (म्हणजेच ८७ किलो युरिया, ३७५ किलो सिंगल सुपर फॉस्फेट आणि १०० किलो म्युरेट ऑफ पोटॅश पेरणीसोबत व पेरणीनंतर ३० दिवसांनी ८७ किलो युरिया आणि ६० दिवसांनी ८७ किलो युरिया प्रति हेक्टरी द्यावा.)  
  • उगवणपूर्व तणनाशकांचा वापर : सुरुवातीच्या काळात शेत तणविरहित ठेवण्यासाठी उगवणपूर्व तणनाशकांचा वापर करावा. 
  • पेंडीमिथॅलीन (३८.७%) १.५ ते १.७५ किलो 
  • प्रति हेक्टरी किंवा २ ते २.५ ग्रॅम किंवा मिलि प्रति लिटर पाणी) पेरणीनंतर त्वरित जमिनीवर फवारणी करावी.
  • (टीप : लेबलक्लेम शिफारशी आहेत.) - डॉ. संजय काकडे, कापूस कृषी विद्यावेत्ता,  ९८२२२३८७८०, डॉ. एन.आर.पोटदुखे, वरिष्ठ संशोधन शास्त्रज्ञ,  ८२७५०१३९०३ (कापूस संशोधन विभाग, डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ, अकोला) 

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com