भातावरील पर्ण करपा, कडा करपा रोग नियंत्रण

भातावरील पर्ण करपा, कडा करपा रोग नियंत्रण
भातावरील पर्ण करपा, कडा करपा रोग नियंत्रण
Published on
Updated on

राज्यात भातामध्ये अनेक ठिकाणी पर्ण करपा व कडा करपा या रोगांचा प्रादुर्भाव झाल्याचे दिसून येत आहे. त्यांच्या नियंत्रणासाठी तातडीने खालील उपाययोजना कराव्यात. पर्ण करपा ः रोगकारक बुरशी ः रिंकोस्पोरियम ओरायझी लक्षणे ः सुरवातीला पानाचे टोक किंवा कडेवर अर्धवर्तुळाकार फिक्कट ठिपके येतात. पुढे ते रुंद होत तपकिरी होतात. पानांचे शेंडे व काही वेळेस पानांचा मधला भागही करपलेला दिसतो. नियंत्रणासाठी, फवारणी प्रतिलिटर कार्बेन्डाझीम १ ग्रॅम किंवा प्रोपीकोनॅझोल १ मि.लि. किंवा मॅन्कोझेब २.५ ग्रॅम किंवा हेक्साकोनॅझोल १ मि.लि.

  • यासोबत स्टिकर १ मि.लि. या प्रमाणात मिसळावे.
  • आवश्यकतेनुसार दोन ते तीन फवारण्या बुरशीनाशक बदलून १० दिवसांच्या अंतराने कराव्यात.
  • कडा करपा ः रोगकारक जिवाणू ः झान्थोमोनस ओरायझी पी. व्ही. ओरायझी

    लक्षणे ः

  • पानाचे शेंडे व कडा फिक्कट हिरव्या होऊन करपतात. पुढे त्यांचा रंग राखाडी ते फिक्कट तपकिरी होतो. हिरवट भागाजवळच्या कडा सरळ न राहता वेड्यावाकड्या असतात.
  • रोगग्रस्त भागातून जिवाणूद्वारे द्रव पाझरल्यामुळे पानावर असंख्य पिवळसर दवबिंदू असल्याप्रमाणे दिसते. या द्रवामुळे रोगाचा प्रसार वेगाने होतो.
  • रोगग्रस्त भागाचा स्पर्श खडबडीत लागतो.
  • अनुकूल वातावरण ः उष्ण तापमान (२७ ते ३२ अंश सेल्सिअस), अधिक आर्द्रता (५५ टक्क्यांपेक्षा अधिक) रोगप्रसारासाठी अनुकूल असते. नियंत्रणासाठी, फवारणी प्रतिलिटर कॉपर ऑक्सिक्लोराईड २.५ ग्रॅम अधिक स्ट्रेप्टोमायसीन* ०.२० ते ०.२५ ग्रॅम अधिक स्टिकर १ मि.लि. आवश्यकतेनुसार पुढील फवारणी १० ते १५ दिवसांच्या अंतराने करावी. संपर्क ः ०२११४-२७२५४८ डॉ. अनिल गायकवाड, ९४२०४९८८११ (लेखक डॉ. क्षीरसागर, डॉ. बालगुडे हे कृषी संशोधन केंद्र, लोणावळा, ता. मावळ, जि. पुणे येथे, तर डॉ. गायकवाड हे अळिंबी सुधार प्रकल्प, कृषी महाविद्यालय, पुणे येथे कार्यरत आहेत.)

    ॲग्रोवनचे सदस्य व्हा

    शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Agrowon - Agriculture News
    agrowon.esakal.com