Jalgaon News: २०२५-२६ वित्तीय वर्ष संपत आले तरीदेखील खानदेशात जिल्हा परिषदेतर्फे राबविण्यात येत असलेल्या पाणी योजना अपूर्णच आहेत. याबाबत माहिती अथवा उत्तरे देण्याबाबत जिल्हा परिषद प्रशासनाला विभाग स्तरावर व वरिष्ठ स्तरावर अडचणी येत आहेत..जलजीवन मिशन अंतर्गत केंद्र व राज्य शासनाने ग्रामीण पाणीपुरवठा योजना हाती घेतल्या आहेत. परंतु या योजना रखडल्या असून, अनेक कामे सुरू होताच काही दिवसात बंद पडली आहेत. सध्या कुठलीही निवडणूक नाही. पण काही ग्रामपंचायतींच्या पंचवार्षिकची मुदत संपली आहे. यामुळे ग्रामपंचायतींतही प्रशासकराज आहे. निवडणुका जाहीर होण्यापूर्वी या योजना पूर्ण होतील की नाही, असा मुद्दा आहे..Jalgaon Zilla Parishad: जिल्हा परिषदेचे अंदाजपत्रक अंतिम करण्याची शक्यता.काही योजना मागील सात ते आठ महिने रखडल्या आहेत. जळगावात सुमारे १९० पाणी योजना अपूर्ण आहेत. जळगाव जिल्हा परिषदेत प्रशासकराज असल्याने सदस्य नाहीत. अधिकारीच जिल्हा परिषदेचे कामकाज रेटत आहेत..त्यावर पदाधिकारी आदींचे नियंत्रण नाही. यामुळे जळगाव जिल्हा परिषदेच्या अनेक योजना अपूर्ण आहेत. नंदुरबार जिल्हा परिषदेत पाणी योजनांवरून रणकंदन झाले होते. विरोधकांनी अपूर्ण योजनांची पाहणी करून त्यासंबंधी जबाबदार अधिकारी, पदाधिकारी यांच्यावर कारवाईची मागणी केली होती..Jalgaon Zilla Parishad: जळगाव जिल्हा परिषदेत ‘कृषी’साठी कमी तरतूद .आता वित्तीय वर्ष संपण्यास सुमारे ४५ दिवस राहिले आहेत. या योजनांना मंजुरी देऊनही त्या वर्षभरात का पूर्ण झाल्या नाहीत, यासंबंधी आढावा घेण्यात आला आहे. अनेक ठेकेदारांनी योजनेला मुदतवाढ द्या, अशी मागणी केली होती. नंदुरबारात अपूर्ण पाणी योजना व त्यावर खर्च झालेला निधी याच्या तक्रारी समोर आल्या होत्या..हतबल प्रशासनजळगाव जिल्ह्यात १३५४ कामांपैकी फक्त १९० पाणी योजनांची कामे पूर्ण झाली आहेत. काही योजनांना मध्यंतरी मुदतवाढ दिली होती. यामुळे प्रशासनही हतबल झाले आहे. काही भागात मजुरांची समस्या, तांत्रिक कारणे सांगितली जात आहेत. काही भागात निधीच नसल्याची अडचण सांगितली जाते. यामुळेदेखील या योजनांना फटका बसला आहे..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.