Jaljeevan Mission Scheme: तरुणांना ‘जलमित्र’च्या माध्यमातून रोजगार

Maharashtra Jaljeevan Mission: प्रत्येक कुटुंबाला पाणीपुरवठा व्हावा, या दृष्टीने सरकारने जलजीवन मिशन योजना आखली आहे.
Jaljeevan Mission
Jaljeevan MissionAgrowon
Published on
Updated on

Mahad News: प्रत्येक कुटुंबाला पाणीपुरवठा व्हावा, या दृष्टीने सरकारने जलजीवन मिशन योजना आखली आहे. योजना पूर्ण झाल्यानंतर त्‍याची देखभाल व दुरुस्ती होणे आवश्यक आहे. म्हणूनच आता प्रत्येक ग्रामपंचायतीमध्ये जलमित्रांची नियुक्ती केली जाणार असून यामध्ये गवंडी कम प्बलं र, मेकॅनिकल फिटर आणि इलेक्ट्शिरि यन पंप ऑपरेटर यांचा समावेश आहे. यामुळे अंगी कौशल्य असलेल्या तरुणांना गावातच रोजगार मिळणार आहे.

महाडमधील १३४ ग्रामपंचायतीमध्ये एक हजार २०६ उमेदवारांनी अर्ज केले आहेत. जलजीवन मिशनच्या माध्यमातून ग्रामीण भागातील प्रत्येक घराला प्रति माणसी दररोज ५५ लिटर पिण्याचे पाणी नळाद्वारे पुरविण्यासाठी योजना आखण्यात आली आहे.

योजनेची अंमलबजावणी प्रभावीपणे व्हावी व सातत्याने पाणीपुरवठा व्हावा, उद्शाने तां दे त्रिक मनुष्यबळाची आवश्यकता आहे. याच अनुषंगाने ग्रामपंचायत स्तरावर तीन जलमित्रांची नियुक्ती करण्याचा निर्णय सरकारकडून घेण्यात आला आहे. जिल्ह्यात ८०९ ग्रामपंचायतीमध्ये प्रत्येक तीन यानुसार दोन हजार ४४७ जलमित्रांची नियुक्तीहोणार आहे.

Jaljeevan Mission
Employment Guarantee Scheme : रोजगार हमी योजनेतील सिंचनविहिरींच्या मान्यता रखडली

अशी होणार नेमणूक जलजीवन मिशन योजनेत गवंडी कम प्लंबर, मेकॅनिकल-फिटर आणि इलेक्ट्रिशियन-पंप ऑपरेटर अशा तीन विविध तांत्रिक कौशल्यांवर आधारित जलमित्रांची नियुक्ती केली जाणार आहे. ग्रामपंचायतीमध्ये आधीच यासंबंधी अनुभव असलेल्या उमेदवारांना प्राधान्य दिले जाईल.

यासाठी प्रत्येक ग्रामसेवकाकडून आपापल्या पंचायतीमधून संबंधित तांत्रिक कौशल्य असलेल्या जलमित्रांची गुणवत्ता यादी तयार करून पंचायत समितीकडे पाठविली जाईल. जलमित्रांच्या निवडीसाठी करण्यासाठी त्यांचे फोटो, आधार कार्ड आणि संबंधित माहिती पंचायत समितीकडे सादर करावी लागणार आहे. उमेदवारांची प्री-स्क्रीनिंग टेस्ट घेतली जाईल, ज्यामधून कौशल्यांच्या आधारे अंतिम तीन उमेदवारांची निवड होईल.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com