Ladli Behna Yojana: लाडली बहना योजनेतून मिळणार महिन्याला ३ हजार रुपये; मुख्यमंत्री मोहन यादव यांची घोषणा
CM Mohan Yadav: मध्य प्रदेशात लाडली बहना योजना सुरु आहे. या योजनेचा हप्ता वाढविण्याचा निर्णय मध्य प्रदेश सरकारने घेतला आहे. मुख्यमंत्री मोहन यादव यांनी शुक्रवारी (ता. १२) झाबुआ जिल्ह्यातील पेटलावद येथील कार्यक्रमात बोलताना ही घोषणा केली.