Unseasonal Rainfall Issue: हवामानात अचानक बदल होऊन गुरुवारी (ता.२१) सायंकाळी सहाच्या सुमारास येवला व नांदगाव तालुक्यांत विविध ठिकाणी वादळी वारे आणि विजांच्या कडकडाटात पावसाने जोरदार मॉन्सूनपूर्व हजेरी लावली. पावसामुळे वीजपुरवठा खंडित झाला. तर काही ठिकाणी झाडे मोडून पडली. पोल्ट्री शेडसह पपई लागवडीचे नुकसान झाल्याचे समोर आले..येवला तालुक्यात वादळ आणि पावसामुळे पूर्व भागाला पार झोडपून काढले. सोसाट्याच्या वाऱ्याचा वेग इतका प्रचंड होता, की शहर आणि परिसरातील अनेक मुख्य रस्त्यांवर झाडांच्या मोठ्या फांद्या मोडून पडल्या, तर काही ठिकाणी किरकोळ पडझड झाली. या वादळाचा थेट फटका महावितरणच्या यंत्रणेला बसला..Raigad Unseasonal Rain: रायगड जिल्हा १२ तास अंधारात.अनेक ठिकाणी विजेच्या तारांवर झाडांच्या फांद्या पडल्याने तसेच वीजखांब हलल्याने, खबरदारीचा उपाय म्हणून संपूर्ण शहर व परिसराचा वीजपुरवठा खंडित करण्यात आला होता. वादळामुळे सर्वाधिक फटका फळबाग उत्पादकांना बसला आहे. काढणीला आलेल्या आंब्याची मोठ्या प्रमाणावर फळगळ झाली..Unseasonal Rain Damages: पूर्व मोसमी पावसाने साडेचारशे हेक्टरवरील पिके बाधित.तर नांदगाव तालुक्याच्या साकोरा आणि बाणगाव परिसरांनाही गुरुवारी वादळी पावसाने झोडपून काढल्याने पोल्ट्रीफार्मसह पिके आणि घरांचे मोठे नुकसान झाले आहे. साकोरा परिसरात वादळामुळे नांदगाव रस्त्यावर अनेक ठिकाणी झाडे उन्मळून पडल्याने वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली होती; मात्र माजी सरपंचांच्या पुढाकाराने रात्री उशिरापर्यंत रस्ता मोकळा करण्याचे काम सुरू होते..या वादळात साकोरा येथील गट नंबर ११०४ मधील सर्जेराव छत्रे यांच्या पोल्ट्रीवर लिंबाचे झाड कोसळल्याने कोंबड्या मृत झाल्या, तर वसंत बोरसे व केशव बोरसे यांची चार एकर पपई मोडून पडली. तसेच परिसरातील चार एकर केळीच्या बागेलाही फटका बसला आहे..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.