शेखर गायकवाडIndian Farming: शेतकरी बाजाराच्या अनिश्चिततेमुळे नियोजन करू शकत नाही. एका वर्षी किमती जास्त मिळाल्या म्हणून पुढच्या वर्षी सर्व शेतकरी तेच पीक घेतात; मग अतिपुरवठ्यामुळे दर कोसळतात. हे चक्र ‘बूम अँड बस्ट सायकल’ म्हणून ओळखले जाते..आंतरराष्ट्रीय बाजारातील चढ-उतार, जागतिक मागणी-पुरवठा, हवामान बदल, व्यापार धोरणे आणि मोठ्या देशांच्या आर्थिक निर्णयांचा भारतीय शेतकऱ्यांच्या उत्पन्नावर आणि जीवनमानावर थेट परिणाम होतो. कृषी मालांच्या किमतींमधील चढ-उतार हे आता ‘ग्लोबल फूड सिस्टिम’च्या एका गुंतागुंतीच्या जाळ्याचा भाग झाले आहेत..कृषी मालांच्या किमतींचे स्वरूपकृषी माल म्हणजे धान्य, तेलबिया, कापूस, साखर, चहा, कॉफी, मसाले, फळे-भाज्या, दुग्धजन्य पदार्थ आदी. या सर्व वस्तूंची किंमत आंतरराष्ट्रीय बाजारात ठरवली जाते. त्या किमतींवर खालील घटकांचा प्रभाव असतो..मोठ्या उत्पादक देशांमध्ये दुष्काळ, पूर किंवा तापमानातील बदल झाले तर उत्पादन घटते आणि किंमत वाढते.जागतिक मागणी वाढली किंवा उत्पादन घटले की किमती वाढतात; उलट परिस्थितीत किमती घसरतात..Agriculture Trade: भारताच्या शेतमालास रशियाची दारे खुली, पुतिन यांचा मोठा निर्णय, पीएम मोदींचं तोंडभरुन कौतुक.आयात शुल्क, निर्यातबंदी, अनुदाने, कर सवलतींचा थेट परिणाम किमतीवर होतो.डॉलर, रुपया किंवा युरो यांच्या दरातील बदलामुळे आयात-निर्यात फायदेशीर किंवा तोट्याची ठरते.मोठ्या अन्न-व्यापार कंपन्या किंमतींवर प्रभाव टाकतात..जागतिक व्यापारात भारताचे स्थानभारत जगातील प्रमुख कृषी उत्पादक देशांपैकी एक आहे. भारताची कृषी निर्यात २०२४-२५ मध्ये सुमारे ५० अब्ज डॉलर्स इतकी झाली आहे. परंतु याच वेळी भारत अनेक वस्तू आयातही करतो. त्यामुळे जागतिक किमतींचे बदल हे भारतासाठी दुधारी तलवार ठरतात. काही वेळा शेतकऱ्यांना फायदा होतो, तर काही वेळा तोटा..जागतिक किमतींचा प्रभावकापूस, साखर, चहा, कॉफी, मसाले यांसारख्या पिकांचे भाव थेट जागतिक दरांशी जोडलेले असतात. जागतिक किमती वाढतात, तेव्हा भारतीय शेतकऱ्यांना चांगला भाव मिळतो. खाद्यतेलांच्या जागतिक किमती वाढल्या, की भारतात महागाई वाढते. त्यामुळे सरकार आयात कमी करण्यासाठी सवलत देते, पण स्थानिक तेलबिया शेतकऱ्यांना स्पर्धा झेलावी लागते. .जागतिक खत, इंधन, आणि कीटकनाशकांच्या दरवाढीमुळे उत्पादन खर्च वाढतो. रशिया-युक्रेन युद्धामुळे डीएपी आणि युरिया खतांच्या किमतींनी शेतकऱ्यांचा खर्च वाढवला. डॉलरच्या तुलनेत रुपया कमजोर झाला की निर्यात फायदेशीर होते, परंतु आयात महाग होते. उदा, कापसाची निर्यात वाढते, पण खत आयात महाग होते..Agricultural Trade : भारत-रशिया यांच्यात व्यापार, कृषी क्षेत्रात सहकार्य वाढवण्यावर सहमती.शेतकरी बाजाराच्या अनिश्चिततेमुळे नियोजन करू शकत नाही. एका वर्षी किमती जास्त मिळाल्या म्हणून पुढच्या वर्षी सर्व शेतकरी तेच पीक घेतात; मग अतिपुरवठ्यामुळे दर कोसळतात. हे चक्र ‘बूम अँड बस्ट सायकल’ म्हणून ओळखले जाते. सरकार दरवर्षी काही प्रमुख पिकांसाठी किमान आधारभाव जाहीर करते. परंतु एमएसपी फक्त मर्यादित पिकांसाठी प्रभावी आहे (मुख्यतः तांदूळ, गहू). इतर पिकांसाठी बाजारभाव त्याखाली राहतो. सरकार जागतिक परिस्थितीनुसार काही वेळा निर्यातबंदी किंवा आयात शुल्कात बदल करते. उदा. कांदा व तांदूळ निर्यातबंदी किंवा खाद्यतेलांवरील आयात शुल्क कमी करणे..उत्पन्न संरक्षण‘प्रधानमंत्री फसल बीमा योजना’ व पीएम किसान यांसारख्या योजनांद्वारे शेतकऱ्यांना आर्थिक आधार दिला जातो, पण या योजना अजूनही प्रभावी अंमलबजावणीच्या टप्प्यावर आहेत. अपेडा आणि विविध कृषी मंडळांद्वारे कृषी निर्यात वाढविण्यासाठी प्रयत्न होत आहेत. ‘वन डिस्ट्रिक्ट वन प्रॉडक्ट’ योजनेमुळे स्थानिक विशेष उत्पादनांना जागतिक बाजारपेठ मिळण्याची संधी निर्माण झाली आहे..आर्थिक-सामाजिक परिणामजागतिक दर वाढल्यास अल्पकालीन नफा मिळतो, पण दीर्घकाळात अस्थिरता वाढते. उत्पादन खर्च वाढल्याने नफ्यात घट येते. शेतकऱ्यांमध्ये उत्पन्न विषमता वाढते. निर्यातक्षम पिके घेणारे शेतकरी श्रीमंत होतात, तर अन्नधान्य उत्पादक मागे पडतात. किंमतीतील अस्थिरतेमुळे ग्रामीण समाजात असुरक्षिततेची भावना वाढते. कर्जबाजारीपणा वाढतो, आत्महत्यांचे प्रमाण वाढते. जास्त भाव मिळणाऱ्या निर्यातक्षम पिकांकडे झुकाव वाढल्याने एकाच पिकावर अवलंबित्व वाढते (उदा. कापूस, ऊस)..सरकारने काही वस्तूंकरिता किंमत स्थिरता निधी वाढवावा, जेणेकरून आंतरराष्ट्रीय दरघट झाल्यास शेतकऱ्यांना संरक्षण मिळेल. शेतकऱ्यांनी एका पिकावर अवलंबून राहू नये. कोल्ड स्टोअरेज, मूल्यवर्धन, आणि स्थानिक प्रक्रिया उद्योग उभारल्यास जागतिक दरघट झाली तरी स्थानिक स्तरावर उत्पन्न टिकवता येईल. जागतिक कृषी मालांच्या किमतींचा भारतीय शेतकऱ्यांवर होणारा परिणाम हा बहुआयामी आहे.shekharsatbara@gmail.com.ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.