World Bank Flood Inspect : जागतिक बँक पथकाकडून पूरप्रवण क्षेत्राची पाहणी; ३ हजार २०० कोटींचा निधी बँक देणार!

World Bank Team Kolhapur : जागतिक बँकेच्या प्रतिनिधींनी पंचगंगा आणि कृष्णेच्या पूरप्रवण क्षेत्रांची पाहणी केली. २ गटातील प्रतिनिधींच्या २ गट होते. यातील १ गट सांगली तर दुसऱ्या गटाने कोल्हापुरात पाहणी केली.
World Bank Flood Inspect
World Bank Flood Inspectagrowon
Published on
Updated on

Panchganga Krushna River : कोल्हापूर येथील पंचगंगा-कृष्णेच्या महापुराची व्याप्ती कमी करण्यासाठी होणाऱ्या उपाययोजनांसाठी जागतिक बँक अर्थसाहाय्य करणार आहे. यासाठी जागतिक बँकेच्या प्रतिनिधींनी पंचगंगा आणि कृष्णेच्या पूरप्रवण क्षेत्रांची पाहणी केली. २ गटातील प्रतिनिधींच्या २ गट होते. यातील १ गट सांगली तर दुसऱ्या गटाने कोल्हापुरात पाहणी केली. त्यांनी राधानगरी धरण, शिंगणापूर बंधारा, प्रयाग संगम आणि सुतारमळा येथे पाहणी केली. यावेळी जलसंपदा, महापालिकेचे अधिकारी त्यांच्या सोबत होते.

महाराष्ट्र रिझिलिन्स डेव्हलपमेंट प्रोग्राम या प्रकल्पांतर्गत पूरनियंत्रणाच्या उपाययोजना केल्या जाणार आहेत. यासाठी ३ हजार २०० कोटींचा निधी लागणार असून, त्यातील २ हजार ३३८ कोटींचा निधी जागतिक बँक देणार आहे. यासाठी त्यांच्या प्रतिनिधींनी पाहणी केली.

सकाळीच्या सुमारास बँकेचे प्रतिनिधी युकियो तानाका, रुमिता चौधरी, अभिजित सहा, मित्रा संस्थेचे संचालक विनय कुलकर्णी, जलसंपदाचे अधीक्षक अभियंता अभिजित म्हेत्रे, कार्यकारी अभियंता स्मिता माने, रोहित बांदवडेकर या पथकाने राधानगरी धरणाची पाहणी केली. त्यांनी तेथील स्वयंचलित दरवाजे पाहिले. येथे ‘रिडल गेट’ बसविण्याचा प्रस्ताव महापूर नियंत्रणाच्या उपाययोजनेत आहे, याचाही आढावा घेतला.

World Bank Flood Inspect
Kolhapur Milk Sanstha : कोल्हापुरातील ५०६ बोगस दूध संस्थांची नोंदणी रद्द; गोकुळमधील ७० टक्के दूध संस्थांना फटका

अतिवृष्टी काळात अतिरिक्त पाणी भोगावती आणि दूधगंगा खोऱ्यात सोडून पूरस्थितीची तीव्रता कमी करण्यासाठी करंजफेण-नरतवडे बोगद्याची योजना प्रस्तावित करण्यात आली आहे. प्रस्तावित योजनेनुसार साडेचार किलोमीटरचा बोगदा करंजफेण येथील भोगावती पात्रापासून ते दूधगंगा नदीपर्यंत (नरतवडे) काढण्यात येणार आहे. याचीही माहिती जागतिक बँकेंच्या प्रतिनिधींनी घेत पाहणी केली.

त्यानंतर पथकाने शिंगणापूर येथे बंधाऱ्याची पाहणी केली. येथे महापालिकेचे उपसा केंद्र आहे. ते महापुरात पाण्याखाली जाते. याचीही माहिती पथकाने घेतली. पथक प्रयाग येथील संगमावर आले. त्यांनी या परिसराची पाहणी केली. तेथून सुतारवाड्याजवळील भागाची पाहणी पथकाने केली.

या परिसरात किती फूट पाणी येते, त्यावेळी पंचगंगा किती फुटांवर असते, अशा स्वरूपाची माहिती घेतली. यावेळी शहर अभियंता नेत्रदीप सरनोबत, अतिरिक्त आयुक्त राहुल रोकडे, जलअभियंता हर्षजित घाटगे, अग्निशमक दलाचे मनीष रणभिसे उपस्थित होते.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com