Labor Shortage : यवतमाळ जिल्ह्यातील कामे मजुरांअभावी खोळंबली

Rural Employment Scheme : गेल्या दीड महिन्यांपासून विधानसभा निवडणुकीची धामधूम चालू होती. यात प्रचार सभांमध्ये चक्क पैसे देऊन गर्दी निर्माण केल्या जात होती.
Rural Employment
Rural Employment Agrowon
Published on
Updated on

Yavatmal News : गेल्या दीड महिन्यांपासून विधानसभा निवडणुकीची धामधूम चालू होती. यात प्रचार सभांमध्ये चक्क पैसे देऊन गर्दी निर्माण केल्या जात होती. त्यामुळे रोजगार हमी योजनेच्या कामांवर मजुरांचा ’शॉर्टेज’ मोठ्या प्रमाणात दिसला.

आठवड्याभरात जिल्ह्यातील बाराशे ग्रामपंचायतीत एक हजार ३३५ कामे चालू होते. या कामावर ३४ हजार ६५० मजुरांची उपस्थिती होती. आता निवडणुका संपल्यामुळे रोहयोच्या कामांना गती मिळण्याची शक्यता आहे.

Rural Employment
Labor Shortage : कापूस वेचणीला मजूर मिळेनात; शेतकरी त्रस्त

मजुरांच्या हाताला काम मिळावे, यासाठी रोजगार हमी योजना कार्यान्वित करण्यात आली. या योजनेच्या माध्यमातून ग्रामपंचायत स्तरावर सिमेंट रोड, घरकुल, नाफेड कंपोस्टिंग, फळबाग लागवड, गुरांचा गोठा, विहीर पुनर्भरण, वैयक्तिक बांबू लागवड, सार्वजनिक बांबू लागवड, पोल्ट्री शेड, पेव्हर ब्लॉक, सिमेंट काँक्रीट नाली, जिल्हा परिषद शाळेला सुरक्षा भिंत, आदी कामे केल्या जात आहेत.

Rural Employment
Labor Shortage : निवडणुकीच्या रणधुमाळीमुळे शेतमजुरांची टंचाई

गेल्या काही दिवसांपासून जिल्ह्यातील बाराशे ग्रामपंचायतीत एक हजार ३३५ कामे चालू आहेत. या कामावर ३४ हजार ६५० मजूर कार्यरत आहे. मोठ्या प्रमाणात कामे चालू असताना मजुरांची संख्या मोठी राहणे अपेक्षित आहे.

परंतु मध्यंतरीच्या काळात महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकांचा रणसंग्राम चालू होता. आता मात्र निवडणूक आटोपली असून, मजुरांचा कल कामांकडे लागण्याची शक्यता आहे. त्यामुळे येत्या काही दिवसांत कामांना गती येण्याची शक्यता आहे.

Rural Employment
Labor Shortage : कापूस फुटला, पण वेचणीला मजूरच मिळेनात

१५ दिवसांत कमविले महिन्याभराची मजुरी

निवडणूक रिंगणातील उमेदवारांना प्रचारासाठी १५ दिवसांचा अवधी मिळाली. या काळात प्रत्येक मजुरासह सर्वसामान्य व्यक्तीला साधारणतः पाचशे ते सातशे रुपये रोज दिल्या जात होता. सोबत दोन्ही वेळचे जेवण राहत होते.

यात उमेदवारांच्या मागे फिरणे, नेत्यांच्या सभांना उपस्थित राहावे लागत होते. त्यामुळे अवघ्या १५ दिवसांत महिन्याभराची कमाई मजुरांच्या हाती पडली. परंतु, इतर अनेक कामे मात्र मजुरांअभावी खोळंबली आहेत, ती आता मार्गी लागण्याची शक्यता आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com