Labor Shortage : कापूस फुटला, पण वेचणीला मजूरच मिळेनात

Cotton Picking : खरीप हंगामात शेतकऱ्यांनी लागवड केलेल्या बहुतांश शेतमालाची काढणी सुरू आहे. आता रब्बी हंगामातील मशागतीला वेग आला आहे.
Cotton Picking
Cotton Picking Agrowon
Published on
Updated on

Chh. Sambhajinagar News : खरीप हंगामात शेतकऱ्यांनी लागवड केलेल्या बहुतांश शेतमालाची काढणी सुरू आहे. आता रब्बी हंगामातील मशागतीला वेग आला आहे. पैठण तालुक्यात काही भागांत गहू, हरभरा या पिकांची पेरणी सुद्धा सुरू आहे.

अशातच कापूस वेचणी व रब्बीच्या पेरणीसाठी मजुरांची टंचाई जाणवत असल्याने शेतकरी मेटाकुटीला आला आहे. परिणामी मजुरांच्या शोधात शेतकऱ्यांची धावपळ होत आहे. मजुरांअभावी पांढरे सोने शेतातच पडून आहे.

Cotton Picking
Cotton Picking : कापूस वेचणीला आला; सीतादहीची लगबग

एकीकडे निसर्गाची अवकृपा तर दुसरीकडे शासनाचे शेतकरीविरोधी धोरण यामुळे शेतीला दिवसेंदिवस अवकळा आली आहे. शेती कामासाठी मजूर मिळत नसल्याने शेतकऱ्यांना मजुरांसाठी शोधाशोध करावी लागत असून, मजुरांची मनधरणी करताना शेतकरी दिसून येत आहेत.

Cotton Picking
Cotton Picking : कपाशीचा दोन वेचणीतच झाला खराटा

आधीच शेतकरी शेती साहित्याच्या वाढलेल्या दरांमुळे मेटाकुटीस आला आहे. रासायनिक खते, औषधींच्या किमती गगनाला भिडल्या आहे. त्यात उत्पादन क्षमता देखील कमी झाली आहे.

कापूस वेचणीसाठी मजुरीचा खर्चही वाढला

कापूस कमी दरात शेतकऱ्यांना विकावा लागत असला, तरी ८ ते ९ रुपये किलोप्रमाणे बाहेरील मजूर आणून कापूस वेचणी करावी लागत आहे. सध्या सर्वत्र कापूस वेचणीची लगबग सुरू झाली असून, शेतकऱ्यांना कापूस वेचणी करण्यासाठी मजुरांच्या शोधत फिरावे लागत आहे. वेचणीचा खर्च वाढल्याने तसेच कापसाला बाजारपेठेत चांगला दर नसल्याने शेतकऱ्यांत नाराजीचा सूर उमटत आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com