Rajgad Sugar Mill : 'राजगड'चे कामगार आंदोलनाच्या पवित्र्यात

Sugar Worker Protest : राजगड साखर कारखान्याने यंदा कारखाना बंद ठेवत कामकाज स्थगितीची नोटीस गेटवर लावली आहे.
Rajgad Sugar Mill
Rajgad Sugar MillAgrowon

Pune News : राजगड साखर कारखान्याने यंदा कारखाना बंद ठेवत कामकाज स्थगितीची नोटीस गेटवर लावली आहे. मात्र कामगारांनी यावर तीव्र नाराजी व्यक्त करत कामकाज स्थगिती करारावर सह्या करण्यास नकार दिला असून कामकाज स्थगितीची नोटीस मागे घेऊन कामगारांचा पंचवीस महिन्यांचे वेतन व थकित देय ताबडतोब द्यावेत, अन्यथा आंदोलन करण्याचा पवित्रा घेतला आहे.

कारखाना व्यवस्थापनाने मंगळवारपासून (ता. १३) यंदाचा हंगाम बंदबाबत नोटीस कारखाना गेटवर लावली आहे. या विरोधात कामगार संघटनेच्या सूचनेनुसार अनेक कामगारांनी कार्यकारी संचालकांच्या नावे निवेदन दिले आहे.

Rajgad Sugar Mill
Sugar Factory : सांगलीतील महांकाली, माणगंगा साखर कारखाने बंदच

याबाबत ही कामकाज बंदी बेकायदा असल्याचे कामगार संघटनेने म्हटले असून व्यवस्थापनाने कायम व हंगामी अशा सर्व कामगारांचे पंचवीस महिन्यांचे सुमारे ५ कोटी ९७ लाख ६० हजार ६३९ रुपये पगार थकित ठेवले असून देय वेतनातून कपात घेतलेल्या रकमाही संबंधित संस्था व सहकारी कार्यालयात जमा केल्या नसल्याचा आरोप कामगारांनी केला आहे.

Rajgad Sugar Mill
Sugar Factory : साखर उताऱ्यात सहकारी कारखान्यांची आघाडी

या वेळी बोलताना कामगारांनी मागील वेळीदेखील कामकाज स्थगितीचा करार करून फसवून आमच्या सह्या घेतल्या व त्या काळातला पगारदेखील आम्हाला दिला गेला नाही, असा आरोप केला.

कारखान्याचे काम बंद असताना कामगार इतर ठिकाणी कामास गेला तर धमकावून नोटीस देऊन परत बोलावले जाते व इकडे आल्यावर पगार देखील दिला जात नाही कामगारांनी उदरनिर्वाह कसा करायचा, असा प्रश्न काही कामगारांनी उपस्थित केला.

या वेळी संघटनेचे अध्यक्ष रामचंद्र राजेशिर्के, संदीप सोनवणे, सुनील मारणे, ज्ञानेश्वर कडू, सूर्यकांत गरुड, मोहन सुतार आदी कामगारांनी कामगार संघटनेची बाजू मांडताना कारखाना व्यवस्थापनाने आमच्या मागण्यांचा विचार केला नाही तर भोर तहसील कचेरीसमोर उपोषणास बसण्याचा आमचा निर्धार असल्याचे त्यांनी सांगितले.

या बाबत कारखान्याचे अध्यक्ष आमदार संग्राम थोपटे यांच्याशी संपर्क साधला असता या बाबत कारखान्याच्या कामगारांबरोबर सोमवारी (ता. १९) बैठक घेणार असून योग्य मार्ग काढण्यात येईल, असे त्यांनी सांगितले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com