Amravati Bribe News : महिला सरपंचासह पतीला वीस हजारांच्या लाचप्रकरणी अटक

Mahila Sarpanch : राहणीमान भत्त्याच्या धनादेशावर स्वाक्षरी करण्यासाठी मागितलेली २० हजार रुपयांची लाच स्वीकारल्या प्रकरणी महिला सरपंचासह पतीला अटक करण्यात आली आहे.
Bribe
BribeAgrowon

ॲग्रोवन वृत्तसेवा
Amravati News : चिखलदरा, जि. अमरावती : राहणीमान भत्त्याच्या धनादेशावर स्वाक्षरी करण्यासाठी मागितलेली २० हजार रुपयांची लाच स्वीकारल्या प्रकरणी महिला सरपंचासह पतीला अटक करण्यात आली आहे.
अमरावतीच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने धारणी तालुक्यातील बिजूधावडी येथील बँक ऑफ महाराष्ट्राच्या शाखेसमोर हा सापळा रचला होता. सरपंच जसमाय छोटेलाल मावस्कर (वय ३८) व पती छोटेलाल सोनाजी मावस्कर (वय ४२, रा. अढाव), असे एसीबीच्या पथकाने अटक केलेल्या दोघांची नावे आहेत.

जसमाय मावस्कर या चिखलदरा तालुक्यातील अढाव ग्रामपंचायतीच्या सरपंच आहेत. यातील तक्रारकर्ता व्यक्तीला २०२० पासून राहणीमान भत्ता मिळाला नव्हता. त्यामुळे संबंधित व्यक्तीने २ मे २०२४ रोजी राहणीमान भत्ता मिळविण्यासाठी अढाव ग्रामपंचायतीकडे अर्ज केला होता. संबंधित व्यक्तीच्या राहणीमान भत्त्याच्या धनादेशावर स्वाक्षरी करण्यासाठी त्यांना महिला सरपंच जसमाय मावस्कर यांनी २५ हजार रुपये लाचेची मागणी केली होती.

Bribe
Nagar Bribe News : नगर जिल्हा परिषदेतील लिपिकाला लाच घेताना अटक

संबंधित व्यक्तीने लाचेची रक्कम देण्यापूर्वी अमरावतीच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली होती. संबंधित तक्रारीची अधिकाऱ्यांनी पडताळणी केली. अखेर २५ हजारांऐवजी २० हजार रुपयांवर व्यवहार ठरला. सोमवार २० मे रोजी महिला सरपंच यांचे पती छोटेलाल मावस्कर यांनी बँक ऑफ महाराष्ट्र शाखा, बिजूधावडी समोर लाचेची २० हजार रुपयांची रक्कम स्वीकारताना एसीबीच्या पथकाने पकडले. त्यानंतर पत्नीलाही ताब्यात घेण्यात आले.

दोघांविरुद्ध धारणी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. एसीबीचे अधीक्षक मारोती जगताप, अपर अधीक्षक अनिल पवार, उपअधीक्षक मिलिंदकुमार बहाकर व मंगेश मोहोड यांच्या मार्गदर्शनात निरीक्षक शिल्पा भरडे, सतीश उमरे, प्रमोद रायपुरे, विद्या राऊत, शैलेश कडू यांच्या पथकाने ही कारवाई केली.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com