
ॲग्रोवन वृत्तसेवा
Nanded News : नांदेड : रेशीम कोषाला सध्या चांगला बाजारभाव मिळत आहे. यापुढेही रेशीम शेतीला चांगले दिवस येणार आहेत. यामुळे शेतकऱ्यांनी आगामी काळात सुरू होणाऱ्या महारेशीम अभियानात तुती लागवडीसाठी नोंदणी करावी, असे आवाहन रेशीम विकास अधिकारी पी. बी. नरवाडे यांनी केले.
लोहा तालुक्यातील धनंज बुद्रुक शिवारात संदीप माळेगावे यांच्या कीटक संगोपनगृहात सन २०२४-२५ मध्ये नवीन तुती लागवड केलेल्या शेतकऱ्यांचे कीटक संगोपनगृह प्रशिक्षणात श्री. नरवाडे बोलत होते.
या वेळी शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी केंद्रीय रेशीम बोर्डाचे शास्त्रज्ञ ए. एल. जाधव, जिल्हा रेशीम कार्यालयातील क्षेत्र सहायक पी. यू. भंडारे, आर. एन. व्यास, तांत्रिक सहायक एन. वाय. कोरके, अभय कुलकर्णी यांच्यासह रेशीम शेतीतील प्रयोगशील शेतकरी हरी पगडे, विठ्ठल शिंदे, हणमंत शिंदे, विनोद शिंदे, रमेश मंदावाड, पंडित पगडे, अर्जुन पगडे, भुजंग शिंदे यांच्यासह जिल्ह्यातील अनेक प्रगतिशील शेतकरी उपस्थित होते.
श्री. नरवाडे यांनी बोलताना सांगितले, नांदेड जिल्ह्यातील शेतकरी रेशीम शेतीकडे वळले आहेत. दरवर्षी लागवड क्षेत्रात वाढ होत आहे. कोषविक्रीसाठी नांदेड जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पूर्णा, बीड, जालना या ठिकाणी बाजार उपलब्ध झाले आहे. यामुळे शेतकऱ्यांचा खर्च तसेच पेशाची बचत होत आहे. रेशीम शेतीसाठी सध्या रोजगार हमी योजनेसह सिल्क समग्र -दोन या योजनेतून शेतकऱ्यांना तुती लागवडीसाठी नोंदणी करता येते.
जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी आगामी काळात सुरू होणाऱ्या महारेशीम अभियानातून नवीन तुती लागवडीसाठी नोंदणी करावी, असे सांगितले. ए. एल. जाधव यांनी कीटकसंगोपनगृहाची उभारणी कशी करावी, यासंबधी तांत्रिक मार्गदर्शन केले. प्रशिक्षणानंतर रेशीम अधिकाऱ्यांसह शेतकऱ्यांनी नवीन तुती लागवड केलेल्या प्रक्षेत्राची पाहणी केली.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.