Grape Orchard Damage : वाऱ्यामुळे द्राक्ष बागा जमीनदोस्त

एकीकडे वादळी वाऱ्याच्या संकट घोंगावत असताना अनेक व्यापारी व निर्यातदारांनी द्राक्ष बागांचे खुडे थांबवले होते.
Grape Orchard Damage
Grape Orchard DamageAgrowon

Nashik News : ऐन होळीच्या सणाला वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसामुळे निफाड तालुक्यात (Nephad Taluka) गहू पिकाला मोठा फटका बसला. तर द्राक्ष उत्पादक (Grape Producer) शेतकऱ्यांच्या काढणीयोग्य बागा वादळी वाऱ्यामुळे जमिनदोस्त झाल्या.

त्यामुळे कष्टाने उभा केलेला हंगाम आता रडवणारा ठरत असून लाखो रुपयांचे नुकसान झाल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले.

जिल्ह्यात रविवारी (ता. ५) व सोमवारी (ता. ६) वादळी वाऱ्याने निफाड तालुक्याला तडाखा दिल्याने द्राक्ष पिकावर मोठे संकट कोसळले आहे. द्राक्ष मालाच्या गुणवत्तेवर परिणाम होण्यासह उत्पादनात घट होण्याची भीती शेतकऱ्यांनी बोलून दाखवली.

Grape Orchard Damage
Grape Management : अवकाळी पावसाचे बागेवरील परिणाम

एकीकडे वादळी वाऱ्याच्या संकट घोंगावत असताना अनेक व्यापारी व निर्यातदारांनी द्राक्ष बागांचे खुडे थांबवले होते. अशातच शेतकऱ्यांनी सौदे केले असता बागा वादळी वाऱ्यामुळे कोसळून पडल्याने मोठी अडचण निर्माण झाली आहे.

हा फटका प्रमुख्याने उगाव, पिंपळस रामाचे, कसबे सुकेणे, मौजे सुकेणे व रौळस पिंपरी या गावांना बसला आहे. खते, रासायनिक औषधांच्या दरात भरमसाट वाढ झाल्यानंतरही शेतकऱ्यांनी पदरमोड करून बागा तयार केल्या.

मात्र वादळी वाऱ्याने शेतकऱ्यांच्या कष्टावर पाणी फिरवले. उगाव येथील द्राक्ष उत्पादक शेतकरी भाऊसाहेब पानगव्हाणे यांच्या दोन एकरावर काढणी योग्य नानासाहेब पर्पल व मामा जंबो या काळ्या वाणाची निर्यातक्षम द्राक्षबाग भुईसपाट झाली.

त्यांना मजुरांमार्फत पुन्हा बाग उभी करावी लागली; मात्र काही वेली वाकून तुटल्या आहेत. त्यांना २०० क्विंटल द्राक्ष उत्पादन अपेक्षित होते; सुमारे दहा ते बारा लाखांचा फटका बसला आहे.

Grape Orchard Damage
Grape Market : बिहारच्या द्राक्ष व्यापाऱ्यांकडून शेतकऱ्यांना ५० लाखांचा गंडा

पिंपळस रामाचे येथील द्राक्ष उत्पादक शेतकरी संजय सुरवाडे यांची पिंपरी शिवारातील द्राक्षबागही वाऱ्यामुळे जमीनदोस्त झाली. त्यांचेही मोठे नुकसान झाले. काही दिवसांंवर आलेल्या काढणीपूर्वीच पावसामुळे होत्याचे नव्हते झाले.

...येणारा काळ अडचणीचा

सध्या अपेक्षित दराची प्रतीक्षा करत असताना नैसर्गिक संकटाने शेतकरी हवालदिल झाला आहे. प्रशासनाने बांधावर येऊन वस्तुनिष्ठ पंचनामे करावेत व झालेल्या नुकसानीपोटी मदत द्यावी;

अन्यथा येणारा काळ शेतकऱ्यांसाठी अडचणीचा असेल, अशी व्यथा शेतकरी सरकारकडे मांडत आहेत.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
document.addEventListener("qt-page-data", (e) => { console.log(e.detail); })
Agrowon
agrowon.esakal.com