Murbad Market: उन्हाळ्याची चाहूल लागताच मुरबाड बाजारपेठेत विविध प्रकारचा दुर्मिळ रानमेवा विक्रीसाठी दाखल झाला आहे. पांढरी शुभ्र तोरणे, लाल चुटूक आठोरणे, पिवळे काजू, हिरव्यागार काजू बिया, आंब्याच्या कैऱ्या, करवंदे, विलायती चिंचा आदी पदार्थ ग्राहकांचे लक्ष वेधून घेत आहेत..ग्रामीण भागातील आदिवासी महिला मुरबाड शहरातील हनुमान मंदिराजवळ टोपल्यांमध्ये हा रानमेवा विक्रीसाठी आणतात. पळसाच्या पानावर वाटे करून या मालाची विक्री केली जाते. प्रत्येक वाट्यासाठी २० रुपये असा सरसकट दर ठेवण्यात आला आहे. .Wild Fruits: ग्रीष्मातील दाह शमविणारी रानफळे .मागील वर्षी १० रुपयांना मिळणारा तोरणे व आठोरणे यांचा वाटा यंदा दुप्पट दराने विकला जात असला तरी ग्राहकांचा प्रतिसाद कायम आहे. .Wild Fruits: ओळख पोषक रानमेव्याची....मुरबाड तालुक्यातील जंगल परिसरात अजूनही रानमेवा उपलब्ध होत आहे. या व्यवसायातून त्यांना रोजच्या उदरनिर्वाहाला हातभार लागत असल्याचे त्यांनी सांगितले..दरवर्षी अक्षय्य तृतीयेच्या सुमारास बाजारात येणारा हा रानमेवा यंदा काहीसा लवकर दाखल झाला आहे. खत व कीटकनाशकांचा वापर न करता जंगलातील वेली व झुडपांवर नैसर्गिकरित्या वाढणारा हा रानमेवा आरोग्यदायी मानला जातो..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.