Latur News: लातूर तालुक्यात गेल्या काही महिन्यांपासून वन्यप्राण्यांचा उपद्रव वाढला असून, पिकांची मोठ्या प्रमाणात नासाडी होत आहे. त्यामुळे शेतकरी त्रस्त असून, शेतशिवारात फिरणेदेखील धोकादायक बनले आहे. त्यात वन्यप्राणी नागरी वस्तीकडे वळत नागरिकांवर हल्ले करीत असल्याने भीतीचे वातावरण पसरले आहे..देवणी हा महाराष्ट्र- कर्नाटक सीमाभागातील शेवटचा तालुका आहे. तालुक्यात शासकीय वनक्षेत्र मर्यादित असून, लगतच्या कर्नाटक राज्यातील वन्यजीवांचा मोठा वावर ही नित्याचीच बाब झाली आहे. तालुक्यातील विविध भागांत ऊस, ज्वारी, हरभरा, करडई अशा पिकांवर रानडुक्कर, हरिण, माकड, मोर यांचा उपद्रव सातत्याने वाढत आहे..Human Wildlife Conflict: संघर्ष नको, सहजीवनच हवे...!.विशेषतः रानडुकरांचा उच्छाद इतका वाढला, की हे प्राणी आता दिवसाढवळ्या शेतात शिरून ऊस, ज्वारी, हरभरा पिकांचे मोठे नुकसान करत आहेत. त्यामुळे शेतकरीवर्ग भयभीत असून दिवसादेखील शेतात जाण्यास भीती वाटू लागली आहे..Wildlife Conflict: चंद्रपूर जिल्ह्यात मानव वन्यजीव संघर्ष वाढला.हरणांची संख्या झपाट्याने वाढत असून, ते उगवलेल्या कोवळ्या पिकांवर ताव मारत आहेत. विशेषतः करडई, हरभरा आणि ज्वारी पिकांचे हरणांच्या उच्छादामुळे मोठ्या प्रमाणात नासधूस होत आहे. दोनशे ते तीनशेपर्यंत हरणांचे एकत्रित कळप पिकांचे नुकसान करत आहेत. काही भागांत पिके उगवण्याच्या अवस्थेतच पूर्णतः नष्ट झाली. फक्त पिकांवरच नाही, तर शेतातील पशुधनावरदेखील वन्यप्राण्यांचे हल्ले वाढले आहेत. .प्रशासनाने हरिण व रानडुक्कर नियंत्रण मोहीम राबवावी, नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना त्वरित आर्थिक मदत द्यावी तसेच वन्यप्राण्यांच्या हालचालींवर लक्ष ठेवण्यासाठी पथके नियुक्त करावीत. या परिस्थितीमुळे देवणी तालुक्यातील शेतकरी संकटात सापडले आहेत. वन्यजीवांचा हा वाढता उपद्रव रोखण्यासाठी प्रशासनाने ठोस आणि तातडीचे पाऊल उचलणे आवश्यक आहे.- संगमेश्वर मोळकिरे, शेतकरी, दवणहिप्परगा..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.