Plastic Mulching : तीनच कंपन्यांकडून प्लॅस्टिक मल्चिंग खरेदीची सक्ती का?

Krushi Vikas Yojana : एकात्मिक फलोत्पादन अभियान तसेच राष्ट्रीय कृषी विकास योजनेअंतर्गत राज्यात संरक्षित शेती या घटकासाठी प्लॅस्टिक मल्चिंग या घटकांकरिता तीन कंपन्यांची निवड करण्यात आली आहे.
Plastic Mulching
Plastic MulchingAgrowon

Nagpur News : एकात्मिक फलोत्पादन अभियान तसेच राष्ट्रीय कृषी विकास योजनेअंतर्गत राज्यात संरक्षित शेती या घटकासाठी प्लॅस्टिक मल्चिंग या घटकांकरिता तीन कंपन्यांची निवड करण्यात आली आहे. परंतु मर्यादित कंपन्या असल्याने त्या अधिक दर आकारत असल्याचा शेतकऱ्यांचा आरोप आहे.

संरक्षित शेतीसाठी लागणाऱ्या विविध घटकांचा अनुदानित पुरवठा करण्याकरिता संबंधित कंपन्यांकडून अटी व शर्तीच्या अधीन राहत प्रस्ताव मागविण्यात आले होते. त्याकरिता कृषी विभागाच्या संकेतस्थळावर जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली.

Plastic Mulching
Animal Water Issue : दुष्काळात जनावरांच्या पाण्याचा प्रश्‍न दुर्लक्षित

त्यानंतर राज्यस्तरीय समितीने त्या प्रस्तावांची छाननी करून त्याआधारे समितीने प्लॅस्टिक मल्चिंग उत्पादक व पुरवठा करणाऱ्या तीन कंपन्यांची शिफारस केली आहे. या तीन पैकी दोन कंपन्या या गुजरातमधील तर एक महाराष्ट्रातील आहे.

Plastic Mulching
Farmer Protest : परभणीत बैलगाडी मोर्चा तर जायकवाडीत जलसमाधी आंदोलन; राज्यात काय घडलं?

ऑनलाइन पद्धतीने महाडीबीटीच्या माध्यमातून खरेदीसाठी कोणत्याही कंपन्यांचे साहित्याची मुभा आहे, असे असताना प्लॅस्टिक मल्चिंगसाठी मात्र तीनच कंपन्यांकडून खरेदीची सक्‍ती का? असा प्रश्‍न उपस्थित केला जात आहे.

प्लॅस्टिक मल्चिंग पुरवठादार तीन कंपन्यांचीच शिफारस अनुदानाकरिता करण्यात आली आहे. कंपन्यांची संख्या मर्यादित असल्यामुळे त्यांनी दर वाढविल्याची शंका आहे. कारण त्याच मायक्रॉन आणि दर्जाचे मल्चिंग साहित्य बाजारात काही कंपन्यांकडून कमी दरात पुरवठा केले जाते. मात्र त्यांच्याकडूनच मल्चिंग साहित्य घेण्याबाबत सक्‍ती करण्यात आल्याने शेतकऱ्यांचा नाईलाज आहे.
प्रकाश पुप्पलवार, शेतकरी, खैरगाव देशमुख, पांढरकवडा, यवतमाळ

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com