तेलवर्गीय पिकांसाठी गंधक हे महत्त्वाचे अन्नद्रव्य (Important Nutrient) आहे. तेलबियांचे उत्पादन (Oilseed Production) घेतलेल्या जमिनीत गंधकाचे प्रमाण (Sulpher Quantity) फार कमी आढळून आले आहे. तेल बियांमध्ये प्रथिने व तेल तयार होण्यासाठी गंधक अत्यंत महत्त्वाचे अन्नद्रव्य आहे. कारण सिसटिन, मिथिओनाईन आणि न्यूक्लिक आम्ल यासारख्या प्रथिने निर्माण करणाऱ्या घटकांमध्ये गंधक प्रमुख घटक आहे. गंधकामुळे पिकांमध्ये संप्रेरकांना त्यांच्या कार्यात गती मिळते.
काही जीवनसत्वांमध्ये ही गंधक प्रमुख घटक आहे. त्यामुळे तेल बियांना आकार य़ेण्यासाठी, बियांतील तेल, प्रथिने वाढीसाठी गंधकाची गरज असते. याव्यतिरिक्त तेलबिया पिकांमध्ये गंधक मुख्यत्वे करून पिकांच्या मुळांद्वारे शोषला जातो व बियांमध्ये साठवला जातो. त्यामुळे तेलबियांचे वजन वाढते. परंतु मातीतील गंधकाचे प्रमाण घटते.
महाराष्ट्रातील जमिनीतील गंधकाचे प्रमाण घटण्याची कारणे
सर्वेक्षणानुसार माती व पिके यात गंधकाची कमतरता होण्यामागे विविध मुख्य कारणे आहेत. डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापिठाने महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यातील तालुका निहाय मातीचे पृथ्थकरण केले. पृथ्थकरणानूसार लक्षात आले की, गंधक या दुय्यम अन्नद्रव्याची कमतरता जवळपास सर्व भागात आढळत आहे.
मुख्यत ज्या क्षेत्रातील तेलवर्गीय पिकांची सतत एकाच शेतात पेरणी केली जाते त्याठिकाणी कमतरता दिसून आली.त्याचप्रमाणे गंधक विरहित खतांचा म्हणजेच डीएपी चा सतत वापर करणाऱ्या शेतात गंधकाची कमतरता दिसून आली आहे.
महाराष्ट्राच्या नकाशावरून लक्षात येईल की जास्तीत जास्त जिल्ह्यात गंधकाच्या कमतरतेची तीव्रता आहे. महाराष्ट्रात सरासरी २७.५ % नमुन्यात गंधकाची कमतरता आढळली आहे. विभागनिहाय कमतरता बघितल्यास विदर्भ २५.८ टक्के, मराठवाडा २९.४ टक्के, पश्चिम महाराष्ट्र ४०.४ टक्के आणि कोकणात १४.३ टक्के दिसून आली.
ज्या भागात जास्त पर्जन्यमान आहे व आम्लधर्मी जमिनी आहेत उदाहरणार्थ कोकण, पूर्व विदर्भ या भागात गंधकाच्या कमतरतेची तीव्रता जास्त दिसून आली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी गंधक व अन्नद्रव्याचे तपासणी करणे अत्यंत गरजेचे आहे. याउलट जे शेतकरी सेंद्रिय खते, हिरवळीची खते, कंपोस्ट यांचा नियमित वापर करतात त्यांच्या शेतात गंधकाची कमतरता कमी दिसून येते.
---------------
स्त्रोत - कृषी पत्रिका, ऑक्टोबर २०२२, डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ, अकोला.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.